प्रवासी शार्क
शार्कसारख्या माशांना चुंबकीय क्षेत्राची जाणीव असल्याचं, संशोधकांना पूर्वीच समजलं होतं. ही जाणीव त्यांच्या शरीरातील लोहयुक्त स्फटिकांद्वारे होत असते, हेही संशोधकांना कळलं होतं. परंतु या माशांना ही फक्त जाणीव असते की या जाणिवेचा दिशाज्ञानासाठी उपयोग केला जातो, हे शोधणं महत्त्वाचं असल्याचं मत संशोधक गेली पाच दशकं व्यक्त करीत होते. […]