याच काळात एका थोर क्रांतिकारकांनं सत्याग्रह करून सीमावासीयाना प्रेरणा दिली. ते होते क्रांतिसिंह नानासाहेब पाटील! कारवारात नानासाहेब व कारवारचे काशीनाथ नाडकर्णी यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रहाच आंदोलन झालं. त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देऊन सीमावासीयांत नवचैतन्य निर्माण केलं. […]
आपण शाही पुलावावर पेरलेला सुका मेवा बघितला असेल, त्यावर भरपूर काजू पेरलेला पुलाव फार आकर्षक दिसतो. आज आपण या काजूचा विचार करणार आहोत. काजू हा सदाहरित वृक्ष अॅनाकार्डिएसी म्हणजेच आम्र कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव अॅनाकार्डियम ऑक्सिडेंटेल आहे. या वृक्षाचे मूलस्थान मध्य अमेरिका आणि इतर उष्ण प्रदेशातील देश आहेत. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीज लोकांनी हे फळ […]
बाईंनी अध्यक्षीय भाषण सुरू केलं. ते संपल. मला फारसं काही कळलं नाही. लक्षात राहिली ती त्यांची पोडामवर आडवा हात ठेवून, ठासून प्रत्येक शब्द उच्चारण्याची शैली, ‘श’ आणि ‘ष’ यांच्यातील फरक अधोरेखित करणारं उच्चारण, कानाला गुंगवून टाकणारा नाद आणि प्रामाणिकपणे स्वत:चे विचार स्पष्ट करण्याची धाटणी. भाषण संपल्यावर, कार्यक्रम संपल्यावर मी आईला म्हणालो,“तुझ्यासारखंच बोलतात त्या.” त्यांची सही घ्यायला धावलो. व.पुं.नी सही छापलेलं लेटरहेड दिलं. बाईंना त्या को–या कागदावर जांभळया पेनानं तिरपी सही केली – ‘ सरोजिनी वैद्य ’. […]
अरे हे काय गोंदवून घेतलंस दंडावर?? एका मित्राला त्याच्या दंडावर केलेली रंगीबेरंगी कलाकारी अभिमानाने दाखवत असताना बघितल्यावर विचारले. रंगीबेरंगी नव्हतं फक्त लाल आणि काळपट हिरव्या रंगात कसली तरी सिँहाच्या तोंडासारखी आकृती होती. […]
निवृत्त न्यायाधीश मा. प्रदीप जोशी यांनी भारतातील या असंभव, अशक्यप्राय संकल्पनेवर लिहिलेलं, भारतीय विचार साधनेतर्फे ३० जून २०२१ ला प्रकाशित झालेलं हे पुस्तक काल श्री किशोर शशीतल आणि डॉ मुकेश कसबेकर यांनी माझ्या हाती ठेवले. […]
गोडांब्या कडे बघूनच कोणालाही डेरेदार वृक्ष प्रत्यक्षात कसे असतात हे लगेच लक्षात येईल. भरगच्च पानांनी नेहमी बहरलेल्या गोडांब्याच्या खाली मे महिन्याच्या गर्मीत सुद्धा थंडगार वाटते. त्याच्या शितल छायेत एकदा बसल्यावर पुन्हा संध्याकाळ होईपर्यंत उठायची इच्छाच होत नाही. […]
2008 साली जे करिअर निवडलं होतं ते सोडून बांधकाम व्यवसाय करताना कुठंतरी मनात खटकायचे की हा व्यवसाय तर कोणीही करू शकतो पण जहाजावर काम करण्यातील वेगळेपणा आणि चॅलेंज याची भुरळ पडली म्हणून हे करियर स्वीकारले आणि त्याच वेगळेपणाला आणि चॅलेंज ला कंटाळून आपण जहाजावरील जॉब सोडून दुसरंच काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय. […]
आज आपण अशा एका व्यक्तीच्या आठवणींना उजाळा देणार आहोत की ज्यांनी मुंबईच्या शैक्षणिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक गोष्टींच्या पायाभरणीत सिंहाचा वाटा उचलला आहे. अशी ही महान व्यक्ती म्हणजे जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे, म्हणजेच नाना शंकर शेठ. आधुनिक मुंबईचे शिल्पकार. वयाच्या बाविसाव्या वर्षापासून अगदी मृत्यूपर्यंत म्हणजे ६५ व्या वर्षापर्यंत मुंबईच्या जडणघडणीत त्यांनी केलेले योगदान अत्यंत मोलाचे आहे. या महिना अखेरीस , म्हणजे, 31 जुलै 2021 ला त्यांचा 156 वा स्मृतीदिन आहे. त्यानिमिताने हा त्यांच्या योगदानाचा उहापोह ! […]