मुंबई नगरीत अनेक अशाही वास्तू आहेत ज्या ब्रिटीश कालीन असूनही अजूनही तितक्याच ऐटीत आपली पाळंमुळं घट्ट रोवून उभी आहेत. मग त्या कुठल्याही क्षेत्राशी निगडीत इमारती असोत पण त्या त्यांचं अस्तित्व अजूनही टिकवून आहेत. अशीच एक वास्तू मुंबईत आजतागायत मुंबईकरांची मनोरंजनाची भूक भागवत आहे. ती वास्तू म्हणजे “रिगल सिनेमा” होय. […]
महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक कांदबरी पहला गिरमिटिया सुप्रसिद हिंदी साहित्यकार श्री गिरिराज किशोर यांनी लिहिली आहे. ऐतिहासिक कांदबरी लिहिताना भूतकाळातील घटना, प्रसंग, वास्तु, शहर, देश व तत्कालीन सामाजिक स्थितीचा अभ्यास करावा लागतो. या साठी लेखकाने दक्षिण अफ्रिकेचा दौरा केला आहे. दक्षिण अफ्रिकेतील महात्मा गांधीच्या आठवणीवर आधारित ही एक सामाजिक राजकीय कांदबरी आहे. […]
अशी माणसं जगात अजून आहेत. गरिबीने उच्य शिक्षण नाही मिळाले. भपकेबाज दवाखाना याने करण्यासाठी कर्जाची भानगडच केली नाही! एक बाईक, मेंदूतील वैद्यकीय ज्ञान आणि मनातील सेवाभाव! हीच त्याची इन्व्हेस्टमेंट! हा ‘मोबाईल डॉक्टर’ माझ्या आयुष्यातला सगळ्यात अनमोल डॉक्टर आहे! […]
काही वर्षा पूर्वी महाराष्ट्र सरकारने शालान्त परीक्षेपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सर्व पाठयपुस्तके मोफत वाटण्याची घोषणा केली. ती अमलात आणेपर्यंत आता फक्त आर्थिकदृष्टया कमकुवत वर्गासाठीही लागू करण्याची घोषणा नंतर केली . मोफत पाठ्य पुस्तक योजने वर त्या काळी बरीच चर्चा झाली. मला माझे शालेय जीवन आठवले. […]
इम्पीरियल थिएटर हे न्यूयॉर्क शहरातील मिडटाउन-मॅनहॅटन मधील २४९ वेस्ट ४५ व्या रस्त्यावर (जॉर्ज अबॉट वे) वर स्थित एक ब्रॉडवे थिएटर आहे. थिएटरमध्ये १४१७ इतकी आसन क्षमता आहे. […]
लिरीक थिएटर हे मॅनहॅटन न्यूयॉर्क मधील प्रमुख ब्रॉडवे थिएटर्स पैकी एक मुख्य थिएटर आहे. या थिएटरची स्थापना १२ ऑक्टोबर १९०३ साली झाली होती. या थिएटरसाठी दोन प्रवेशद्वार आहेत. यातील एक प्रवेश २१३ वेस्ट ४२ वा रस्ता (213 West 42nd Street) येथून तर दुसरा प्रवेश २१४-२६ वेस्ट ४३ वा रस्ता (214-26 West 43rd Street) येथून आहे. इ.स. […]
षण्मुखानंद! नावच किती भारदस्त वाटतं. अगदी नावाप्रमाणेच हे भव्य व मंदिरासारखे दिव्य आहे. मंदिरासारखीच आतील बाजू सजविण्यात आलेली आहे. या सभागृहाची आसन क्षमता ३०२० इतकी भव्य आहे. हे सभागृह नाटकांपुरतंं मर्यादित नसून इतर सांस्कृतिक कार्यक्रम व राजकीय सभांसाठी देखील वापरलं जातं. हे आशिया खंडातील सर्वात मोठंं सभागृह आहे असं मानलं जातं. […]
नवी मुंंबई! काही वर्षांपूर्वी उभी रहिलेली नगरी! हिच्या नावातच तिचं आर्थिक वैभव लपलेलं आहे. जसे मुंंबई समुद्रकिनार्यांसाठी, ठाणे शहर हे तलावांचे शहर, तशीच ही नगरी छोट्या-मोठ्या बगीच्यांसाठी प्रसिद्ध. ही नगरी अतिशय सुनियोजीत पद्धतीने बांधण्यात आलेली आहे आणि अशा या नगरीत जर नगरीची शोभा दुपटीने वाढवणारे नाट्यगृह जर नसेल तर नवलच! नगरीची शोभा वाढविणार्या त्या नाट्यगृहाचं नाव “विष्णुदास भावे नाट्यगृह” […]
मुंबई ! सगळ्यांची लाडकी, सगळ्यांना स्वत:मध्ये समावून घेणारी आई तशीच आर्थिक राजधानी. या नगरीबद्दल कोणाला जर आकर्षण वाटलं नाही तर नवलच. ही नगरी विविधतेने नटलेली असून या नगरीत बर्याच वास्तू पहाण्यासारख्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे सध्याच्या पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकदमीच्या आवारात उभे असलेले हे “रविंद्र नाट्यमंदिर”. […]
पुणे शहर म्हटलं तर सगळ्यात पहिले डोळ्यांसमोर येते ती “पेशवाई”. तसं पहावयास गेलो तर पुणे ही ‘विद्यानगरी’ म्हणून प्रसिद्ध आहे. अशा वैभवसंपन्न पुणे शहरात आणखीन ही काही वास्तू आहेत ज्या पुणे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवतात. अशीच एक वास्तू म्हणजे “बालगंधर्व रंगमंदिर”. पुण्यातील संभाजी पार्क विभागात ही वास्तू दिमाखाने उभी आहे. […]