शैक्षणिक साहित्यात “गोष्ट” हा एक महत्वाचा घटक आहे. चांगली गोष्ट लक्ष वेधत, विचार प्रवृत्त करते, शिकवते आणि लक्षात राहते. शिक्षणात त्याचा प्रयोग कसा करावा? इयत्ता 4-6 साठी एव्हीडेन्स बेस्ड रिझनिंग, चिकित्सक विचार (Critical Thinking) शिकवण्यासाठी एक प्रायोगिक लेसन प्लॅन. […]
पं. रामकृष्ण कवी यांनी रचलेले प्रस्तुत महिषासुरमर्दिनी स्तोत्र हे ‘देवी माहात्म्य’ वर आधारित असून त्यात मधु,कैटभ,महिषासुर तसेच शुंभ आणि निशुंभ या राक्षसांचा वध करण्यासाठी देवीने घेतलेल्या दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती या रूपांचा उल्लेख आहे. दुसरी सवाई किंवा श्रवणाभरण (गण- न ज ज ज ज ज ज ल ग) या वृत्तात रचलेल्या व अनुप्रास अलंकाराने नटलेल्या या स्तोत्रात शब्दांची अत्यंत आकर्षक रचना असून एकच शब्द पुनःपुनः वेगवेगळ्या अर्थांनी उपयोजल्याने कवीची संस्कृत भाषेवरील विलक्षण पकड जाणवते. […]
१९७६ ला मुकेशचे पार दूर देशी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आणि इकडे सोलापूरच्या दयानंदमधील आमच्या गॅदरिंग प्रॅक्टिसला मित्र अनिलला हुंदका आवरेना. तो आरके च्या ताज्या गाण्याची “इक दिन बिक जाएगा, माटी के मोल ” ( धरम -करम ) रिहर्सल करीत होता. त्यादिवशी एकट्या राज कपूरचा “आवाज ” गेला नाही. आम्ही आपोआप श्रद्धांजली मोडवर गेलो. […]
आता गजराचं ते पारंपारिक घड्याळ जरी आपण वापरत नसलो तरी त्याचे वंशज असलेले alarm tones मात्र रोज गजर करतातंच..हा प्रेरणादायी सवंगडी असलेला ‘गजर’, कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपल्या आयुष्यात कायम राहो व असा ‘गजर’ करत राहण्याची प्रेरणा आपल्याला सर्वांना पुनः पुनः मिळत राहो.. […]
कॅनडातील वास्तव्यात मी अनेक गोष्टी पाहिल्या, जाणून घेतल्या. अनेक गोष्टी मला भावल्या, माझ्यावर प्रभाव टाकून गेल्या. परंतु जिथे जाईन तिथे माझं मन कांही तरी शोधीत होतं. नेमक काय हे उमगत नव्हत; परंतु पुढे हळुहळू सारं माझ्या लक्षांत आलं. ते कॅनडातील भारत शोधीत होतं. मी कॅनडातील विविध पर्यटन स्थळांना भेटी दिल्या. प्रत्येक ठिकाणी एखाद-दुसऱ्या भारतीय कुटूंबाची हमखास भेट व्हायची. तसा कॅनडा हा संमिश्र संस्कृतीचा देश आहे. नवे जग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिका खंडातील विस्तारने सर्वात मोठा असलेल्या या देशात जगातील विविध देशांच्या लोकांनी येऊन वास्तव्य केले. येथे निर्विवादपणे गोऱ्या… इंग्रजांचे वर्चस्व असले तरी चीनी व भारतीयांची संख्या निश्चितच नगण्य नाही. […]
तसे बघितले तर स्मित व हास्य हे समानार्थी शब्द होत. स्मित हे हास्याचे सौम्य रुप झाले, ( तोंड न उघडतां, दांत न दाखवता गालांच्या थोड्याश्या हालचाली करुन ). नैसर्गिक रित्त्या चेहर-यावर जे समाधानाचे वा आनंदाचे मंद भाव येतात ते झाले ‘स्मित ‘. हास्य किंवा हसणे हे काही विषेश कारणाने चेहेर्यावर प्रकटते. विशेष कारणे जसे एखादा विनोद, कुणाची फजिती, मिळालेले यश, सहमती, कुत्सितपणा, समाधान वगैरे हास्याला कारणीभुत असु शकतात. […]
2017 साली प्रसिद्ध झालेले हे पुस्तक मी वाचले होते आणि मला ते भावले होते. पण ‘कोविद’ १९, च्या महामारीत, माझे , मीच कपाटात ठेवलेल्या पुस्तकाकडे लक्ष गेले. आतुरतेने मी ते पुन्हा उघडले. भावनांचा आणि विचारांचा पूरच माझ्या मनात वाहू लागला. काळाच्या उदरात विलय होऊ पाहणाऱ्या या पुस्तकाला उजेडात आणले तर ‘पत्रे’ लिहिणाऱ्या या ‘सिनिअर’ सिटिझन्स’ना न्याय मिळेल या हेतूने याचे परीक्षण करण्याचा हा ‘प्रपंच’! […]
चीनच्या सुई घराण्याच्या राजवटीने सातव्या शतकात जगातली पहिली सरकारी राजपत्रित (गॅझेटेड) अधिकारी पासून कारकुना पर्यंतच्या भरतीसाठी सार्वजनिक परीक्षा आयोजित केली (आजची IAS, MPSC, UPSC परीक्षा). पाश्चिमात्य देशात एकोणिसाव्या शतकात इंग्लंडमधे शालांत परीक्षा पद्धत राबवली गेली आणि ओघाने भारतातही आली. इतिहास मनोरंजक तर आहेच पण आजही अशाच पद्धतीने राष्ट्र / राज्य प्रशासकीय यंत्रणेची निवड प्रक्रिया अशीच आहे. […]
सेंट जॉनमध्ये आम्ही रहात असलेल्या इमारतीत, सॉफ्टवेअर कंपनीत काम करणारे मराठी युवक आता आमचे मित्र बनले होते. एक भाषा, एक देश या नात्याने विदेशातली आमची ओळख घट्ट बनली होती. न कळत आपलेपणा निर्माण झाला होता. आम्ही दिवसभर पर्यटन स्थळाना भेटी देऊन यायचो नि ते ऑफिसची आपली ड्युटी संपवून घरी परतायचे. मग रात्री चर्चेचा तास रंगायचा. कुठे गेलो […]
आमची मुंबईच्या प्रिय मुंबईकरांनो मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. बोलायचं कारण म्हणजे आज मला मनातुन खूप भरून आले आहे. आणि भरून येण्याचे कारण म्हणजे मला लवकरच तुमच्या सेवेत पूर्ण क्षमतेने सामावून घेण्याची चर्चा माझ्या कानापर्यंत पोहचली आहे. […]