अशी यंत्रणा उपलब्ध करुन देण्याची गरज आहे ज्याद्वारे दृष्टिहीन मतदारांना त्यांच्या मतांचे त्वरित ऑडिओ सत्यापन करता येईल. म्हणून, दृष्टिहीन मतदारांना त्यांच्या मतांची पडताळणी करण्यास सक्षम बनविण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये “इमेज टेक्स्ट टू स्पीच कन्व्हर्जन” ही प्रणाली समाविष्ट केली पाहिजे. […]
महाराष्ट्रामध्ये हा सदाहरित वृक्ष सर्व ठिकाणी आढळतो. परंतु याची शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल नाही. मूळ भारतीय असलेला हा वृक्ष म्यानमार, श्रीलंका, मलेशिया, ते थेट ऑस्ट्रेलिया खंडातही सापडतो. समुद्र्सपाटीवर, नदीनाल्याचे काठ तसेच उत्तुंग पर्वतराजीवर ६००० हजार फुटांपर्यंत याचे वास्तव्य आढळते. […]
‘डॅन ब्राऊन’ यांच्या आजवर गाजलेल्या चार प्रमुख कादंबऱ्या हा- ‘द दा विंची कोड’, ‘एंजल्स अॅन्ड डिमेन्स’, रिसेप्शन पॉइंट’, ‘डिजिटल फॉरेस्ट. यातील ‘द दा विची कोड ही कादंबरी खूप गाजली. २००३ साली प्रसिद्ध झालेली ही कादंबरी पहिल्या आठवड्यातच बेस्ट सेलर ठरली. २००६ पर्यंत जगभर या कादंबरीच्या ६ कोटी प्रती खपल्या. […]
संगणक दोन भागांपासून बनविलेला असतो- हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर ! मानवी शरीरातील बाहेरची कातडी, हाडे,स्नायू हे दृश्य भाग म्हणजे हार्डवेअर ! आणि मन, भावना, आत्मा हे अदृश्य भाग म्हणजे सॉफ्टवेअर ! मात्र हे दोन्ही घटक आतून एकच असतात. तसेच बाह्य विश्व आणि शरीरातील अदृश्य शक्ती एकमेकांना जोडलेले असतात. भावनिक आरोग्य सॉफ्टवेअरशी संबंधित आहे. आपल्या प्रत्येक कृतीमागे ते असते. […]
बालक पालक हा चित्रपट बघताना प्रत्येकाला बरेच काही आठवत असेल जे पन्नाशीच्या पुढे आहेत विशेष करून ती जी पोरे म्हणा कार्टी म्हणा ते व्ही सी आर आणण्यापासून ते नीलचित्र म्हणजे ब्लु फिल्म बघताना ती संपेपर्यंतचे हावभाव पाहून प्रत्येकाला आपले बालपण आठवत असेल अर्थात स्कालर मंडळी सोडून पण कदाचित. मला आठवतंय जत्रेमध्ये दहा पैसे दिले की तंबूमध्ये […]
साक्षात कृष्ण भगवान देखील लहानपणी ‘माखनचोर’ होते, मग सर्वसामान्य माणूस जर ‘चोर’ असेल तर त्यात नवल ते काय? फक्त चोरीचे प्रकार वेगवेगळे, उद्देश मात्र चोरीचाच. प्रत्येक चोरीला शासन होतंच असं नाही, काही चोऱ्यांकडे कानाडोळा केला जातो. […]
त्याकाळी वर्तमानपत्रात कस्टमने जप्त केलेल्या वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांच्या जाहिराती असत. काही जाहिराती ‘छोट्या जाहिराती’ सदरात येत असत. पहिल्या पानावर जाहिरात असायची ती ‘घरोंदा’ कस्टम शाॅपीची! त्या जाहिरातीत परदेशी घड्याळे, पर्फ्युम, कॅमेरे, व्हिडिओ कॅमेरे, टेप रेकाॅर्डर, व्हिसीआर, खेळणी यांची यादी व किंमती दिलेल्या असत. […]
समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले पुणे शहर ही महाराष्ट्राची ‘सांस्कृतिक राजधानी’ आहे. नामांकित शिक्षणसंस्थांमुळे पुणे हे ‘विद्येचे माहेरघर’ मानले जाते. परंतु नवसाला पावणाऱ्या ‘तळ्यातला गणपती’ने पुणेकरांसह संपूर्ण महाराष्ट्रातील भक्तांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अगदी आत्तापर्यंत हे ठिकाण “तळ्यातला गणपती” याच नावाने ओळखले जायचे. […]
आमच्या टेलिफोनमुळे काही विनोदी घटनाही अनुभवास येत होत्या. जेंव्हा सुरवातीला आमच्याकडे टेलिफोन आला तेव्हा आमच्या एका शेजाऱ्याने त्याच्या बायकोला आमच्या फोनवर फोन केला. मी त्याच्या बायकोला जाऊन बोलावून आणलं. यापूर्वी फोनवर कधीही न बोललेली बाई टेलिफोनचा रिसिव्हर हातात धरतात थरथर कापू लागली जणू तिला मलेरियाचा ताप भरलेला असावा. आमच्याच शेजारची दुसरी एक स्त्री टेलिफोनचा रिसिव्हर कानापासून तीन चार इंच लांब धरायची. […]
मराठी चित्रपटांत ललिता पवार, अलका इनामदार, आशा पाटील, सरोज सुखटणकर, लता अरूण, वत्सला देशमुख, माई भिडे, हंसा वाडकर, सुमती गुप्ते, इत्यादींनी ‘आई’ साकारली आहे. नव्या पिढीनुसार मराठी चित्रपटांतील आजची आई बदललेली आहे. तिनं नवीन टेक्नॉलॉजी समजून घेतलेली आहे. आयटी क्षेत्रात काम करुन ती घर-संसार करते आहे. इंटरनेट, फेसबुक, व्हाॅटसअप, ट्वीटर, ब्लाॅग ती लीलया हाताळते आहे. माॅड असली तरी ती काळाप्रमाणे चालणारी एक ‘आई’च आहे. […]