आज दिनांक १६ ऑक्टोबर. आज संपूर्ण जगात ” वैश्विक अन्न दिन ” साजरा केला जातो. आजच्या दिवसाला एक गोष्ट आपण ठरवूया की १) अन्न वाया घालवायचं नाही. २) जेवढं अन्नदान शक्य आहे तेवढं नक्कीच करु. लक्षात घ्या की, अन्नदान हे सर्व दानांमध्ये श्रेष्ठ आहे. […]
हा पुर्ण भाग विंद्य पर्वत रांगेमुळे घनदाट झाडीचा आहे. मंडल्याच्या दक्षीणेलाच प्रसिध्द कान्हा किसली अभयारण्य आहे. कान्ह्याचा हा भाग तसा नर्मदेच्या खुप जवळ नाही पण हे घनदाट जंगल पुर्वी असलेल्या समुद्राच्या जवळते मुळे असु शकते. […]
अमरकंटकच्या आधी “घुघवा“ गांव लागते तिथे थांबुन “जिवाश्म राष्ट्रीय उद्यान“ बघितला. इथे भुगर्भ विभागातर्फे भुखननानंतर आढळलेले दगड, त्यावर दिसणारी पुरातन काळातील चिन्ह, कोरीव भाग, खुणा इ. स्पष्ट दिसतात. अशा गोष्टी पुरातत्व विभागातर्फे संग्रहित करुन ठेवल्या आहेत. वेगवेगळ्या पध्दतींनी अशा गोष्टींच्या आयुष्याचा अंदाज बांधता येतो. […]
अंकलेश्वर ऐवजी भालोदला मुक्काम करून अंकलेश्वर करता निघालो. वाटेत विमलेश्वरला व कोटेश्वरला महादेवांचे दर्शन घेतले. तर रत्नेश्वर महादेवाचे दर्शन व गुमानदेव मारोतीचे, योगायोगानी हनुमान जयंती पण होती.
नर्मदा उभी आहे अशी कल्पना केली तर विमलेश्वर व कोटेश्वरला तिची पावलं आहे असं समजतात. […]
११ ऑक्टोबर २०१२! या दिवशी युनायटेड नेशन्स मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर जगभरातील मुलींकरिता `मुलींच्या दिना’ची सुरुवात करण्यात आली. या दिनाची पार्श्वभूमी मुलींना आंतरराष्ट्रीय पातळीवर येणार्या अनेक प्रकारच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविणे ही आहे. हा दिन जगभरात साजरा होण्यासाठी व या दिनाची सुरुवात होण्यासाठी जगभरात कार्यरत असलेली प्लॅन नामक स्वयंसेवी संंस्थेने पुढाकार घेतला. या दिवसाला जगभरात साजरा करण्याची सुरुवात प्लॅन आंतरराष्ट्रीय संस्थेच्या ” मी मुलगी आहे ” या मोहिमेने झाली. […]
एकुण, ओंकारेश्वर ते भालोद पर्यंतचा भाग पौराणीक इतिहासाच्या दृष्टिनी संपन्न आहे. येथील आध्यात्मिक गांभीर्य बहुदा येथील नर्मदेच्या गांभिर्यामुळेच असावे. तेच गांभीर्य पैलतिरावर पण गरूडेश्वर, नेमावर, नारेश्वर ह्या भागांत पण प्रकर्षांने जाणवते. जप, तप, साधना करण्यासाठीची शांतता, नर्मदेचे अवखळ, वेगवान, नटखट रूप असताना आढळत नाही. जसजशी ती शांत, विस्तिर्ण होत जाते, तसतसे तिच्या सानिध्यातले आध्यत्मिक महत्व वाढत जाते. असे पण असु शकते की प्रत्येक स्थानाची एक “स्थान देवता“, वास्तु देवता असते तसे त्यांच स्थानांचे वास्तुच्या दृष्टिने महत्व असणार. […]
आजच्या टपाल दिनापासून तरी निदान आपण आपल्या नातेवाईकांना, जवळच्या व्यक्तींंना, मित्रमंडळींना एक महिन्याआड पत्र लिहूयात. त्या जुन्या भावना पुन्हा अनुभवूयात आणि येणार्या नवीन पिढीला या साहित्यप्रकाराची नव्याने ओळख करुन देऊ. इतर संस्कृती पाळताना ही संस्कृती पुन्हा कशी वृद्धींगत होईल याचा विचार करुया. चला तर मग लागू कामाला आणि इतरांनाही थोडं कामाला लावू. […]
आमची परिक्रमा जशी झाली तशी – केल्याने देशाचे पर्यटन, सभेत संचार । शास्त्र न कळुजा, चातुर्य येतसे फार ॥ या उक्ती प्रमांणे ज्ञानार्जनासाठी व दैनंदिन कार्यातुन विरंगुंळा म्हणुन आपण प्रवास/सहलीला जातो. जास्त कालावधी करता शक्य असेल तर आपण लांबच्या ठिकाणी पर्यटनाला जातो. पर्यटनाव्यतिरीक्त लांब पल्याचा पायी खडतर प्रवास, भावनेपोटी विठुरायाच्या दर्शनाला, ज्ञानदेव व तुकारामाच्या पालख्या घेऊन दर आषाढी एकादशीला वारकरी पंढरपुरला करतातच. ही झाली धार्मिक बाब . गेल्या काही वर्षांत […]
आज दिनांक ६ ऑक्टोबर. १९२१ साली याच दिवशी न्युयॉर्कमध्ये उच्चभ्रु असं ब्रोडवे थिएटर उभारण्यात आलं होतं. त्या थिएटरचं नाव होतं न्यु सेंच्युरी थिएटर. हे थिएटर न्युयॉर्कमधील नावाजलेलं शहर मॅनहॅटन येथे वसलेलं होतंं. थिएटरची आसन व्यवस्था १७०० इतकी होती. या संपूर्ण थिएटरचं स्थापत्य हबर्ट जे. क्रॅप यांचं होतं आणि या थिएटरवर मालकी हक्क शुबर्ट या संस्थेचा होता. […]
५ ऑक्टोबर १९८९ …… भारतीय इतिहासातील महत्वाची घटना घडल्याचा दिवस. या दिवशी भारत देशाच्या मुकुटात आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेला. भारतातील पहिली महिला, सुप्रिम कोर्टची न्यायाधीश बनली. त्या महिलेचं नाव आहे, एम. फातिमा बिबी. […]