नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

भगवद्गीतेला अभिप्रेत चार जीवनकलह !

या जगतात चार प्रकारचे कलह संभवतात. प्रथम कलह आपण आणि इतरेजन यांच्यात असू शकतो. दुसरा स्वतःशीच (आपुलाची वाद आपणाशी !) तिसरा आपण आणि बाह्य विश्व तर चौथा असू शकतो- आपण आणि ईश्वरात ! पहिले दोन प्रकार आपल्या दैनंदिन जीवनात दिसतात. मात्र उरलेले दोन्ही सहजासहजी दृश्य नसतात. त्यांना आपण सामाजिक कलह / व्यक्तिगत कलह /नैसर्गिक कलह अथवा आध्यत्मिक कलह असेही म्हणू शकतो. त्यातही सामाजिक आणि व्यक्तिगत कलह सामान्यतः नैसर्गिक आणि आध्यत्मिक कलहांचे परिणाम असतात. एक नक्की की या कलहांचे अस्तित्व असेपर्यंत कोणीही एकमेकांवर प्रेम करू शकणार नाही. […]

सत्यनारायण पूजा – एक विश्लेषण

लोकसत्ताच्या ‘चतु:सूत्र’ या सदरातील ‘संस्कृतीच्या वाटाघाटी’ हा प्रा. श्रद्धा  कुंभोलकर यांचा १२नोव्हें. २०२० ला ( पुणे आवृत्तीत ) प्रसिद्ध झालेला लेख आणि त्यानिमित्तानें प्रा, विजय काथरे यांची १३ नोव्हे. ची लोकसत्तामधील ‘लोकमानस’ या सदरातील प्रतिक्रियाही वाचली. सत्यनारायण व्रतावर आणखी माहिती मिळावी अशी इच्छा काथरे यांनी प्रगट केलेली आहे. त्यानुसार माझा हा लेख. […]

जाने कहाँ गये वो दिन

आयुष्यभर ज्या चार्ली चॅप्लिनला आदर्श मानलं, त्याने जोकरपण आधीच सिद्ध केलं होतं , पण आयुष्याच्या सायंपर्वात राज कपूरला स्वतःमध्ये जोकर आहे हे मान्य करावे लागले. हा थोडासा मावळतीचा अध्याय होता, जिथे हिशेब सुरु होतात, आठवणी सतावतात आणि मनाजोगती एखादीतरी कलाकृती निर्माण करावीशी वाटते. राजने या टप्प्यावर “मेरा नाम जोकर ” नावाचे धाडस केले -आतल्या आवाजाला स्मरून ! […]

श्रीगोविन्दाष्टकम् – मराठी स्वैर गद्य व पद्य अर्थासह

श्रीमद् शंकराचार्यांनी हे श्रीकृष्णाच्या विविध लीलांचा उल्लेख करणारे रसाळ स्तोत्र आर्या वृत्तात रचले आहे. अनुप्रास अलंकाराने ते विशेष नटले आहे. त्यामुळे ते अतीव गेयही आहे. ते वाचताना काही ठिकाणी ‘परब्रह्म निष्काम तो हा’ या संत नामदेवांच्या निर्गुणाचे सगुण रूप खुलवून सांगणा-या अभंगाची आठवण झाल्याखेरीज रहात नाही. फक्त त्यांचा बाळकृष्ण राजमंदिरात रांगतो, तर आचार्यांचा गोठ्यासमोरच्या पटांगणात ! […]

कॅलिफोर्निया मधील नापा व्हॅली ऑपेरा हाऊस

अमेरिकातील कॅलिफोर्निया मधील नापा व्हॅली या ठिकाणी असलेले “नापा व्हॅली ऑपेरा हाऊस” हे खरोखरच अमेरिकेसाठी एक अभिमानास्पद वास्तू आहे. हे थिएटर दुमजली आहे. नावातच संगीतातील एक प्रकार असल्याने इथे खास करुन सांगितिक कार्यक्रम जास्त करुन होतात. […]

