इजिप्तच्या प्राचीन संस्कृतीत सापांना विशेष स्थान आहे. तिथल्या पौराणिक कथांत सापांच्या रूपांतील पात्रांचा वारंवार उल्लेख केला गेला आहे. उदाहरण द्यायचं तर अॅपोफिसचं देता येईल. पाताळलोकीचा हा राजा सापाच्या रूपात वावरत असे. मात्र इजिप्तमधील सापांचं महत्त्व हे फक्त अशा पौराणिक कथांपुरतं मर्यादित नव्हतं. […]
मुंबई शहराची ओळख एकेकाळी गेटवे आॅफ इंडिया, व्हीटी, चर्चगेट, राणीचा बाग, फ्लोरा फाऊंटन, चौपाटी एवढीच नव्हती तर काळी पिवळी टॅक्सीने देखील होती…. १९६४ पासून मुंबईत सर्वत्र धावणारी प्रीमियर पद्मिनी टॅक्सी, ३० आॅक्टोबर २३ पासून बंद झाली.. […]
आई बाबा इतके खूष असतात कारण लेकीला परदेशातल्या सुखवस्तु कुटुंबातलं स्थळ मिळतं. आणि ती ? ती हर्षभराने आकाशाला केव्हाच स्पर्शून येते. धाकटी सोनाली आठवडाभर घरभर नाचत असते, होणार्या जिजाजींचे बहारदार वर्णन असलेलं जणू एकच गाणं तिला पाठ येत असतं […]
१९३३ सालातील ९ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारीच्या पहाटेपर्यंत, या ५ दिवसांत साने गुरुजींनी नाशिकच्या कारागृहात असताना ‘श्यामची आई’ कादंबरी लिहून काढली. […]
वाढत्या शहरीकरणाच्या रेट्यात घराचे स्वप्न गरीबांच्याच नाही, तर मध्यमवर्गीयांच्याही आवाक्याबाहेर गेले आहे. मागणी खूप आणि पुरवठा कमी; त्यामुळे जिथे मिळेल, जशी मिळेल तशी जागा घ्या अशी आज परिस्थिती आहे. […]
सुमारे दिडशे वर्षांपूर्वीची एक दंतकथा आहे. एका राजाने चार मजली भव्य राजवाडा बांधला. राजवाड्यावरील छतावर त्याने तांबा या धातूचे चांगले पाच सेंटीमीटर जाडीचे पत्रे घातलेले होते. राजवाड्यात सुखाने नांदत असताना एका मोहाच्या क्षणी राजा, एका स्त्रीच्या मोहजालात गुरफटला. […]
एखादी जिराफीण खूप आवडल्यावर तो आपल्या खोकल्याच्या मर्दानी आवाजाने तिच्यावर जबरदस्त भुरळ घालतो. मग जिराफीण त्याच्याभोवती सारखी घोटाळत राहते – हा प्रणयाराधन-सोहळा जगासमोर आला सेरेंगेटीच्या अगदी ताज्या संशोधनांतून ! जिराफ तसे शांत स्वभावाचे. […]
पृथ्वीचा पृष्ठभाग सतत बदलत असतो. अस्तित्वात असलेले खंड नाहीसे होत असतात, तसंच नवे खंड निर्माण होत असतात. प्राचीन काळी असाच एक गोंडवना नावाचा महाखंंड अस्तित्वात होता. या महाखंडात आजचे, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, भारत, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिआ हे भूप्रदेश सामावले होते. […]
सकाळी उठलं की, सर्वात आधी घरी चहा बनतो. चहासोबत काहीजण नाश्ता पण घेतात. चहा घेत नाही अशी व्यक्ती एखादीच असते! चहाची आपल्याला इतकी सवय झाली आहे की, सकाळी चहा भेटला नाही की, अख्खा दिवस खराब जातो. […]