सलोह काँक्रीटचा बांधकामातील उपयोग
ज्या काँक्रीटमध्ये पोलादी सळ्या वापरतात, त्याला ‘सलोह काँक्रीट’ अथवा ‘आरसीसी’ म्हणतात. काँक्रीट ठरावीक मर्यादेपर्यंतचा दाब सहन करू शकते. इमारतीसाठी वापरले जाणारे काँक्रीट दर चौरस सेंटीमीटरला साधारणपणे २०० किलोग्रॅम वजनाचा दाब सहन करू शकते, पण काँक्रीटची कांडी बनवून तिला दोन्ही टोकाकडून ताण दिला तर ती दर चौरस सेंटीमीटरला ५ किलोग्रॅमएवढ्या वजनालाही तुटू शकते. म्हणजेच काँक्रीटमध्ये दाब सहन […]