नवीन लेखन...

शैक्षणिक

आर टी इ – राईट टू इट

अमेरिकेच्या रेडी टू इट आरटीई खाद्यसंस्कृती बद्दल जेव्हा जेव्हा वाचायचो त्यावेळी वाटायचे की ही वेळ भारतात यायला अजून खूप अवकाश आहे. पण गेल्या सहा महिन्याच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये भारतामध्ये रेडी टू इट मिल्स बनवणाऱ्या कंपन्यांच्या उत्पादनांच्या मागणीमध्ये तब्बल ३० ते ४५ टक्क्याने वाढ झाली आहे! […]

आठवणीतील शिक्षक

आपलं वय तीन वर्षे पुर्ण झालं की एक माणूस आपल्या आयुष्यात डोकावतो तो साधारणपणे पुढची सतरा वर्षे आपल्या सोबत असतोच, वेगवेगळ्या रूपांत. हा माणूस म्हणजे ‘शिक्षक’. या वेगवेगळ्या रूपांपैकी काही रूपं, रुपं म्हणण्यापेक्षा काही माणसं म्हणुया, सदैव आठवणीत रहातात. पण आपल्या आयुष्यात निव्वळ हेच शिक्षक असतात का ? मला नाही असं वाटत. या शिक्षकांव्यतिरिक्त इतर अनेक माणसं शिक्षकाच्या रुपात आपल्याला भेटत असतात, अगदी अखेरच्या क्षणापर्यंत. […]

सिंधुदुर्ग – दहावी बारावीत अव्वल पण उच्चशिक्षणाच्या सोयी?

मालवणच्या आशिष झाट्येने NEET मध्ये राज्यात प्रथम क्रमांक आणि देशात एकोणिसावा क्रमांक पटकावल्याची बातमी मनाला उभारी देऊन गेली. AIIMS दिल्ली सारख्या भारतातील सर्वोत्तम कॉलेज मध्ये शिकण्याचा पर्याय आता त्याच्यापुढे आहे. केईम किंवा AIIMS ची निवड मी करेन असे त्याने टाइम्स ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे. आशिष ने सिंधुदुर्गाच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये एक नवीन बेंचमार्क निर्माण केलाय. […]

कौटुंबिक मूल्यशिक्षण काळाची गरज

…. परंतु तरीही मानव असुरक्षित आहे कारण कमावलेल्या सामर्थ्याबरोबर त्याच्याशी सुसंगत अशी मानवता, संस्कार जपणारी योग्य मूल्ये जोपासली गेलेली नाहीत. त्याची आज गरज आहे. नुसती प्रगती महत्त्वाची नाही, तर तिला मूल्यांची जोड असणेदेखील अत्यावश्यक आहे कारण ढासळलेली मूल्ये त्या प्रगतीला गालबोट लावतात. म्हणूनच आज घराघरांतून मूल्य शिक्षण देण्याची गरज आहे. […]

आंंतरराष्ट्रीय खास लहान मुलींसाठीच असलेला दिवस

११ ऑक्टोबर २०१२! या दिवशी युनायटेड नेशन्स मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर जगभरातील मुलींकरिता  `मुलींच्या दिना’ची सुरुवात करण्यात आली. या दिनाची पार्श्वभूमी मुलींना आंतरराष्ट्रीय पातळीवर येणार्‍या अनेक प्रकारच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविणे ही आहे. हा दिन जगभरात साजरा होण्यासाठी व या दिनाची सुरुवात होण्यासाठी जगभरात कार्यरत असलेली प्लॅन नामक स्वयंसेवी संंस्थेने पुढाकार घेतला. या दिवसाला जगभरात साजरा करण्याची सुरुवात प्लॅन आंतरराष्ट्रीय संस्थेच्या ” मी मुलगी आहे ” या मोहिमेने झाली. […]

जागतिक टपाल दिन

आजच्या टपाल दिनापासून तरी निदान आपण आपल्या नातेवाईकांना, जवळच्या व्यक्तींंना, मित्रमंडळींना एक महिन्याआड पत्र लिहूयात. त्या जुन्या भावना पुन्हा अनुभवूयात आणि येणार्‍या नवीन पिढीला या साहित्यप्रकाराची नव्याने ओळख करुन देऊ. इतर संस्कृती पाळताना ही संस्कृती पुन्हा कशी वृद्धींगत होईल याचा विचार करुया. चला तर मग लागू कामाला आणि इतरांनाही थोडं कामाला लावू. […]

