लांबपल्ल्याच्या ट्रेनमधील शौचालयातून मल-मुत्राचा निचरा
सध्या देशात सर्वत्र स्वच्छता अभियान कार्यक्रमा अंतर्गत हागणदारीमुक्त गाव योजना सर्व जिल्ह्यातील गाव-खेड्यात जोरात चालू आहे. परंतू अजूनही मुंबई सारख्या शहरातील स्वच्छतेबद्दल ‘सुज्ञास सांगणे नलगे’ असे आहे. रोज सकाळी रेल्वेच्या बऱ्याच ट्रॅकलगतच्या जागेत केले जाणारे प्रातर्विधी बद्दल न बोलणेच बरे. तसेच चालत्या आणि स्टेशनमध्ये थांबलेल्या लांबपल्ल्याच्या ट्रेनमधील शौचालयातून मल-मूत्राच्या होणाऱ्या निचऱ्याने स्टेशन आणि आसपासचा परिसर दुर्गंधीयुक्त […]