८ जून १९४८ रोजी एअर इंडियाने भारत इंग्लंड हवाई सेवा सुरू केली. एअर इंडिया इंटरनॅशनल लिमिटेडने मुंबई-लंडन द्वारा कैरो व जिनीव्हा अशा आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीस प्रारंभ केला. त्यावेळी एअर इंडिया जवळ कॉन्स्टेलेशन ७४९ ह्या जातीची तीन विमाने होती. […]
केविन वॉर्वींक याला मी भेटलो आहे त्याचे लेक्चर ऐकले असून एक भन्नाट शास्त्रज्ञ असून माणसापेक्षा यंत्र श्रेष्ठ आहे असे म्हणतो… त्याने काय शोध लावले ते जरा वाचा, वाटल्यास गुगलवर सर्च करून बघा.. समोरच थोडासा साधा पटकन मिसळणारा केवीन वोर्विक उभा होता. आत्ता तो 65 वर्षाचा आहे , मी त्याला भेटलो तेव्हा तो पन्नाशीचा असावा पण कुठलेही अवडंबर न माजवता तो गप्पा मारू लागला. तो ठामपणे म्हणत होता माणसापेक्षा मशीन श्रेष्ठच आहे आम्हा मानवतावादी लोकांना निश्चित ते खटकणारे होते. पण तो कुणाचीच पर्वा करता तो त्याच्या म्हणण्यावर ठाम होता. […]
ह्या वर्षी म्हणजेच ११ मार्च २०२१ रोजी जपान देशाने भोगलेल्या त्सुनामीच्या हाहाकाराला दहा वर्ष पुर्ण झाली! हो. . हे तेच दृश्य, जे आपण सगळ्यांनी आपापल्या घरी बसून टी व्ही वर पाहीलं.. कोणी वाचलं असेल त्याबद्दल, काहींनी ऐकलं असेल.. […]
७ जून २०१९ रोजी पहिला जागतिक अन्न सुरक्षा दिवस साजरा करण्यात आला. जागतिक अन्न सुरक्षा दिवस हा संयुक्त राष्ट्र महासभा द्वारे डिसेंबर २०१८ मध्ये अन्न आणि कृषी संघटनेच्या सहकार्याने स्वीकारले होते. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश्य म्हणजे अन्न सुरक्षा मानक राखण्यासाठी जन जागृती करणे आणि अन्नजन्य आजारांमुळे होणाऱ्या मृत्युदर कमी करणे. […]
तिच्या नकळत ‘ती’ काय काय करते याची जाणीव तिलाही नसते..तेव्हा, अशी आपली एखादी ‘गृहिणी’ मैत्रीण, बहीण, शेजारीण आपल्याला भेटली तर ‘ती’ काही करत नाही असं म्हणून तिला दुखावण्यापेक्षा ‘ती’ खूप काही करते हे तिला सांगुया..’ती’ एक शक्ती तत्व आहे याची तिला जाणीव करून देऊया. […]
ऍक्वेरिअम म्हणजे एक प्रचंड मोठे तळं होते. तळ्याच्या मध्यभागी एक गोलाकार ऐसपैस, रुंद मनोरा बांधला होता! किनाऱ्यावरून मनोऱ्यापर्यंत जायला चांगला 20 मिनिटाचा बोटीचा प्रवास करावा लागला. मनोऱ्याचा पहिला मजला पाण्याच्या वर आणि नंतरचे 9 मजले पाण्याखाली होते. त्याचा खाली काँक्रिटचे कॉलम. तसे तळं 300 फूट खोल होत, कॉलम बुडाशी असलेल्या एका टेकडी वर बांधला होता. […]
जगातील कोणत्याही देशाच्या नागरिकाच्या ‘तुम्ही कुठले?’ या प्रश्नाला जेव्हा ‘मी पुणेकर!’ असं उत्तर मिळतं तेव्हा समोरची व्यक्ती त्याच्याकडे आदराने पाहू लागते. इतकी पुणेकरांच्या मागे ‘पुण्याई’ उभी आहे… पुणे म्हणजेच पूर्वीचं ‘पुनवडी’ला शतकांपासूनचा इतिहास आहे..अगदी ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे, टिळक, आगरकर पासूनचा! […]
भूतलावर कोठेही जा खड्डा पाहायला मिळतोच या खड्ड्याला ना देशाचे बंधन असते ना प्रांताचे ना प्रदेशाचे.. फरक एवढाच की कुठला खड्डा मोठा असेल तर कुठला लहान… कुठला खड्डा मुद्दामहून पडलेला असेल तर कुठला निसर्गतः तयार झाला असेल.. अशी खड्डा निर्मितीची खूप कारणे सांगता येतील.. […]
भारतीय ग्रामीण भागातील विकासात धवल क्रांतीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. डॉ. कुरियन यांनी अनेक ग्रामीण भागात स्वाभिमानाने व स्वैराचाराने व्यवसायाला चालना दिली व दुधाचा महापूर घडवून आणला. स्वत: ला एक थेंब ही दुध आवडत नसणारे डॉ. कुरियन यांनी सहकार चळवळीतून धवल क्रांती साकारून दुग्ध व्यवसायातून ग्रामीण विकासाचे श्वासात आणि यशस्वी मॉडेल उभे केले. व्हर्गीस कुरीअन यांना जगात Milk Man म्हणून ओळखत असत. […]
सगळे परत त्रिकोणी नगरात आले होते. एरटोस्थिनिस काकांचेही कांम आटोक्यात आले होते. आज संध्याकाळी सगळे एकत्र जेवण करत होते… सायलीला इथली शेपूची भाजी खावी लागत होती आणि आता थोडी थोडी आवडू लागली होती… (कुणाला सांगू नका प्लिज)… नॉट बॅड, पटकन गिळून टाकली की झालं… […]