बहुपयोगी गुग्गूळ
गुग्गुळ ही भारतातील एक औषधी आहे. धार्मिक कार्यक्रमात हिचा उपयोग धुपावर टाकण्यासाठी करतात. ही जंतुघ्न आहे. गुग्गूळ हा बर्सेरेसी कुलातील मध्यम उंचीचा एक पानझडी वृक्ष आहे. त्याचे शास्त्रीय नाव कॉमिफोरा मुकुल आहे. शुष्क वातावरण आणि खडकाळ जमिनीवर हा वृक्ष वाढतो. भारतात मुख्यत्वे उत्तर भारतातील राज्यांमध्ये तो आढळतो. गुजरात आणि राजस्थानमध्ये बेसुमार तोडीमुळे तो दुर्मिळ झाला असल्याने या वृक्षाचा समावेश नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या वनस्पतींच्या यादीत करण्यात आला आहे. […]