शिक्षणाचे मानसशास्त्र : परीक्षेसाठी शिकणे का शिकण्याचे परीक्षण

लेखाचे उद्दिष्ट टिचिंग टू द टेस्ट (परीक्षार्थी शिक्षण) पद्धतीचे दुष्परिणाम दाखवत एव्हीडन्स ऑफ लर्निंगकडे जाण्याचा आहे. अजून एव्हीडन्स ऑफ लर्निंग पद्धत प्रायोगिक अवस्थेत आहे म्हणून इथे फक्त निर्देश आहे. सर्टिफिकेट असणे आणि प्रत्यक्ष ज्ञान असणे फरक समजला पाहिजे हा अव्यक्त हेतू. […]

तंत्रविश्व – भाग ७ : ऑनलाइन कोर्सेसच्या विश्वात

कोरोनामुळे बदलत असलेल्या  परिस्थितिमुळे  विविध साधक बाधक बदल आपल्या जीवनशैलीवर झाले व होत आहेत. शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद नाही. ऑनलाईन शिक्षण हे केवळ शालेय विद्यार्थ्यांपुरते मर्यादित राहीले नसून स्वतः चा व्यवसाय अधिक लोकांपर्यंत पोहोचवू इच्छिणारे व्यावसाईक, स्वतःचे कौशल्य व ज्ञान वाढवून  वरीष्ठ पद मिळवू इच्छिणारे नोकरदार,स्पर्धात्मक युगात स्वतःचा वेगळा ठसा उमटवू पाहणारे महत्वाकांक्षी विदयार्थी अशा समाजातील बहुतांश गटाला सध्या ऑनलाईन शिक्षण आणि त्या बाबतीतील कोर्सेसची आवश्यकता भासतेय. […]

‘कॉमन मॅन’चं मूर्तिमंत उदाहरण असलेले मनोहर पर्रीकर

साधी राहणी, स्वच्छ प्रतिमा आणि हसरा चेहरा…’कॉमन मॅन’चं मूर्तिमंत उदाहरण असलेले गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सर्वांना नेहमी आपल्यातलेच एक वाटले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, भाजपचा सामान्य कार्यकर्ता, गोव्याचे मुख्यमंत्री ते देशाचे संरक्षण मंत्री असा पर्रीकर यांचा थक्क करणारा प्रवास होता मात्र यशाची अनेक शिखरं गाठूनही त्यांनी त्यांच्यातला ‘कॉमन मॅन’ अखेरच्या श्वासापर्यंत जपला… […]

स्मिता पाटील – भारतीय चित्रपटांची अनभिषिक्त महाराणी

वयाच्या विसाव्या वर्षी रुपेरी पडद्यावर पदार्पण करणाऱ्या स्मिता पाटील जवळजवळ ७५ चित्रपटांच्या अनभिषिक्त महाराणी ठरल्या होत्या. १९८४ मध्ये त्या आंतरराष्ट्रीय नायिका बनल्या. १९८२ साली आला जब्बार पटेलांचा ‘उंबरठा’ त्यात तिने ‘सुलभा महाजन’ ची साकारलेली भूमिका अजूनही मराठी चित्रपटसृष्टीमध्ये बिनतोड आहे. सार्वजनिक जीवनातही ती महिलांविषयक काम करणाऱ्या अनेक संस्थांशी प्रत्यक्ष पण जोडली गेली होती. त्यामुळे उंबरठा मधल्या तिने साकारलेली भूमिका अधिकच वास्तवदर्शी वाटते. […]

ऑस्ट्रेलियातील अनोखे सिडनी ऑपेरा हाऊस

ऑस्ट्रेलिया! हे नाव घेताच या देशात जाणार्‍यांची इच्छाशक्ति पुन्हा जागृत झाली नाही तर आश्चर्य. असेही तंत्रज्ञान इतकं प्रगत झालं आहे की एका क्लिकवर आपण सहज जगाची सफर करु शकतो पण अशातही ज्या गोष्टींची प्रत्यक्षात मजा लुटायची असते ती त्या ठिकाणी जाऊनच. मग ती खाद्यसंस्कृती असो किंवा एखादी वैशिष्ट्यपूर्ण जागा. ऑस्ट्रेलिया देशातल्या सिडनी शहरात असलेले “सिडनी ऑपेरा हाऊस” हेे त्यापैकीच एक. […]

1 129 130 131 132 133 228
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..