जबाबदार कोण ?
शाळा हे मुलांना अभ्यासमध्ये गुंतवून ठेवणारे आणि गुणांच्या चढाओढीत कुरघोडी करायला लावून शाळेचा गुणांचा TRP वाढवणारे कारखाने झालेयत. 90%, 95%, 98%, 99% गुण मिळवणारी मशीन आम्ही तयार करतोय, जी पुढे मानेवर जू ठेवून अभ्यास करत आपलं शिक्षण पूर्ण करून आणि मोठमोठ्या पॅकेजच्या नोकऱ्या मिळवून एखाद्या यंत्रमानवासारखी वावरतायत, आत्मकेंद्रीत होऊन आपल्यापुरताच विचार करतायत. […]