नवीन लेखन...

शैक्षणिक

जर प्रत्येकानं असा छंद बाळगला तरी…..

जर प्रत्येकानं असा छंद बाळगला तरी हजारो कुटुंबांच्या भाकरीची सोय होईल … अकलूज गावचा एक माणूस गेली ३० ते ३५ वर्षे सीताफळांच्या बिया साठवतो. मुंबईला, पुण्याला कामानिमित्त जावं लागतं. तो पिशवी भरून त्या घेतो आणि जाताना घाटात गाडी थांबते तिथं तिथं दरीत फेकून देतो. हल्ली त्या घाटावर पाट्यांमध्ये पिकलेली सीताफळं घेऊन अनेकजण विक्रीला बसलेले असतात. अलीकडे […]

पालकत्व

आज सर्वात जास्त मोह असलेल नातं ‘पालक आणि बालक’ हे नातं तणावाचे कारण बनले आहे. ह्या कोरोंना काळामध्ये मुलांच्या भविष्याला घेऊन सर्व पालक चिंतित आहेत. फक्त भविष्य नाही पण आज ह्या नात्यामध्ये जो दुरावा वाढत चालला आहे त्यामुळे ही चिंता वाढत चालली आहे. प्रत्येक पालकांच्या तोंडातून हे शब्द ऐकायला मिळतात की ‘ आजची मुलं म्हणजे…. ’. खरंच का ही मुलं इतकी धुमाकूळ घालतात की आपल्याला त्यांना सांभाळणं इतकं कठीण होऊन जातं? […]

‘इ टी एफ’ (एक्चेंज ट्रेडेड फंड) : एक गुंतवणुक पर्याय

ETF म्हणजेच एक्चेंज ट्रेडेड फंड अलीकडे लोकप्रिय गुंतवणुक पर्याय म्हणुन नावारूपाला येतोय. म्युच्युअल फंडांच्या तुलनेत याचा एक्स्पेन्सेस रेशिओ खुप कमी आहे म्हणुनच हा एक स्वस्त गुंतवणुक पर्याय मानला जातो. प्रस्तुत लेखात मी एक्चेंज ट्रेडेड फंड (ETF) हा विषय थोडक्यात सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. […]

ब्लेम गेम

आपल्याला स्वतःला बदलण्याची आवश्यकता आहे. ब्लेम गेम कितीही खेळले तरी हार मात्र आपलीच होते. म्हणून प्रत्येक परिस्थिती, व्यक्ति.. .. सर्वांकडून शिकून पुढच्या वर्गात जाण्याचा प्रयत्न करावा. […]

दिवाळी अंक – सांस्कृतिक संचित !

दिवाळी अंकांची दुनिया आणि व्यथा अधिकच वेगळी- उणेपुरे तीन चार महिन्यांचे आयुष्य, किमती शेकड्यात म्हणून ही इंडस्ट्री कायम ग्रंथालयांच्या आणि जाहिरातींच्या जीवावर चालली आहे. मग ७५ वर्षांचे आश्चर्य अधिक वाटते. नेटाने वल्ही मारणारे संपादक येथवर नाव आणून सोडतात तेव्हा आपण त्यांच्याबद्दल किमान कृतज्ञ तरी राहायला हवे. […]

झोप – एक नैसर्गिक प्रक्रिया

शालेय जीवनामध्ये मनुष्याच्या तीन मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा आहेत असे शिकवले जायचे. आज त्या गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा त्याही पेक्षा अधिक खूप काही मिळवण्यासाठी मनुष्य घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे वेगवान होत आहे. त्याचबरोबर पाश्चात्य संस्कृतीचा इतका प्रभाव आजच्या पिढीवर पडला आहे की रात्रिचा दिवस करून धनवान बनण्याची स्वप्न साकारू पाहत आहे. हे सर्व करताना निसर्गाशी ताळमेळ तुटत चालला आहे याची मात्र खंत वाटते. […]

पानी रे पानी तेरा रूप कैसा?

पाणी म्हणजे जीवन. “पानी बिना जग सुना” असेही म्हणतात. पाण्याशिवाय जगावयाची कल्पनाही पृथ्वीवरील सजीवांना सहन होणार नाही. ह्या पाण्याची अनेक रूपे आहेत. त्याचे शात्रीय विवेचन आपण करणार आहोत. […]

गर्भ संस्कार

महाभारतामध्ये ‘अभिमन्यू’ ची भूमिका सर्वांना माहितच असेल. गर्भामध्ये राहून चक्रव्यूहचे ज्ञान घेणारा हा अभिमन्यू आपण कसा विसरू शकतो. जन्माला येण्यापूर्वीच इतकी मोठी विद्या आत्मसात करू शकतो. हे कधी-कधी नवलच वाटायचे, पण आज हे सत्य आपण सर्वांनाच समजून चुकले आहे. संस्कारांचे बीजारोपण जन्मानंतर नाही परंतु जन्मापूर्वीच आपण करावे व ते कसे करावे, त्याचे महत्व आपण जाणून घ्यावे. […]

सरोजिनीबाई…

बाईंनी अध्यक्षीय भाषण सुरू केलं. ते संपल. मला फारसं काही कळलं नाही. लक्षात राहिली ती त्यांची पोडामवर आडवा हात ठेवून, ठासून प्रत्येक शब्द उच्चारण्याची शैली, ‘श’ आणि ‘ष’ यांच्यातील फरक अधोरेखित करणारं उच्चारण, कानाला गुंगवून टाकणारा नाद आणि प्रामाणिकपणे स्वत:चे विचार स्पष्ट करण्याची धाटणी. भाषण संपल्यावर, कार्यक्रम संपल्यावर मी आईला म्हणालो,“तुझ्यासारखंच बोलतात त्या.” त्यांची सही घ्यायला धावलो. व.पुं.नी सही छापलेलं लेटरहेड दिलं. बाईंना त्या को–या कागदावर जांभळया पेनानं तिरपी सही केली – ‘ सरोजिनी वैद्य ’. […]

प्रमाण परीक्षा

मला अजूनही आठवतंय, माझ्या आठवणीनुसार त्याकाळी अकरावी ssc ची परीक्षा होती आणि 12 वी इंटरची परीक्षा. त्यावेळच्या 12 वी च्या इंटर च्या परीक्षेच इतक वजन होत की आताच्या double graduate ला सुद्धा इतक महत्व नाही. पुढचे  शिक्षण घेण्यासाठी इंटर ची परीक्षा हीच एकमेव प्रमाण परीक्षा होती . इंटर ची परीक्षा पास झाला म्हणजे तो विद्यार्थी पुढचे […]

1 87 88 89 90 91 160
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..