कोकणची मुंबई; नको रे बाप्पा !
मुंबई, पुणे किंवा अन्य कोणत्याही मोठ्या शहरातला ऑक्सिजन संपत चाललाय. कोकणात मात्र तो मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. भविष्यातील पर्यटन काही बघण्यासाठी कमी आणि निर्मळ प्राणवायू मिळावा म्हणून जास्त होणार आहे याची जाणीव राज्यकर्त्यांनी नसली तरी स्थानिक जनतेने मात्र ठेवायला हवी. स्थानिक लोक्प्रतीनिधिनीही जनतेच्या या भावनांची कदर करून आपले पक्षभेद विसरून कोकणच कोकणत्व टिकवून ठेवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि त्यांना तसं करण्यासाठी जनतेनेही (आणि विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही) त्यांच्यावर दबाव आणला पाहिजे. ही काळाची गरज आहे. […]