मे महिन्यात घराचे बांधकाम सुरु झाले होते तशातच डिसेंबर महिन्यात आम्हाला दुसरे बाळ होणार आहे समजल्यावर आनंद झाला. किमया ताईने ह्यावेळी आपण कोणतीही रिस्क न घेता प्लॅन्ड सीझर करू त्यासाठी तिने तिच्या हॉस्पिटलला येणाऱ्या डॉ. रेखा थोटे यांच्याकडे कन्सल्ट करायला सांगितले, त्यांनी पण मागील डिलिव्हरीचे सगळे रिपोर्ट आणि हिस्टरी पाहिली आणि सीझरच करायचा निर्णय घेतला. […]
आपण गेले कित्येक वर्षे ज्यावर संगीत, माहिती व इतर गोष्टीचा आनंद घेत आहोत, ज्याने आपले बालपण तरुणपण आनंदात गेले त्या आकाशवाणी ला आज ९४ वर्षे पूर्ण होत आहेत. भारतात २३ जुलै १९२७ रोजी मुंबई आणि कोलकाता येथे आकाशवाणीचे प्रसारण सुरू झाले. त्यामुळे दरवर्षी २३ जुलै हा प्रसारण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ‘नमस्कार! हे आकाशवाणीचे….. केंद्र. […]
बहुतेक सर्व जहाजांवर एकच मेन इंजिन असते. हे मेन इंजिन जहाजाच्या नेव्हीगेशनल ब्रिज, इंजिन कंट्रोल रूम तसेच प्रत्यक्ष इंजिन जवळील कंट्रोल वरून चालू करता येते. पुढे जाण्यासाठी अहेड मुव्हमेन्ट आणि मागे किंवा रिव्हर्स येण्यासाठी अस्टर्न मुव्हमेन्ट असा शब्द प्रयोग केला जातो. जहाज सुरु करून त्याचा वेग कमी जास्त करण्यासाठी इंजिन कंट्रोल कॉन्सोल नावाचा एक लिव्हर असतो ज्याला अहेड आणि अस्टर्न म्हणजेच पुढे आणि मागे नेण्यासाठी डेड स्लो, स्लो, हाफ आणि फुल्ल तसेच मॅक्स फुल्ल अशा दोन्हीही बाजूला इंजिनचा स्पीड सेट केलेला असतो. […]
अलौकिक बुद्धीमत्ता, विद्वत्ता असलेली व्यक्ती जागतिक वाड्.मयातही सापडणं दुर्मिळच आहे. अशा ह्या श्रीव्यासांचे पुण्यस्मरण या गुरूपौर्णिमेच्या निमित्तानं करणं औचित्यपूर्ण आहेच, ते भारतीय समाजाचं कर्तव्य आहे. […]
कोकण हा महाराष्ट्रातील अत्यंत रमणीय सदाहरित अरण्याचा प्रदेश आहे. ह्या प्रदेशावर निसर्गाचा वरदहस्त आहे. या प्रदेशात आंबा, फणस काजू यासारखे बहुगुणी फळे आहेत. पण ह्या फळामध्ये गेली एक दोन दशके दुर्लक्षित राहिलेले बहुगुणी औषधी फळ आहे. त्याचो आज आपण माहिती घेणार आहोत. त्याचे नाव कोकम किंवा रातांबा आहे. उन्हाळ्यात कोकणात आंबा, फणस व काजू सारखी अतिरथी […]
कितीतरी पारितोषिके मिळालेली स्मिता मला भावून गेली. अतिशय बोलक्या डोळ्याची, मनस्वी कलावंत ! ” उंबरठा ” हा सर्वार्थाने तिचा चित्रपट होता. आणि हे गाणेही केवळ तिचेच होते. जब्बारला तिच्यापेक्षा समर्थ पर्याय त्यावेळी तरी मिळाला नसता. […]
आणखीन एका पक्षाने आमचं लक्ष वेधून घेतले आणि तो म्हणजे फ्लेमिंगो! त्यांचे रंग, लाल, गुलाबी आणि अबोली. त्याचा मुलाचा रंग राखाडी असतो. परंतु, (कॅरटोनॉइड) गाजरासारख्या कंदमुळाच्या खाण्यातून त्यांना असे विविध छटांचे रंग प्राप्त होतात. […]
हळू हळू महंमद बसलेले बास्केट एकदाचे खाली जायला सुरवात झाली. बास्केट खाली जात असताना दोलका प्रमाणे हलत असल्याने जहाजाच्या बाजूवर येऊन आदळते की काय असे वाटत होते पण केवळ अर्ध्या फुटांवरून ते दुसऱ्या बाजूला जात असल्याने अधांतरी लटकलेला महंमद सुमारे साडे तीन तासांनी खाली बोटीत कसाबसा एकदाचा उतरला. मेडिकल साइन ऑफ होऊन घरी जाण्याकरिता जहाजावरुन उतरल्यावर सगळ्यांना हात करून निरोप घेऊन तो बोट मध्ये बाहेर एका बाकड्यावर बसला. […]
१९३६ पासून त्यांचे सवाई गंधर्व यांच्याकडे रीतसर शिक्षण सुरू झाले आणि त्यानंतर ख्यालगायिका हीच त्यांची ओळख बनली. १९३२ ते ३५ या काळात गंगूबाईनी “गांधारी हनगल’ या नावाने जवळ जवळ साठेक गाणी ध्वनि मुद्रीत केली. मिया मल्हार, खंबायती, जोगिया, मालकंस, अडाणा, शुद्धसारंग, मुलतानी, शंकरा, हिंडोल, बागेश्री, देस, मांड, दुर्गा, बहार, भूपाली, बिहाग, पूरिया, कामोद, भैरवी, अशा विविध रागातल्या तीन साडेतीन मिनिटाच्या ध्वनिमुद्रिका त्यांनी दिल्या. […]