जून २०१८ मध्ये आम्ही जर्मनीत डुईसबर्ग इथे राहावयास गेलो होतो. भारतात परतण्यापूर्वी चार-पाच दिवस आधी मुलगा व सुनेने हा अनोखा आणि नयनरम्य प्राणिसंग्रहालय बघून घ्या असा आग्रह धरला. म्हणून आम्ही घरून नाश्ता करून व थोडा खाऊ- पाणी बरोबर घेऊन २७ जून २०१८ रोजी सकाळी दहाच्या सुमारास प्राणीसंग्रहालय पाहण्यासाठी निघालो. त्यांच्या घरापासून केवळ ३ बस स्टॉप इतके […]
भुसावळला वसंत टॉकीज च्या वरती “राजश्री ” चे ऑफिस होते. गल्लीमित्र कमलाकर भोळे याचे वडील तेथे नोकरीला होते. बरेचदा सायकलवर मोठ्या लोखंडी पेट्या किंवा रिळांच्या बॉक्सेसची ते ने-आण करीत. त्यांनी आम्हाला एकदा टीप दिली होती- “कोणताही सिनेमा पाहायचा असेल तर तो फर्स्ट डे फर्स्ट शो बघावा किंवा लास्ट डे लास्ट शो !”
कारण गावात रिळं आलीत की टॉकीज मधील पहिल्या शोला कापाकापी नसते. […]
शेवटी १ नोव्हेंबर १९५८ रोजी सीमाप्रश्नावर सत्याग्रह करण्याचा संयुक्त महाराष्ट्र समितीने निर्णय घेतला. भाई माधवराव बागल यांनी पहिल्या सत्याग्रहाच्या तुकडीचे नेतृत्व केले. तो शनिवारचा दिवस होता. बेळगावात बाजाराचा दिवस असतांनाही सत्याग्रहाला अभुतपूर्व पाठिंबा मिळाला. विशेष म्हणजे बेळगावातील कन्नड भाषिकांनीही आपले सर्व व्यवहार बंद ठेऊन समितीच्या आंदोलनाला एक प्रकारे पाठिंबाच व्यक्त केला होता. […]
डाळिंबाची लागवड फार प्राचीन काळापासून म्हणजे इ.स. पुर्व 3500 वर्षापूर्वी झाल्याचा उल्लेख आढळून येतो; डाळिंबाचे उगमस्थान इराण असून इ.स. 2000 वर्षापासून डाळिंबाची लागवड केली जात होती असे आढळते. इराण प्रमाणेच स्पेन, इजिप्त, अफगाणिस्थान, मोराक्को, बलूचीस्थान, पाकीस्तान, इराक, ब्रम्हदेश चीन, जपान, अमेरिका, रशिया, भारत या देशामध्ये लागवड केली जाते. भारतात डाळिंब लागवडीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. महाराष्ट्राचा देशाच्या उत्पादनामध्ये ६६.९० टक्के वाटा आहे. […]
त्यावेळेस जहाजावर इंटरनेट आणि फोनची सुविधा आमच्या त्या जहाजावर उपलब्ध नव्हती. जहाजावर कामावरून सुट्टी झाली आणि संध्याकाळी सात वाजेपर्यंत सगळ्यांची जेवणे आटोपली की एकमेकांशी गप्पा मारणे, हिंदी गाणी किंवा पिक्चर बघणे याशिवाय मनोरंजन करण्यासाठी इतर काही साधने नव्हती. आमच्या बत्ती साबकडे महाभारत आणि रामायण या दूरदर्शनवर चालणाऱ्या मालिकांचे सगळे भाग असणाऱ्या डी व्ही डी होत्या. संध्याकाळी साडे सात वाजता क्रू स्मोक रूम मध्ये टी व्ही वर रामायण ची डी व्ही डी लावली जात असे. रोज एक एक भाग बघितला जायचा. […]
विचार आणि वर्तनाचे (त्यातून कृतीचे) मेंदू हे उगमस्थान असते. त्यावर आपले “होणे” अवलंबून असते. गैरवापर केला तर आपण वेगळे होतो आणि सदुपयोग केला तर वेगळे असतो. आपल्या प्रतिक्रिया आणि प्रतिसाद मेंदूच्या सूचनेबरहुकूम होत असतात. याहीपलीकडे एक कार्य असते- प्रतिक्षिप्त क्रियेचे! […]
