ETF म्हणजेच एक्चेंज ट्रेडेड फंड अलीकडे लोकप्रिय गुंतवणुक पर्याय म्हणुन नावारूपाला येतोय. म्युच्युअल फंडांच्या तुलनेत याचा एक्स्पेन्सेस रेशिओ खुप कमी आहे म्हणुनच हा एक स्वस्त गुंतवणुक पर्याय मानला जातो. प्रस्तुत लेखात मी एक्चेंज ट्रेडेड फंड (ETF) हा विषय थोडक्यात सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. […]
भारतात कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यात अंजिराची लागवड केली जाते. पिकलेली ताजी अंजीरे रुचकर असतात. सुकविलेली गोड फळे तसेच त्यांचा मुरंबा खाल्ला जातो. पूर्ण पिकून गळून पडलेल्या अंजिरापासून खाण्यासाठी सुकी अंजिरे तयार करतात. […]
आपल्याला स्वतःला बदलण्याची आवश्यकता आहे. ब्लेम गेम कितीही खेळले तरी हार मात्र आपलीच होते. म्हणून प्रत्येक परिस्थिती, व्यक्ति.. .. सर्वांकडून शिकून पुढच्या वर्गात जाण्याचा प्रयत्न करावा. […]
पन्नास वर्षे कालनदीतून वाहून गेली आणि ती सगळी चिमुरडी(?) मुले, आता साठी उलटलेली आजोबा मंडळी झाल्यावर पहिल्यांदाच औपचारिकरीत्या दोन दिवसांसाठी भेटली. […]
हवामान सकाळपासून खराब होणार आहे असा व्हेदर फोरकास्ट आदल्या दिवशीच मिळाला होता त्यामानाने संध्याकाळी साडे सहाला डिनर होईपर्यंत सहन करण्याइतपत जहाज हेलकावत होते. पण रात्री दहा नंतर वाऱ्याचा वेग वाढला होता. सुं सुं करत वाहणाऱ्या वाऱ्यासोबत लाटांनी सुद्धा आक्राळ विक्राळ रूप धारण केले होते. जहाज येणाऱ्या लाटेवर स्वार होऊन दुसरी लाट यायच्या आत दोन्हीही लाटांच्या मध्ये धाडकन खाली आदळत होते आणि पुन्हा एकदा उसळी मारल्या सारखं वर येत होतं. […]
बी ई करताना अलिबागच्या जे एस एम कॉलेज ची खूप आठवण यायची. डिग्री करताना फर्स्ट ईयर मध्ये प्रत्येक शुक्रवारी शेवटची मालदार नाहीतर अजंता पकडून अलिबागला यायचे आणि सोमवारी पहिली अजंता पुन्हा मुंबईला जायचे. साहजिकच पुढल्या वर्षी ड्रॉप लागण्यासाठी कमीत कमी जेवढ्या केट्या लागतात त्याच्यापेक्षा डबल केट्या लागल्या. […]
एकदा का मुलाच्या वडिलांनी, आईने, मोठ्या मुलाने व धाकट्या मुलीने ‘छान आहे’ म्हटले की मुलगी पसंत झाली मानायचे. अगदी तसेच वॉशिंग्टन-दिल्लीच्या विश्वबॅंक कार्यालयाने, दारेसालामच्या आफ्रिकन डेव्हलपमेंट बॅकेने आणि झांझीबारच्या परिवहन मंत्रालयाने माझी चरित्रसूची म्हणजे बायोडेटा ओके केल्याचे म्हणजे ‘मी पसंत पडल्याचे’ संगणक टपाल आले. […]
कितीही महत्वाचे काम असले तरी त्यांच्या नमाज पठणाची वेळ झाली की ते काम थांबवून जातात असं ऐकलं होतं पण मला तसा अनुभव कोणाकडूनच आला नाही. उलट कॉफी ब्रेक किंवा जेवणाची वेळ होतं आली की मीच त्यांना त्यांच्या भाषेत बोलायचो, मकान डुलु,मकान डुलु म्हणजे जेवायला चला जेवायला चला. […]