राम गणेश गडकरी रंगायतन म्हणजेच गडकरी रंगायतन सांस्कृतिक राजधानी असलेल्या ठाणे (महाराष्ट्र) अगदी मध्यवर्ती भागात स्थित आहे. ठाणे शहरातील नावाजलेल्या “मासुंदा तलाव” म्हणजेच तलावपाळी जवळच ही वास्तू स्थित आहे. ठाण्यात येऊन जर हे नाट्यगृह पाहिले नाही तर तुम्ही ठाणे शहर पूर्णतः पाहिलं नाही असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही. […]
मालवणच्या आशिष झाट्येने NEET मध्ये राज्यात प्रथम क्रमांक आणि देशात एकोणिसावा क्रमांक पटकावल्याची बातमी मनाला उभारी देऊन गेली. AIIMS दिल्ली सारख्या भारतातील सर्वोत्तम कॉलेज मध्ये शिकण्याचा पर्याय आता त्याच्यापुढे आहे. केईम किंवा AIIMS ची निवड मी करेन असे त्याने टाइम्स ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे. आशिष ने सिंधुदुर्गाच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये एक नवीन बेंचमार्क निर्माण केलाय. […]
लहानपणीचे संस्कार जसे आयुष्यभर टिकतात ताशा या आठवणी आणि स्मृती सुद्धा! माझे बालपण ‘गिरगाव’, येथील एका ‘मोक्याच्या जागी , अगदी रहदारीच्या रस्त्यावरील आंग्रेवाडीत संपन्न झाले. त्यात एकत्र कुटुंबात वाढलेली आम्ही भावंडे त्यामुळे आमच्या आठवणीसुद्धा तितक्याच भिन्न भिन्न , गमतीच्या, आनंदाच्या आणि नवलाईच्या. महाराष्ट्राच्या ‘लोक कला जीवनातील आख्यायिका आणि त्यांचे बालपणी घडलेले दर्शन हि माझी स्मृती चित्रे झाली आहेत. […]
श्रीमत् आदिशंकराचार्यांनी रचलेले हे स्तोत्र म्हणजे देवी ललिता त्रिपुरसुंदरीचा भक्तिप्रद मंत्र आहे. शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या श्रीचक्राची (श्रीयंत्र) ती अधिष्ठात्री देवता आहे. काही अभ्यासकांच्या मते ती सोळा वर्षांची कन्यका (षोडशी) कल्पिलेली आहे, तर काहींच्या मते ती सोळा विद्यांनी परिपूर्ण असल्याने तिला षोडशी असे नाव मिळाले आहे. […]
आज दिनांक १६ ऑक्टोबर. आज संपूर्ण जगात ” वैश्विक अन्न दिन ” साजरा केला जातो. आजच्या दिवसाला एक गोष्ट आपण ठरवूया की १) अन्न वाया घालवायचं नाही. २) जेवढं अन्नदान शक्य आहे तेवढं नक्कीच करु. लक्षात घ्या की, अन्नदान हे सर्व दानांमध्ये श्रेष्ठ आहे. […]
हा पुर्ण भाग विंद्य पर्वत रांगेमुळे घनदाट झाडीचा आहे. मंडल्याच्या दक्षीणेलाच प्रसिध्द कान्हा किसली अभयारण्य आहे. कान्ह्याचा हा भाग तसा नर्मदेच्या खुप जवळ नाही पण हे घनदाट जंगल पुर्वी असलेल्या समुद्राच्या जवळते मुळे असु शकते. […]
अमरकंटकच्या आधी “घुघवा“ गांव लागते तिथे थांबुन “जिवाश्म राष्ट्रीय उद्यान“ बघितला. इथे भुगर्भ विभागातर्फे भुखननानंतर आढळलेले दगड, त्यावर दिसणारी पुरातन काळातील चिन्ह, कोरीव भाग, खुणा इ. स्पष्ट दिसतात. अशा गोष्टी पुरातत्व विभागातर्फे संग्रहित करुन ठेवल्या आहेत. वेगवेगळ्या पध्दतींनी अशा गोष्टींच्या आयुष्याचा अंदाज बांधता येतो. […]
अंकलेश्वर ऐवजी भालोदला मुक्काम करून अंकलेश्वर करता निघालो. वाटेत विमलेश्वरला व कोटेश्वरला महादेवांचे दर्शन घेतले. तर रत्नेश्वर महादेवाचे दर्शन व गुमानदेव मारोतीचे, योगायोगानी हनुमान जयंती पण होती.
नर्मदा उभी आहे अशी कल्पना केली तर विमलेश्वर व कोटेश्वरला तिची पावलं आहे असं समजतात. […]
११ ऑक्टोबर २०१२! या दिवशी युनायटेड नेशन्स मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर जगभरातील मुलींकरिता `मुलींच्या दिना’ची सुरुवात करण्यात आली. या दिनाची पार्श्वभूमी मुलींना आंतरराष्ट्रीय पातळीवर येणार्या अनेक प्रकारच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविणे ही आहे. हा दिन जगभरात साजरा होण्यासाठी व या दिनाची सुरुवात होण्यासाठी जगभरात कार्यरत असलेली प्लॅन नामक स्वयंसेवी संंस्थेने पुढाकार घेतला. या दिवसाला जगभरात साजरा करण्याची सुरुवात प्लॅन आंतरराष्ट्रीय संस्थेच्या ” मी मुलगी आहे ” या मोहिमेने झाली. […]
एकुण, ओंकारेश्वर ते भालोद पर्यंतचा भाग पौराणीक इतिहासाच्या दृष्टिनी संपन्न आहे. येथील आध्यात्मिक गांभीर्य बहुदा येथील नर्मदेच्या गांभिर्यामुळेच असावे. तेच गांभीर्य पैलतिरावर पण गरूडेश्वर, नेमावर, नारेश्वर ह्या भागांत पण प्रकर्षांने जाणवते. जप, तप, साधना करण्यासाठीची शांतता, नर्मदेचे अवखळ, वेगवान, नटखट रूप असताना आढळत नाही. जसजशी ती शांत, विस्तिर्ण होत जाते, तसतसे तिच्या सानिध्यातले आध्यत्मिक महत्व वाढत जाते. असे पण असु शकते की प्रत्येक स्थानाची एक “स्थान देवता“, वास्तु देवता असते तसे त्यांच स्थानांचे वास्तुच्या दृष्टिने महत्व असणार. […]