नवीन लेखन...

शैक्षणिक

मायक्रोवेव्ह ओव्हन

मायक्रोवेव्ह  ओव्हन हे स्वयंपाकघरात अन्न शिजवण्यासाठी वापरले जाणारे यंत्र आता फारसे नवीन राहिलेले नसले तरी त्याचा वापर मात्र अजून कायम आहे. विसाव्या शतकातील तो एक महत्त्वाचा शोध मानला अर्थवेध असते. जातो. प्रगत देशात तर प्रत्येक घरात त्याचा वापर केला जातो. मायक्रोवेव्ह ओव्हन उष्णतेने अन्न शिजवण्याच्या ऐवजी प्रारणांच्या मदतीने अन्न शिजवते, रडार तरंगांचे तंत्र यात वापरलेले असते. […]

नळ का गळतो आणि कसा थांबवायचा?

नळ का गळतो हे समजून घ्यायचं असेल तर आधी नळ कसा काम करतो हे समजून घ्यायला लागेल. आपण जर नीट निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की सहसा फिरकीचा नळ गळतो. जिथून पाणी बाहेर येते ती तोटी आणि तोटीपर्यंत पाणी आणून सोडणारा वरच्या टाकीला जोडलेला पाईप, यांच्यामध्ये नळ बसवलेला असतो. फिरकीच्या नळाचे तीन प्रमुख भाग लक्षात […]

रेल्वेचे गेज म्हणजे काय असते ? अशी किती गेज आहेत ?

दोन रुळांमधील सरळ रेषेतील (म्हणजे कमीत कमी) अंतराला गेज म्हणतात. जगात निरनिराळया रेल्वेत वेगवेगळी गेजेस वापरली गेली आहेत.त्याचे सर्वसाधारण वर्गीकरण चार विभागात होते. […]

जागृत मंगळ…

मंगळावर अनेक ज्वालामुखी आढळतात. एके काळी जागृत असलेले हे ज्वालामुखी आज मृतावस्थेत आहेत. त्यामुळे मंगळ ग्रह हा भूगर्भीयदृष्ट्या निष्क्रिय ग्रह मानला गेला आहे. मात्र नुकत्याच प्रकाशित झालेल्या संशोधनातून, मंगळ वाटतो तसा निष्क्रिय नसल्याचं दिसून आलं आहे. किंबहुना मंगळावर सतत भूकंप होत आहेत, इतकंच नव्हे तर मंगळाच्या पृष्ठभागाखाली शिलारस अस्तित्वात असल्याचंही दिसून आलं आहे. […]

प्लम्बिंग सामानाची निवड व गळतीवर उपाय

घराघरातून पाणीपुरवठ्यासाठी पाण्याचे पाइप, झडपा (व्हॉल्व्ह), कोपरे (बेंड्स), नळ इत्यादी सामानांचा वापर केला जातो. या सर्व सामग्रीचा वापर करून टाकी व पंपापासून ते घरातील नळापर्यंत पुरवठा व्यवस्था जोडणीला प्लमिंग (स्पेलिंग प्लंम्बिंग पण उच्चार प्लमिंग) म्हणतात. सर्व व्यवस्थेची उद्दिष्टे १) योग्य दाबाने व योग्य प्रमाणात सातत्याने घरात पाणीपुरवठा होत राहणे. २) वापरलेले सामान (पाइप, नळ, झडपा) पाणी […]

गॅस लायटर

पूर्वीच्या काळात चार आण्याला आगपेटी मिळायची. अजूनही ती मिळते पण आता तिचा वापर फारसा होत नाही, कारण घरोघरी गॅस पेटवण्यासाठी आपण गॅस लायटरचा वापर करतो. […]

काँक्रीटचे बांधकाम निकृष्ट व असुरक्षित असल्यास कोणते उपाय योजले जातात?

मजबुतीच्या सर्व तपासण्या झाल्यावर बांधकामाची भारक्षमता मूळ अपेक्षित पातळीपेक्षा कमी झाली असेल, तर त्याच्या प्रमाणानुसार उपाययोजना खालीलप्रमाणे करावी लागते. १) जरी काँक्रीटची मजबुती समाधानकारक असली तरी जवळून बघितल्यास सूक्ष्म भेगा दिसून आल्या तर एपॉक्सीसारख्या लांबीने भेगा बुजवून घेऊन नंतर आतून-बाहेरून योग्य प्रतीचा रंग लावावा. त्यामुळे पावसाळ्यात बाष्प आत जाऊन स्थिती बिघडत नाही. दर तीन ते पाच […]

इमारतीवरील पाण्याच्या टाकीबाबत खबरदारी

मारतीवरील टाक्यांचे निरनिराळे प्रकार आहेत. ते कोणते हे पाहून त्यांचे कार्य योग्य रीतीने व्हावे म्हणून खालील खबरदारी घ्यावी. १) सिंटेक्ससारख्या प्लॅस्टिकच्या टाक्या वजनाने हलक्या असतात. त्या १००० ते ५००० लिटर क्षमतेच्या असतात. इमारतीच्या रोजच्या गरजेप्रमाणे दोन किंवा अधिक टाक्या बसवून त्या एकमेकाला जोडता येतात. या टाक्यांच्या खाली संपूर्ण सपाट आधार असावा लागतो. नाहीतर त्या फुटू शकतात […]

सोलर कुकर

अन्न शिजवण्यासाठी आपण अजूनही गॅस किंवा रॉकेल अशा इंधनांचा वापर करतो. गरीब लोक तर अजूनही सरपण गोळा करून त्यावर स्वयंपाक करतात. जीवाश्म इंधने महाग असतात तसेच यातील काही इंधनांमुळे प्रदूषण होते. त्यावर उपाय म्हणून सोलर कुकर हा पर्याय पुढे आला आहे. […]

बांधकामाच्या वेळी घ्यावयाची काळजी

सलोह काँक्रीटच्या बांधकामाच्या वेळी कोणती काळजी घ्यावी लागते. १) ज्या पोलादी सळ्या बांधकामात वापरल्या जाणार, त्या मान्यताप्राप्त कारखान्यातून योग्य त्या प्रमाणपत्रासह आल्या का ते पाहावे. २) आलेल्या सळ्यांची डोळ्याने पाहणी करून त्या गंजलेल्या, पिचलेल्या किंवा अति वाकलेल्या नाहीत ना हे पाहावे. ३) सळ्यांचे व्यास मागणीप्रमाणे आहेतका ते पाहावे. ४) त्यातील काही सळ्यांचे ३० ते ६० सें.मी. […]

1 57 58 59 60 61 160
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..