पार्वती व शंकर यांच्या स्तुतीपर असलेले हे स्तोत्र बहुतांश उपेंद्रवज्रा/इंद्रवज्रा वृत्तात रचलेले असून अत्यंत रसाळ व तितकेच समजण्यास सोपे आहे. त्याच्या पहिल्याच श्लोकातील ‘नगेंद्रकन्या’ या उल्लेखाने कालिदासाच्या कुमारसंभवातील पहिल्या सर्गातील ‘उमा’ या शब्दाच्या उपपत्तीची आठवण झाल्याखेरीज रहात नाही. […]
३३ कोटी देवतांचा उल्लेख केला जातो. पण प्रत्यक्षात शंकरपार्वती पुत्र गणपती हे सर्व देवतांमध्ये आधी दैवत, आराध्य दैवत मानले जाते ही अनादीकाली परंपरा आहे. […]
…… अश्या अनेक रहस्यानी भरलेले गणरायाचे रूप आपल्याला अनेक गुणांनी भरपूर करण्याची प्रेरणा देत आहे. आपण त्यांच्या रूपाला न्याहाळताना त्यांच्या गुणांना स्मृति मध्ये ठेऊन त्यांची पूजा अर्चना करावी व आपल्या जीवनातील विघ्न नष्ट करावे. […]
मंदिर हे समाज मंदिर कसं होऊ शकतं, बहुदिशांनी समाजासाठी अनेक उपक्रम करताना व्यवस्थापन कसं पारदर्शक ठेवता येतं,’ याचा वस्तुपाठ म्हणजे शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थान. हा आदर्श निर्माण झाला तो भाऊंचं कुशल नेतृत्व आणि त्यांच्यातील व्यवस्थापन कौशल्यामुळे. […]
आज सर्वात जास्त मोह असलेल नातं ‘पालक आणि बालक’ हे नातं तणावाचे कारण बनले आहे. ह्या कोरोंना काळामध्ये मुलांच्या भविष्याला घेऊन सर्व पालक चिंतित आहेत. फक्त भविष्य नाही पण आज ह्या नात्यामध्ये जो दुरावा वाढत चालला आहे त्यामुळे ही चिंता वाढत चालली आहे. प्रत्येक पालकांच्या तोंडातून हे शब्द ऐकायला मिळतात की ‘ आजची मुलं म्हणजे…. ’. खरंच का ही मुलं इतकी धुमाकूळ घालतात की आपल्याला त्यांना सांभाळणं इतकं कठीण होऊन जातं? […]
डोंगर माथ्यावरून निघणाऱ्या ज्वाला डोंगराच्या पायथ्यावरुन, मध्यावरून का निघत नसाव्यात याचे कुतूहल वाटू लागले पण लगेचच तो डोंगरच जर बाहेर पडणाऱ्या तप्त लाव्ह्या पासून बनला असेल असं वाटून मला पडलेले कुतूहल लगेचच शमले. बराच वेळ जहाज ज्वालामुखीचा उद्रेक झालेल्या बेटाच्या दिशेनेच चालले होते पण जहाजाची दिशा बदलली असल्याचे जाणवले कदाचित कॅप्टन ब्रिजवर गेला असावा आणि त्याने जहाज बेटाजवळून न नेता लांबून वळवण्यासाठी सूचना दिल्या असाव्यात. […]
आज जीवनात कोणताही बदलाव आणायचा असेल तर मनुष्य पहिला प्रश्न विचारतो ‘मीच का ?’ परिवर्तनाची अपेक्षा नेहमी दुसऱ्यांकडून केली जाते. पण ‘ स्वपरिवर्तनानेच विश्व परिवर्तन होते. हे आपण लक्षात ठेवावे. […]
सगळं काही “साथी हाथ बढाना ” टाईप. १०-१२ जणी मिळून तितक्याच घरांसाठी वाळवण आणि साठवण निगुतीने करायच्या. मेहनताना वर लिहिलाय तसा – किंचित चव. तुलना वगैरे नसायची. २-३ महिन्यात वर्षभराची बेगमी ! त्याकाळी हे सगळंच सर्रास दुकानांमध्ये मिळत नसे. त्यामुळे गृहिणी जिंदाबाद ! […]