संपूर्ण बेटाच्या चारही बाजूला उंचच उंच कड्याप्रमाणे सरळसोट कडा उभा होता. स्वच्छ आणि निळेशार पाणी त्या खडकावर आदळून फेसाळत होते. पांढऱ्या शुभ्र बुड बुड्यानी बेटाभोवती एक वलय निर्माण झाल्यासारखे दिसत होते. जहाज जसं जसं पुढे सरकत होते तस तसे बेटाचे सौंदर्य आणखीनच खुलत चालल्या सारखे दिसत होते. सगळे खलाशी आणि अधिकारी बाहेर येऊन निसर्गाचे अनोखे सौंदर्य न्याहाळत होते. कॅप्टन ने चीफ इंजिनियर ला विचारले, बडा साब आपण ह्या आयलंड ला एक फेरी मारू या का? वीस मिनिटे जातील थोडा स्पीड कमी करावा लागेल, पण तुम्ही हो म्हणत असाल तरच. लगेचच चीफ इंजिनियर ने स्पीड कमी करतोय म्हणून इंजिन कंट्रोल रूम मध्ये फोन करून सांगितले. […]
भांड्यांवर नाव टाकण्यामागे कारण असं असायचं की, कधी शेजारी पाजारी ते भांडं काही वस्तू घालून दिलं, तर ते सहज परत मिळावं व त्याची त्यांच्या भांड्यात सरमिसळ होऊ नये म्हणून…त्यावर नाव असल्याने आपण ते भांडे आपलेच आहे, हे ‘पुराव्याने शाबित’ करु शकतो.. […]
लाईफ बोट दोन प्रकारच्या असतात फ्री फॉल आणि डेव्हीट लाँच टाईप. इमर्जन्सीमध्ये मग जहाजावर लागलेली आग असो किंवा जहाज बुडत असेल अशा परिस्थितीत कॅप्टन अबँन्डड शिप म्हणून घोषणा करतो आणि सगळे जण जाऊन लाईफ बोट मध्ये बसतात. लाईफ बोट खराब हवामानात हलू नये, खाली पडू नये म्हणून जहाजावर विशिष्ट पद्धतीने हुक आणि सेफ्टी सिस्टिम लावून अडकवून ठेवलेली असते. लाईफ बोट मध्ये बसण्यापूर्वी प्रत्येकजण त्याच्या पूर्व निर्देशित ड्युटी प्रमाणे सेफ्टी सिस्टिम आणि हुक काढून बसतात. सगळे आत बसल्यावर कॅप्टन किंवा अजून एखादा जवाबदार अधिकारी लाईफ बोट मधून काढावा लागणारा शेवटचा हुक काढतो ज्यामुळे लाईफ बोट जहाजावरुन पाण्यात उतरवली जाते. फ्री फॉल लाईफ बोट पाण्यात उतरवली जात नाही, ही जहाजाच्या सगळ्यात मागील भागात असते. तिचा हुक आतून रिलीज केला की सुमारे चाळीस फुटांवरून जहाजावरील संपूर्ण क्रू सह ती खाली पाण्यात पडते. सगळ्यांसह उंचावरून पडून पाण्यात डुबकी मारून पुन्हा वर यावी अशी तिची रचना असते. […]
बरेच जणांना प्रश्न पडतो की आम्ही जहाजावर कसे जातो किंवा जहाजावरुन घरी कसे येतो. आम्हाला घ्यायला किंवा सोडायला जहाज मुंबईत किंवा भारतात येते का किंवा कसे. मी असलेले एकही जहाज आजपर्यंत मुंबई काय भारतातील कोणत्याही पोर्ट मध्ये आलेले नाही. फक्त एकदाच सिंगापूरहुन गल्फ मध्ये जाताना भारतीय सागरी हद्दीतून काही तास गेले आहे. जिथे जहाज असेल तिथे आम्हाला पाठवले जाते. मग ते जहाज परदेशात असो किंवा भारतातील कोणत्याही पोर्ट मध्ये असो. जहाज ज्या देशात असेल तिथला विजा, इमिग्रेशन किंवा ईतर सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतरच जहाजावर पाठवले जाते तसेच जहाजावरून घरी पाठवले जाते. जहाजावर जसे कोणाला तरी रिलीव्ह करायला जावे लागते तसेच कोणी रिलिव्हर आल्याशिवाय जहाजावरुन खूप दुर्मिळ वेळा परत यायला मिळते. दुसरा कॅप्टन आल्याशिवाय सध्याचा कॅप्टन जाऊ शकत नाही तसेच पॅम्पमॅन आणि फिटर यांच्यापैकी एखादा खलाशी सुद्धा रिलिव्हर आल्याशिवाय जाऊ शकत नाही. […]