नवीन लेखन...

शैक्षणिक

एलियन

एलियन्स या विश्वात कुठे राहतात हा एक माणसाच्या दृष्टीने असलेला व्यापक चर्चेचा विषय आहे. त्यांचे अस्तित्वात या विश्वात आहेत की नाही, ते आपल्याला पाहत आहेत की नाही, ते पृथ्वीवर आहेत का, असे काही प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात आहेत. एका स्वयंघोषित ‘टाईम ट्रॅव्हलर’नुसार, एलियन ८ डिसेंबर रोजी पृथ्वीवर उतरतील. खरच टाईम ट्रॅव्हलची व्याख्या करायची झाली तर एखादी […]

खचणारा पर्वत!

दक्षिण अमेरिकेतील अँडिज पर्वत ही एक लांबलचक पर्वतरांग आहे. जवळपास नऊ हजार किलोमीटर लांबीची ही उत्तर-दक्षिण पर्वतरांग सव्वातीनशे किलोमीटर रुंद असून, तिची सरासरी उंची चार हजार मीटर इतकी आहे. या पर्वताची निर्मिती सहा ते सात कोटी वर्षांपूर्वी झाली. या अँडिज पर्वताच्या मधल्या भागात सेंट्रल अँडिअन प्लेटो नावाचं पठार आहे. […]

बर्फातला माणूस…

युरोपातले आल्प्स पर्वत हे भटकंतीसाठी गिर्यारोहकांत अत्यंत लोकप्रिय आहेत. ऑस्ट्रिआ, फ्रान्स, जर्मनी, इटली, स्विट्झरलँड, इत्यादी देशांत पसरलेल्या या पर्वतरांगांत गिर्यारोहकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या आल्प्स पर्वतात भटकणाऱ्या काही जर्मन गिर्यारोहकांना १९९१ सालच्या सप्टेंबर महिन्यात, इटली आणि ऑस्ट्रिआ या देशांच्या सीमेजवळच्या योट्झाल खोऱ्याजवळ, बर्फात अर्धवट दडलेला एक मानवी मृतदेह आढळला. […]

जीवोत्पत्ती – किरणोत्सर्गाचा हातभार?

अमिनो आम्लं ही पृथ्वीवरच्या जीवसृष्टीची अविभाज्य घटक आहेत. या अमिनो आम्लांपासूनच आपल्या शरीरातली विविध प्रथिनं तयार होतात. ही अमिनो आम्लं म्हणजे एक प्रकारची नायट्रोजनयुक्त आम्लं आहेत. पृथ्वीवरच्या जीवसृष्टीची सुरुवात होत होती, तेव्हा ही आम्लं अमोनिआ, मिथेन, हायड्रोजन सायनाइड, पाणी यासारख्या साध्या रसायनांच्या मिश्रणापासून निर्माण झाली असावीत. ही निर्मिती आकाशात कडाडणाऱ्या विजेच्या मदतीनं झाली असण्याची एक शक्यता, पूर्वीच्या संशोधनातून दिसून आली आहे. […]

संवाद

संवाद हा नात्यातला श्वास आहे. जर हा श्वास थांबला तर नातं ही थांबतं. नवजात शिशु जेव्हा जेव्हा जन्म घेतो त्या दिवसापासून आई त्याच्या सोबत संवाद साधू लागते. या संवादामुळे त्याला या जगातील नाती, वस्तु, पदार्थ…. यांचे ज्ञान होऊ लागते. नात्यांशिवाय मनुष्य म्हणजे पानगळती झालेलं जीर्ण झाड! ज्यावर पक्षीदेखील आपलं घरटं बांधत नाहीत. ही पानगळती टाळण्यासाठी संवाद साधा व नात्यांना टवटवीत ठेवा. […]

ॲरिस्टोटलचं थडगं

इतिहासाचा शोध घेताना त्यासंबंधीच्या प्रत्येक वस्तूला महत्त्व द्यावं लागतं. कारण, ती वस्तू म्हणजे भूतकाळ आणि भविष्यकाळ यांना जोडणारा दुवा असते. एका संशोधकाला, चोवीस शतकांपूर्वीच्या इतिहासाशी नातं सांगणारा एक दुवा सापडला आहे. हा दुवा म्हणजे चक्क एक थडगं आहे. पण हे थडगं सामान्य व्यक्तीचं नाही. हे थडगं आहे ते पुरातन काळच्या ग्रीक साम्राज्यातल्या ॲथेन्सचा प्रख्यात तत्त्वज्ञ ॲरिस्टोटल याचं! […]

वनस्पतींच्या बीजप्रसाराचे रहस्य

बीजप्रसार: प्राणी जसे त्यांच्या अस्तित्वासाठी व वाढीसाठी अधिवास बदलू शकतात, तसे वनस्पतींना अधिवास बदलता येत नाही. आपला प्रसार बीजांद्वारे व्हावा या उद्देशाने वनस्पती उत्क्रांत झालेल्या आहेत. मात्र अंकुरणासाठी व वाढीसाठी अनुकूल परिस्थिती असेल अशा ठिकाणी त्यांच्या बीजांचे आगमन व्हावे लागते. बीज म्हणजे व्यावहारिक भाषेतील बी. बीज म्हणजे भ्रूण स्वरूपातील वनस्पती असून ती संरक्षक बाह्यकवचाने आच्छादलेली असते. […]

खरं काय अन् खोटं काय?

आपल्या ऐकण्यात व वाचण्यात पॉलीग्राफ, नार्को असे शब्द येत असतात. त्याची माहिती व्हावी हा या लेखामागचा उद्देश. […]

स्ट्रॅडिवरीचं व्हायोलिन

आपल्याला सुपरिचित असलेलं एक पाश्चात्य वाद्य म्हणजे व्हायोलिन. या वाद्याला सतराव्या शतकाच्या अखेरीस आजचं आधुनिक रूप प्राप्त झालं. हे रूप प्राप्त करून दिलं ते अँटोनिओ स्ट्रॅडिवरी या सुप्रसिद्ध इटालिअन वाद्यनिर्मात्यानं. स्ट्रॅडिवरी यानं पारंपरिक व्हायोलिनच्या आकारात काही बदल करून या वाद्याला अधिक सुस्वर बनवलं. आजची व्हायोलिन ही या बदललेल्या रूपानुसार तयार केली जातात. ही आजची व्हायोलिन जरी […]

केळ्यांतली गुंतागुंत

केळ्याचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न बराच पूर्वीपासून सुरू आहे. लागवड केली जाणारी आजची केळी ही केळ्यांच्याच विविध जाती-उपजातींत झालेल्या संकरातून निर्माण झाली आहेत. आजच्या मुसा अ‍ॅक्युमिनाटापासून निर्माण झालेल्या केळ्यांत, या जातीच्या जनुकांबरोबरच इतर काही जंगली केळ्यांतील जनुकही अस्तित्वात असल्याचं पूर्वीच माहीत झालं आहे. […]

1 62 63 64 65 66 160
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..