आज नाही तर उद्या हे दुःखांचे काळे ढग नक्कीच आपल्या जीवनातून निघून जातील व सुखाचा सूर्योदय होईल. म्हणून ह्या दुःखाला एक रात्र समजा. रात्र कितीही काळीभोर असली तरी सूर्याची सुखद सोनेरी किरणे ही आपल्या आयुष्यावर अचूक वेळी पडतीलच. ह्या रात्रीचा स्वीकार करा. स्वीकारभाव अनेक कठीण समस्यांना सामोरे जाण्याचे बळ देईल. त्यातच आहे खरा आनंद. […]
वस्तु, पदार्थ, प्रकृती सर्वांची आवश्यकता आपल्याला आहे. त्यांचा शिवाय आपले जीवन नीरस आहे. म्हणून त्यांना ही हृदयाच्या निर्मळ भावनांनी धन्यवाद. तसेच ज्या ईश्वराने वेळोवेळी आपल्याला मदत केली. जिथे सगळ्या आशा संपल्या होत्या अशा वेळी जीवन सुखांनी भरून टाकले अश्या त्या परम सत्येला धन्यवाद करायला विसरू नका. हा धन्यवाद मंत्र सतत करत राहिले तर कधीच दुःखाची झळ आपल्याला लागू शकणार नाही. […]
फणस हा सदाहरित वृक्ष असून मूलस्थान भारतीय द्वीपकल्प आहे असे समजले जाते. त्याचे शास्त्रीय नाव Artocarpus heterophyllus (Family Moraceae) आहे. यास इंग्लिश मध्ये जॅकफ्रुट म्हणतात […]
पुरातन काळातील कथा आपल्याला हेच शिकवतात की जितके आपण शांत, प्रेमळ राहू तितके लोकांचे आवडते आणि जितके अहंकारी, तापट स्वभाव तितकेच लोकांचे नावडते. आज आपल्यासमोर जे आदर्श व्यक्ति आहेत त्यांच्या जीवनामध्ये संतुलन दिसून येते स्वतःवर नियंत्रण ठेवणारा व्यक्तीच दुस-यांना नियंत्रित करू शकतो. आपले मात्र संपूर्ण जीवन दुसयाला नियंत्रण करण्यामध्ये व्यतीत होते. […]
३ मे १९५९ पासून मराठी भाषिक प्रदेशात साराबंदीचा प्रचार करण्यात आला. सीमा भागातील १५० गावात साराबंदीचे आंदोलन सुरू करण्याचे ठरविण्यात आले. परंतु हे आंदोलन करतांना दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आले. साराबंदी आंदोलन करताना मराठी व कानडी भाषिकांत संघर्ष होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी व साराबंदीचा निर्णय गावच्या जनतेने स्वयंस्फुर्तीने घ्यावा, असे ते दोन निर्णय होते. त्याला लोकांचा प्रतिसादही मिळाला. […]
एकीकडे लोक पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसरात्र एक करतात. अशीच काहीशी जिद्द उरी बाळगून सोलापुरातील एका महिलेनं भाकरी बनवण्याच्या उद्योगातून मोठी भरारी घेतली आहे. तसचं अस्सल महाराष्ट्राचं धान्य असलेल्या ज्वारीला लौकिक प्राप्त करून दिलं आहे. पाहुयात या महिला उद्योजिकेची यशस्वी भरारी. […]
हिंदू धर्मामध्ये ईश्वराची पूजा-अर्चना करणाऱ्या अनेक पद्धती आपण बघतो. खूप भक्ती-भावनेने त्या केल्या जातात. त्यातलीच एक पद्धत म्हणजे पंचामृताने ईश्वराला स्नान घालणे. दूध, दही, तूप, मध, साखर ह्या सर्वांनी त्याला स्नान घातले जाते व त्याचबरोबर आपली भावना अर्पित केली जाते. ह्या भावनांचा तसेच आपला नमस्कार स्वीकारावा हा त्या मागचा उद्देश्य. […]
पुढचे दहा दिवस आनंदाचे, चैतन्याचे, मोठमोठ्याने आरती म्हणण्याचे, मोदक आणि खिरापतीवर ताव मारण्याचे ! आज सकाळी झाडावरून ओंजळीत काढलेली फुले घरात नेताना त्यांतील दोन फुले अचानक जमिनीवर सांडली. गेल्या दोन वर्षात अनेक जिवलग त्या फुलांसारखे हातातून निसटले. “उरलेल्या” फुलांनिशी हा सण साजरा करायचा आहे. […]
पार्वती व शंकर यांच्या स्तुतीपर असलेले हे स्तोत्र बहुतांश उपेंद्रवज्रा/इंद्रवज्रा वृत्तात रचलेले असून अत्यंत रसाळ व तितकेच समजण्यास सोपे आहे. त्याच्या पहिल्याच श्लोकातील ‘नगेंद्रकन्या’ या उल्लेखाने कालिदासाच्या कुमारसंभवातील पहिल्या सर्गातील ‘उमा’ या शब्दाच्या उपपत्तीची आठवण झाल्याखेरीज रहात नाही. […]