नवीन लेखन...

शैक्षणिक

संवादाचं सुख

परस्परांतील सूर जेव्हा संवादाच्या माधमातून जुळायला सुरुवात होते, तेव्हाच त्याच्यावर ताल देखील धरला जातो. ह्यासाठी एकमेकांचं ताळतंत्र, थोडं का होईना पण सांभाळायला लागतं. संवादाचं सुख ही ज्याची त्यानी अनुभूती घेण्याची बाब असते. […]

ध्रुवीय प्रकाश – विषुववृत्ताजवळचा

सुमारे ४१,००० वर्षांपूर्वी घडून आलेल्या या पृथ्वीवरील चुंबकीय बदलांत, चुंबकीय ध्रुवांची जागा मोठ्या प्रमाणात सरकली होती. तसंच त्यांच्या तीव्रतेतही मोठा बदल झाला होता. चुंबकत्वातील बदलाच्या घटना अधूनमधून घडून येत असल्या तरी, पृथ्वीच्या चुंबकत्वातला या वेळचा बदल खूपच मोठा असल्यानं लक्षवेधी ठरला आहे. या लक्षवेधी घटनेची झलक त्या काळी विषुववृत्तावरील ‘ध्रुवीय’ प्रकाशाद्वारे दिसून आली असल्याचं, आताचं हे संशोधन दर्शवतं. […]

मौखिक व अमौखिक संवाद

दोन व्यक्तींमधील संवादात सहसा तिसरी व्यक्ती सामील झालेली नसते. हा संवाद व्यक्तिगत, थेट आणि निकटता निर्माण करणारा असतो, ज्यात शब्द, देहबोली यांचा अंतर्भाव असतो. या संवादामुळे व्यक्तीचं मन वळवणे, एखाद्यावर प्रभाव निर्माण करणे शक्य होतं. या संवादामध्ये मौखिक, अमौखिक संवाद शक्य असतो. त्याचबरोबर अशा संवादात तात्काळ प्रतिसादही मिळत जातो. […]

संवाद हीच अंतर्मनाची गरज

“संवाद” म्हणजे नुसतं बोलणं नाही, तर विचारांचं आदानप्रदान, एकमेकांना भावनिक आणि मानसिक पातळीवर समजून घेणं. ह्या संवादांत दुसऱ्याचं बोलणं, विचार, मत समजण्यासाठी ऐकून घेणं जरुरीचं असतं. […]

सामाजिक बांधिलकीची जाणीव

सामाजिक बांधिलकीची जाणीव बालपणापासूनच लहान मुलांमध्ये निर्माण करणं जरुरीचं असतं, त्याचं भान त्यांच्याकडून राखलं जातं का? हे पाहणं गरजेचं असतं. आजची लहान मुलंच ह्या देशासाठी उद्याची संपत्ती असल्याचं आपण बोलतो, ऐकतो; त्यानुषंगाने मुलांचा विकास झाला तरंच राष्ट्राची प्रगती होईल. […]

विचारांना वाट करून देण्याची गरज

मनांत येणाऱ्या अनेक विचारांना वाट करून देण्याची गरज असते, त्यांना मोकळं करण्याची जरुरी असते. बोलून दाखवलेल्या मनांतील विचारांमुळे मनावरचा ताण हलका होतो. आपल्या मेंदूत साठवलेले, आठवलेले अनेक विचार, विषय ड्रेन करण्याची आवश्यकता असते. […]

लहानपणातलं बालपण

अनेकदा अगदी लहानपणापासूनच बाल मनावर आपण, कदाचित अनावधानानं असेल, पण आघात करत असतो, दबाव टाकत असतो. त्यांच्या स्वातंत्र्यावर अनेकदा आपण गदा आणत असतो. प्रत्येक बाब आपण आपल्याच मनाप्रमाणे त्यानं करावी ही केवळ अपेक्षाच नाही, तर सक्ती सुद्धा करत असतो. शिस्तीच्या नावाखाली आपण बाळाची गळचेपी करत असतो. त्यांच्या लहानपणी त्यांचं बालपण टिकवून ठेवणं आपापल्या हातात असतं. […]

क्रांतीच्या खुणा

फॅब्रिस लँबर्ट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वाढचक्रांच्या विश्लेषणावरून काढलेल्या गणिती निष्कर्षाला, ऐतिहासिक आधार असल्याचं स्पष्टपणे दिसून आलं आहे. यामुळे या संशोधकांनी वाढचक्रांतील धातूंच्या प्रमाणाची, हवामानाशी घातलेली गणिती सांगड योग्य ठरली आहे. वृक्षांच्या प्रत्येक वर्षीच्या वाढचक्राची, त्या वर्षीच्या हवेच्या दर्जाशी गणिती सांगड घालण्याचा असा प्रयत्न प्रथमच केला गेला आहे. फॅब्रिस लँबर्ट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवून दिलेल्या या मार्गामुळे, ज्या काळातल्या हवेतील प्रदूषणाच्या नोंदी उपलब्ध नाहीत, अशा काळातल्या हवेतील प्रदूषणाची माहिती मिळवणं, हे आता शक्य होणार आहे. […]

बालमनाला सांभाळणे आवश्यक

मी आणि माझं, आपण आणि आपलं या वैचारीकतेमुळे कुटुंबातील सदस्यांनी आपल्या स्वतः भोवती जणू लक्ष्मणरेषा आखून घेतल्याप्रमाणे वर्तन आणि विचार अंगीकारल्याचं दिसत आहे. सामाजिकदृष्ट्या आपणच आपलं अध:पतन तर करत नाहीत ना, हा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. […]

संवाद.. की द्विवाद..?

तर आजचा आपला विषय आहे, ‘मुलांचं एकमेकांसोबत खेळणं’. मुलांचं मानसशास्त्र सांगतं की, मुलांची सामाजिक जाणीव एक ते तीन वर्षांच्या दरम्यान सुरू होते. प्रत्येक मुलाची ही समज, आणि जाणिवेची पातळी वेगवेगळी असते, आणि तशीच ती identical जुळ्यांचीसुद्धा असते. […]

1 75 76 77 78 79 160
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..