इंटरॅशनल बिझनेस मशिन्स कॉर्पोरेशन म्हणजेच आय.बी.एम. ही आयटी क्षेत्रातील जगात दुसर्या क्रमांकाची कंपनी म्हणून जगजाहीर आहे. “आयबीएमचा सेल्समन अथवा कर्मचारी क्षणाला काही न काही विकत असतो” हे वॅटसनचे वाक्य मात्र आपल्याला विचार करायला लावते. […]
१९७५ सालची गोष्ट आहे. हिंदी व्यावसायिक चित्रपटांच्या गर्दीत ‘अंकुर’ सारख्या कलात्मक चित्रपटाने सिनेरसिकांचे लक्ष वेधून घेतले. शबाना आझमी, अनंत नाग, साधू मेहेर आणि आपली मराठी अभिनेत्री प्रिया तेंडुलकर हिचा ‘अंकुर’ चित्रपट मी भानुविलास थिएटरमध्ये ‘मॅटिनी शो’ ला पाहिला. […]
जर एखाद्या अस्सल पुणेकराचे डोळे व कान बंद करुन पुण्याची सफर घडवली तर तो त्याला नाकाने जाणवणाऱ्या त्या त्या परिचित गंधावरुन ते ते ठिकाण हमखास सांगू शकतो. मी हा प्रयोग एकदा केला. एका अस्सल पुणेकर मित्राचे डोळे व कानावरुन काळी पट्टी लावून त्याला पुण्यातून अनेक ठिकाणी उलटे सुलटे गाडीवरुन फिरविले. मी जिथे जिथे त्याला घेऊन गेलो, त्यानं मला पोपटासारखी ‘अचूक उत्तरं’ दिली. […]
समुद्र किनाऱ्यावर गेल्यानंतर लहान मुलं आपल्या पावलावर ओलसर वाळूचा मोठा थर थापतात. मग हळूच पाऊल काढून घेतल्यावर पावलाच्या पोकळीचं छान घरटं तयार होतं व एक ‘घर’ तयार केल्याचा त्यांना अवर्णनीय आनंद मिळतो. […]
लहान असताना मांडव्याला मामाच्या घरी लाकडी माळ्यावर सकाळी सकाळी लवकर जाग यायची ती समुद्राच्या लाटांच्या आवाजाने. जानेवारीत माघी गणेशोत्सवाला थंडी पडलेली असताना मांडव्यात आम्ही सगळे एकत्र जमायचो. […]
जून महिन्यातील साधारणपणे दुसरा आठवडयाचा सोमवार म्हणजे शाळा सुरु होण्याचा दिवस.. म्हणजेच आजचा दिवस!! दोन वर्षांपूर्वी या दिवशी छोटी मुलं नवीन कपडे घालून शाळेचा श्रीगणेशा करायला जात होती. […]