जागतिक प्राणी दिन

‘सर्व सृष्टीवर प्रेम करा’ हे भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारे सांगितले आहे. परंतु, गेल्या काही दशकांत आपण त्यापासून दूर जाऊ लागलो आहोत, आणि हे पूर्णपणे चुकीचे आहे. फक्त आपल्याकडेच नाही; तर जगात अनेक ठिकाणी ( सर्व प्रकारच्या ) प्राणीमात्रांना क्रूरपणे वागवले जाते किंवा त्यांच्याकडे दुर्लक्षच केले जाते. ही परिस्थिती बदलून सजीवांबद्दलची ममता व्यक्त करण्यासाठी हा दिवस जगभर साजरा केला जातो.’सर्व सृष्टीवर प्रेम करा’ हे भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारे सांगितले आहे. परंतु, गेल्या काही दशकांत आपण त्यापासून दूर जाऊ लागलो आहोत, आणि हे पूर्णपणे चुकीचे आहे. फक्त आपल्याकडेच नाही; तर जगात अनेक ठिकाणी ( सर्व प्रकारच्या ) प्राणीमात्रांना क्रूरपणे वागवले जाते किंवा त्यांच्याकडे दुर्लक्षच केले जाते. ही परिस्थिती बदलून सजीवांबद्दलची ममता व्यक्त करण्यासाठी आज जागतिक प्राणी दिन जगभर साजरा केला जातो. […]

प्राचीन भारतीय गणित – इतिहास आणि सद्यस्थिती

शाळेच्या वयापासूनच आपण गणित आणि भूमिती हे विषय म्हटले की थोडा धसकाच घेतो, नाही का? काही जणांना गणिताची मुळात आवड असते पण काही मात्र त्याकडे रुक्ष विषय, आकडेमोड म्हणूनच पाहतात. पण भारतीय व्यवहारात आणि इतिहासात गणिताची सुरुवात आणि रुजवात कशी झाली हे समजून घेण मात्र तितकच रंजक आहे बर का! हा विषय तसा विस्ताराने मांडण्याचा आहे. पण वाचकांची उत्सुकता वाढवून त्यांना या विषयाची अधिक माहिती घेण्यासाठी प्रोत्साहन मिळावं आणि त्यासाठी किमान काही प्राथमिक माहिती हाती असावी इतकाच या लेखाचा मर्यादित उद्देश आहे. […]

शिक्षक दिन

पूर्वीचे शिक्षक आणि आताचे शिक्षक यांच्यात खूप तफावत दिसून येते. अहो म्हणजे पूर्वीचे शिक्षक मजा घेत शिकवत. आताच्या शिक्षकांना प्रचंड तणावाखाली वावरायला लागतं. त्यामागची कारणंही तशीच आहेत म्हणा. पूर्वी पालकच शिक्षकांना पूर्ण मुभा देत असत की , तुम्हाला वाटेल ते करा ठोका , मारा पण आमच्या मडक्याला घडवा , पण आता जरा जरी शिक्षक ओरडले तरी किंवा फटकावलं तर लगेच पालक असे व्यक्त होतात की जणूकाही शिक्षकांनी जीव घ्यायचाच बाकी ठेवला आहे. […]

सर्वोत्तम व्हा, सर्वोत्तम द्या

खरे तर आयुष्याच्या वाटेवरून चालताना हे असे चार रस्ते क्षणोक्षणी एकत्र येतात. छोटे मोठे निर्णय हे सतत घ्यावे लागतात. गुगल मॅप सारखे सतत कुणीतरी सोबत असतेच असं नाही. आणि कुणी असे असलेच सोबत तर कधी कधी त्या सिग्नल नसलेल्या मोबाईल सारखी अवस्था होऊ शकते की! अशावेळी निर्णय हा स्वतःलाच घ्यावा लागतो. […]

1 97 98 99 100 101 160
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..