सकाळी सात च्या सुमारासच त्या परिसरात गेल्याने धुक्याची अंधुकशी चादर पसरली होती. मध्येच एखाद्या वाडीतील दोन चार घरातून बाहेर पडणारा धूर धुक्यात मिसळताना दिसत होता. अधून मधून येणाऱ्या पावसाच्या लहान लहान सरींनी पळसाच्या पानांवर पावसाचे टपोरे थेंब खाली पडायच्या अवस्थेत खोळंबल्यासारखे दिसत होते. […]
आज बाबासाहेबांनी शंभराव्या वर्षात पदार्पण केले आहे. आम्हा पुणेकरांचे, ते एक ‘ऐतिहासिक वैभव’च आहे! आमच्या तीन पिढ्यांनी त्यांच्या तोंडून छत्रपतींचे चरित्र ऐकले, पाहिले. […]
तीन बैलजोड्या होत्या त्यातील एक एक जोडी कमी होत गेली. शेवटी शेवटी तर एकच बैल उरला होता. एक बैल काहीच कामाचा नसल्याने त्याला विकण्या शिवाय पर्याय नव्हता असे असूनही त्याला विकायची ईच्छा होत नव्हती. एकाच बैलाला काही वर्षे संभाळल्यावर बाबांच्या एका मित्राने त्याला विकत नेण्याची तयारी दर्शवली. […]
रस्त्यावरून जाणाऱ्या गाडयांना हातातील गजरे हलवून दाखवणाऱ्या त्या लहान मुलीला, बाय गजरे कसे दिले विचारले आणि तिने दहाला एक सांगताच वीस रुपयात दोन गजरे विकत घेतले. न उमललेल्या मोगऱ्याच्या कळ्यांपासून बनवलेल्या डझनभर गजऱ्यातून फक्त दोन गजरे घेतल्याने देखील त्या लहान मुलीच्या चेहऱ्यावर लहानसे हसू उमलले. […]
इजिप्त हे जगातील पहिले साम्राज्य आहे ज्यांनी या पृथ्वीवर प्रथमतः मानवनिर्मित कॅनॉल बनवला. हा कॅनॉल मेडिटेरीनियन समुद्र आणि रेड सी (लाल समुद्र) यांना जोडतो. हाच कॅनॉल याच्या भौगोलिक स्थानामुळे पूर्व आणि पश्चिम जग जोडणारा एक दुवा मानला जातो. या कॅनॉल ची खुदाई आणि बांधकाम वेगवेगळ्या शासकांच्या काळात शेकडो वर्षे होत आले. कॅनॉल च्या उत्तर भागाला पोर्ट साईड तर दक्षिण भागाला सुएझ ही ठिकाणं आहेत. […]
जेम्स थॉमस मोल्सवर्थ, ज्याची मातृभाषा इंग्रजी होती, ज्याचा मराठीशी काही संबंध नव्हता, असा एक ब्रिटीश आपल्या भाषेच्या प्रेमात पडतो काय, त्यासाठी आयुष्य वाहून टाकून शेवटपर्यंत अविवाहित राहतो काय, आणि कोण कुठले परके ब्रिटीश त्याच्याकडून १८५७ साली आपल्याला पुढे आयुष्यभर पुरेल असा सुधारित शब्दकोश तयार करुन घेतात काय, सगळेच अघटित आहे. […]
गेल्या काही दिवसातल्या संधिप्रकाशातल्या सावल्यांचा गोष्टी अनेकांच्या कानावर गेल्या होत्या. त्यामुळं सगळे उत्सुकतेनं आले होते. उत्सुकता नावालाच, प्रत्येकजण भलंमोठं प्रश्नचिन्ह घेऊन आला होता. पण सुरुवात कुठून करायची हे कुणाच्या लक्षात येत नव्हतं. […]
तेलवाहू तसेच केमिकल वाहून नेणाऱ्या जहाजांच्या अकोमोडेशन वर मोठ्या आकारात नो स्मोकिंग ही सूचना लिहलेली असते. लहानपणापासून मुंबईहुन मांडव्याला आणि अलिबागला जाताना लाँच मधून जाताना मुंबईच्या बंदरात उभ्या असलेल्या मोठ्या मोठ्या जहाजांवर एवढ्या मोठ्या अक्षरांत नो स्मोकिंग का लिहलंय याबद्दल प्री सी ट्रेनिंग कोर्सला जाईपर्यंत नेहमीच कुतूहल वाटायचं. […]
१९३४ साली प्रसिद्ध चित्रपट निर्माता व दिग्दर्शक वॉल्ट डिज्नी यांच्या कल्पनेतून डोनॉल्ड डकची निर्मिती सुचली. चित्रकार डिक लूंडी यांनी डोनाल्ड डकची प्रतिमा चित्रित केली होती. […]