राजकीय स्वार्थापोटी मराठी माणसात फूट पाडून हे आंदोलन कायमचे बंद पाडण्याचा घाट कर्नाटक सरकारने चालविला आहे. राष्ट्रीय पक्षाचे नेते राष्ट्रीयत्वाचे धडे देऊन मराठी माणसाला आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपमतलबी नत्यांचे कुटील कारस्थान ओळखून मराठी माणसाने आता वेळीच सावध झाले पाहिजे. नाहीतर सगळेच गमावून बसावे लागेल … कायमचे! हुतात्म्यांनी बलिदान दिले ते माय मराठीच्या रक्षणासाठी… संस्कृतीच्या संवर्धनासाठी! […]
हा एक सुरक्षितता या विषयावरील लेख आहे ज्यात अपघात होता होता वाचणे या बद्दल चा विचार मांडला आहे. गुगलने स्त्री-दाक्षिण्य या शब्दाचे इंग्लीश मध्ये आणि Near miss accident याचे मराठी मध्ये पराकोटीचे हास्यास्पद भाषांतर केले आहे. इतके विक्षिप्त की त्याची अर्थ-कारणमीमांसा शोधणे मराठी (मराठीच काय कुणाच्याही) बुद्धीच्या पलीकडे आहे. अपघात होता-होता वाचला याला चपखल बसेल असा एकही शब्द न मिळाल्यामुळे आणि गुगल महाराजांनीही मार्गदर्शन न केल्यामुळे त्याचे संक्षिप्त स्वरूप म्हणून अहोवा या संक्षिप्त रूपाचाच (शॉर्ट-फॉर्म) या लेखात वापर करावयाचे ठरविले आहे. […]
खेड्यातील शाळांमध्ये स्वातंत्र्यानंतर भिंतीलाच आयताकृती काळा रंग देऊन फळा केला जात असे. काही ठिकाणी तिकाटण्यावर काळा फळा ठेवून गुरूजी शिकवत असत. शहरातील शाळेमध्ये भिंतीवर लाकडी चौकट असलेले फळे असत. पहिली ते चौथीपर्यंत मी फळ्याच्या जवळ जाऊ शकलो नव्हतो. लांबूनच फळा निरखत होतो. […]
आज राज्यातील खेड्या पाड्यांतून, गावांगावांतून लिलया विहार करणारी आपल्या सर्वांची लाडकी लालपरी आता ७३ वर्षांची झाली आहे. लाल डबा म्हणून आजही ओळखली जाणारी बस सेवा म्हणजे ‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ’ अर्थात एस.टी बसची स्थापना होऊन आज ७३ वर्षं पूर्ण झाली. […]
प्रभात’ची स्थापना १ जून १९२९ रोजी कोल्हापुरातील मंगळवार पेठेत झाली. आज ‘प्रभात’च्या स्थापनेस ९१ वर्ष होत आहेत. प्रभातचा महिमा आणि जादू इतकी जबरदस्त होती की, देशभरात गावोगावी ‘प्रभात’ नावाची अनेक सिनेमा थिएटर्स अस्तित्वात आली. आजही प्रत्येक मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची सुरुवात ‘प्रभात’ मधील ‘लख लख चंदेरी’ गाण्याने होते’. […]
आपण परदेशात गेल्यावर तिथं कोणी भारतातील, त्यातूनही महाराष्ट्रातील, नशीबाने पुण्यातील माणूस भेटला की, जो आनंद होतो.. त्याचं शब्दांत वर्णन करणंही अवघड आहे. कारण त्यात एकप्रकारचा आपलेपणा, आपुलकी असते. तसंच आपण जिथं राहतो, त्या परिसरात मराठी माणसाचं दुकान दिसलं तर आपण पहिल्यांदा त्याच दुकानात खरेदीला जातो. माझं बालपण तर सदाशिव पेठेतच गेलं. तेव्हा मराठी माणसांची दुकानं भरपूर होती. अगदी भाजीवाल्यापासून ते मिठाईवाल्यापर्यंत! […]
मराठी वाक्प्रचारामध्ये अनेक फळभाज्यांची नावं सर्रास वापरली जातात. उदाहरणार्थ, पुराणातील वांगी पुराणातच, वांग्याचं तेल वड्याला, सांगीवांगी, इत्यादी. आमच्या शाळेतील एक शिक्षक फार कडक होते, ते गोंधळ घालणाऱ्या मुलांना दम देताना म्हणायचे, ‘तुम्ही जर माझं ऐकलं नाहीत तर मी एकेकाच्या पार्श्वभागाचं भाजून सोललेलं भरताचं वांग करेन..’ असा दम ऐकल्यावर त्या मुलांच्या डोळ्यापुढे, कल्पनेनं त्यांचा पार्श्वभाग दिसायचा आणि ते ‘शांत’ बसायचे. […]
सगळीकडे रिक्षा, टेम्पो, छोटा हत्ती, सुमो, मॅजिक, डीआय, इ. वाहने भराभर पळतांना आपण बघतो. सामान्यांची हीच वाहने असतात. आमच्या लहानपणी मात्र प्रवासासाठी बैलगाडीच होती. आज काही लोक कारने आलीशान प्रवास करतात, तसा आमचा बैलगाडीचा प्रवास ही आलीशान होता. […]
जपानमधील एका राज्यात, अनेक तलावांनी वेढलेली ही जागा. जागेचे नाव “गोशीकिनुमा” असे नाव ठेवले गेले कारण तिथे विविध रंगांचे ५ तलाव आहेत. अक्षरश: ५ रंग वेगळे उठून दिसावेत असे हे पंचरंगी तलाव आहेत. ह्या जागेबद्दल जेव्हा माहिती गोळा करायला सुरुवात केली तेव्हा तिथले फोटो पाहून क्षणभर विश्वास बसेना, खरंच अशी जागा आहे? फोटो एडिट वगैरे केले नसतील ना? अनेक प्रश्न… […]
माझ्यासाठी विंडो सीट बुक कराल का प्लिज एरेटॉसथिनिस काका? सायलीने पटकन आपला क्लेम लावला. मला पण … चिंट्याने सूर मिसळला. नेहा आणि सॅमीच्या मनातही हेच होत, पण स्वभावामुळे बोलले नाही इतकेच. ************************** आत्ता पर्यंत: अंतराळात भ्रमण करून ज्ञानाच्या सीमा वाढवण्याच्या मोहिमेवर टीम पुणेला आय आर एस आर्यभट्टवर कॅप्टन नेमोंनी सहकारी म्हणून स्वीकारलं होतं. सध्या त्रिकोणी ग्रहावर… […]