शरीरयष्टी (सिक्स पॅक) वगैरे विना अभिनय करता येतो किंबहुना अभिनेत्याला सगळं चेहेऱ्यावरून आणि देहबोलीतून व्यक्त करायचं असतं, त्यासाठी पहिलवान असण्याची गरज नसते अशा काळातला राजेश खन्ना ! दिसायला सर्वसामान्य असणं हे त्याच्या भात्यातील प्रभावी अस्त्र होतं. अतिशय हळुवार ,नाजूक ,कोवळ्या अलवार भावना त्याच्या आवाजातून आणि चेहेऱ्यावरून व्यक्त व्हायच्या. […]
गुडी पाडवा आणि अक्षय तृतीया हे सण घराघरात हा साजरे करतो, ज्यांना देवगड चा रुबाब परवडत नाही, त्यांच्यासाठी रत्नागिरी हापूस असतो. तो हि खिशाला जड वाटला तर कर्नाटकी, पायरी इत्यादी चुलत-मावस भावंडे तृप्तीचा ढेकर सोबत घेऊन येतातच. जसे गणरायाचे दर्शन वेगवेगळ्या रुपात, भावमुद्रात होते तसेच हा कोकणचा राजा रोज वेगवेगळ्या रंग रुपात आम्हाला भेटत रहातो….. […]
वाचकाला कळायला सहजसुलभ, मानवकेंद्री, नव्या दमाची आणि नव्या मनूची विज्ञान कथा लिहिणारा लेखक म्हणून डॉ. नारळीकर यांची ओळख आहे. त्यांनी केवळ विज्ञान कथा लिहिल्या नाहीत, तर विज्ञान कथा कशी असावी, याचा वस्तुपाठ घालून दिला; आणि त्याचबरोबर तिची समीक्षा कशी करावी, याचे निकषही सांगितले. डॉ. नारळीकरांच्या ललित विज्ञान लेखनाचे पैलू उजेडात आणणारा हा लेख… […]
१९७४च्या नवव्या मराठी विज्ञान संमेलनाच्या निमित्ताने विज्ञान रंजन स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात ‘कृष्णविवर’ ही विज्ञानकथा बक्षीसपात्र ठरली. आपल्या नावाचा दबाव निर्णयावर येऊ नये म्हणून ना. वि. जगताप या नावाने आणि मंगलाताईंच्या हस्ताक्षरात डॉ. नारळीकर यांनी पाठवलेली तीच कथा आज इथे पुनर्प्रकाशित करून सादर केली आहे. […]
आत्ता पर्यंत: अंतराळात भ्रमण करून ज्ञानाच्या सीमा वाढवण्याच्या मोहिमेवर टीम पुणेला आय आर एस आर्यभट्टवर कॅप्टन नेमोंनी सहकारी म्हणून स्वीकारलं होतं. सध्या त्रिकोणी ग्रहावर… एरेटॉसथिनिस काका… […]
तेंव्हा शिक्षकाजवळ छडी असायचीच आज जसं मोबाईल असतो तशी.. त्या छडीमुळेच तर व्हायरल व्हायचे आमचे पराक्रम.. त्या छडीचीच फ्रेन्ड रिक्वेस्ट यायची आमच्या पाठीवर.. मग काय.. त्यात वेगवेगळे राग, आलाप, ताना घेऊन सुरु व्हायचे संगीत.. थोडी धूसफूस.. हे आमचं फेसबुक.. बुकात फेस लपवून फुंदत-फुंदत रहायचं कितीतरी वेळ.. थोड्या वेळात सारं विसरलं जायचं… आजही हे आठवलं की हसू आवरता येत नाही. सगळं आमच्या सोशल मिडिया मध्ये लोकप्रिय होतं.. कारण शाळा हेच आमचं समाज माध्यम होतं.. प्रभावी !!! […]
बोलक्या गाण्यांचा जसा एक “सुर” असतो तसा आपल्या सर्वांच्या बोलण्याचा पण “सुर” ( tone ) असतो उदा: तिरसट, टोचुन बोलण्याचा, राग, प्रेम, तिरस्कारपुर्ण, अलिप्ततापुर्ण, उपहासात्मक, आदरपुर्वक वगैरे. आपल्या बोलण्यामध्ये असल्या भावनांचा परिणाम लगेच संवादामध्ये होऊ न देतां सुर जर सामान्य अर्थात मृदु ठेवला तरी बरेंच काही साध्य होऊ शकते. सुदैवाने गोड बोलायला काही मेहनत पडत नाही व पैसेही पडत नाही, फक्त तशी खुणगांठ मात्र मनांत सतत लक्षांत ठेवावी लागते. […]
इथे दंतकथांच्या वदंता होतात. हे पुढच्या पिढ्यांना सप्रमाण सांगायची जबाबदारी आता आपली ! “इरफान ” नांवाची दंतकथा प्रत्यक्ष पाहिली याबद्दल स्वतःची पाठ थोपटून मी आता त्याचे न बघितलेले चित्रपट पाहणार आहे – तेवढंच माझ्या हाती आहे. […]
सोळाव्या शतकात त्याकाळचा गोवा म्हणजे तिसवाडी, बार्देस व सालसेत या तालुक्यात जबरद्स्त प्रहार हिंदू संस्कृती वर झाला. जे काही हिदू संस्कृती म्हणून असेल ते नामशेष करायचा त्या काळी क्रिस्ती मशिनरी व राजकर्तां वीडाच उचलला होता. रुई गोम्स पेरेराच्या संशोधना प्रमाणे एकूण ५५६ (तिसवाडी ११६, बार्देस १७६ व सालसेत २६४) मोठी देवळ जमीनदोस्त करण्यात आली. यातील काही देवतांच्या मुर्ती नदी पलिकडील शेजारच्या प्रदेशात स्थापित झाल्या […]
उलट्या दिशेने वाहत असलेला पाण्याचा प्रवाह कोणी पाहिलाय ? त्याचे उत्तर कदाचित नाही, असेच असेल. परंतु मी मात्र त्याचे उत्तर ‘हो’ असेच देईन. उंच भागाकडून सखल प्रदेशाकडे वाहत जाणे हा पाण्याचा गुणधर्म ! मग माझे उत्तर ‘हो’ कसे ? असा प्रश्न सर्वांनाच पडणे स्वाभाविक आहे. सेंटजॉन शहराजवळच सेंटजॉन नदीत हा चमत्कार पहायला मिळतो. हा प्रकार पाहिल्यानंतर कोण्या जादुगाराने केलेला नजरबंदीचा; खेळ वाटावा; परंतु तसे कांही नाही, तर ती निसर्गाची किमया आहे. […]