संधिप्रकाशात उभी असणारी झाडे अचंबित होऊन खाली पहात होती. खाली पसरलेल्या सावल्यात , विविध वयोगटातील असंख्य मुलं , शांतपणानं बसली होती . कुणीच बोलत नव्हतं . एक प्रकारचा आत्मविश्वास आणि निर्धार त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता . त्यांच्या हातात घोषणा लिहिलेले बोर्ड दिसत होते . फारच वेगळ्या घोषणा होत्या . […]
दिवाळी अंकांची दुनिया आणि व्यथा अधिकच वेगळी- उणेपुरे तीन चार महिन्यांचे आयुष्य, किमती शेकड्यात म्हणून ही इंडस्ट्री कायम ग्रंथालयांच्या आणि जाहिरातींच्या जीवावर चालली आहे. मग ७५ वर्षांचे आश्चर्य अधिक वाटते. नेटाने वल्ही मारणारे संपादक येथवर नाव आणून सोडतात तेव्हा आपण त्यांच्याबद्दल किमान कृतज्ञ तरी राहायला हवे. […]
सीताफळ हे मूळचे वेस्ट इंडिज बेटे व दक्षिण अमेरिकेचे. त्यानंतर ते भारतात आले. सीताफळाचे झाड सहजच कुठेही, माळरानावर उगवते किंवा त्याची लागवडही करतात. याचे शास्त्रीय नाव Annona squamosa आहे. हे उष्णकटिबंधीय अमेरिकेच्या आणि वेस्ट इंडीजच्या काही भागांमधे आढळणारे. खरे तर याचे नांव शीतफळ. नंतर त्याचा अपभ्रंश शिताफळ व मग सीताफळ असा झाला. […]
मागील तीन महिन्यात जहाजावरुन दिसणाऱ्या बेटाचे ज्याचे नाव पेबेलॉकॉन आयलंड आहे त्याच्याबद्दल सगळ्यांकडून खूप ऐकले होते. जहाजावरुन आयलंड दिसायचं पण थोडंसंच. पाण्याच्या वर तरंगणारी थोडीशी हिरवीगार झाडी आणि एका चिमणीतून जळणाऱ्या गॅसची एक तांबडी फडफडणारी ज्वाला. रात्रीच्या निरव शांततेत आणि अंधारात तर ही ज्वाला आणखीनच प्रखर दिसायची. […]
दुपारी एक वाजता जाणाऱ्या सेकंड इंजिनियर कडून हॅन्ड ओव्हर आणि माझ्याकडून टेक ओव्हर सुरु झाले. खाली इंजिन रूम मध्ये वेगळी लिफ्ट मेन डेकवरून खाली इंजिन रूम चे पाच मजले. दुसऱ्या मजल्यावर कंट्रोल रूम च्या खाली आणखी तीन मजले. […]
माझ्यावर औषधोपचार सुरु झाले सतीश गांधी डॉक्टरांनी मला पेनीसिलीनचे इंजेक्शन द्यावे लागेल असे सांगितलं. त्यावेळेस हे इंजेक्शन द्यायला आणि त्यातल्या त्यात साडे सहा वर्षांच्या मुलाला द्यायचे याबद्दल गांधी डॉक्टरांसह सगळ्यांनाच भीती वाटत होती. […]
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आज शंभराव्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्त त्यांच्यावर मराठीसृष्टीच्या लेखकांनी लिहिलेल्या काही लेखांचे हे संकलन…. […]
सेलर्स वाईफ म्हणून तिला काही नातेवाईक आणि इतरांकडून खूप वेगवेगळ्या आणि विचित्र असा वागण्याचा अनुभव येत असतो. बहुतेक जण तिच्याकडे सहानुभूतीने वागतात. सुरवातीला तिला सगळ्यांच्या वागण्याचा त्रास व्हायचा पण माझ्या आई बाबांच्या पाठींब्यामुळे ती कोणालाही सडेतोड उत्तरं द्यायला लागली. […]
जकार्ता सोडल्यावर बोट निघाल्यापासून तासाभरात निळ्याशार समुद्रात गेल्यावर वारा आणि लाटांमुळे बोट रोलिंग करायला म्हणजेच घड्याळाच्या दोलका प्रमाणे इकडून तिकडे हलायला लागली होती. सकाळचे सव्वा आठ की साडेआठ वाजता बोटीत येऊन सीटवर बसल्या बसल्या थंडगार एसी मुळे जी झोप लागली ती दोन तासांनी अनाउन्समेंट झाली नसती तर कदाचित उडाली नसती. […]