कॉफी गाळापासून बायो-डिझेल !
गरज ही शोधाची जननी आहे असे म्हंटले जाते आणि ते खरं आहे असे आत्तापर्यंतच्या संशोधाने सिद्ध केले आहे. नेवाडा (लास-व्हेगास) प्रांतातील संशोधक श्री. मनो मिश्रा, सुसांत मोहापात्रा आणि नरसिंहराव कोंडामूडी यांच्या एकत्रित संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की कॉफी बनविल्या नंतर राहिलेल्या गाळापासून स्वस्त, भरपूर आणि प्रदूषणमुक्त बायो-डिझेल बनविणे शक्य झाले आहे. भविष्यात हे बायो-डिझेल मोटारी आणि ट्रक यासाठी वापरणे शक्य होईल.
[…]