नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

मृत्युंजय

मंत्रोच्चारयुक्त जप हा झाला आध्यात्मीक उपासनेचा एक भाग.मनुष्य जेव्हा रोग व्याधींनी त्रस्त होतो तेव्हा त्याला कोणाच्या तरी आधाराची गरज भासते व तो दैवी शक्तीच्या उपासनेकडे वळतो.आपणास आरोग्य देतो “सुर्य “व मारक शक्ती ही त्याचाच पुत्र “यम “याकडे असते.त्या दोघांचा कर्ता शिव.म्हणुनच त्यांच्या कृपेच्या अपेक्षेत गायत्री व मृत्युंजय मत्रांचे अनन्य महत्व आहे.मृत्यु अटळ असला तरी त्याच्या अनुषंगाने अवती- भोवतीच्या स्नेहजनांना येणार्या भितीवजा वलया ला सुसह्य करता आले तरी तो जणु मृत्यूवर विजयच म्हणजे “मृत्यूंजय” ह्या कल्पनेवर आधारित प्रस्तुत लेखात विद्यमान परिस्थीतीचा आढावा घेत विविध दृष्टीकोनांना हाताळीत, मृत्युनंतर काय ह्या प्रश्नचिन्हाला अलगद स्पर्श केला आहे. […]

नायगारा … निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार !

भारतातील सर्वच प्रमुख नद्यांच्यामागे एखादी लोककथा (दंतकथा) दडलेली आहे. अशीच लोककथा नायगारा धबधब्याच्या बाबतीत असेल का याचा मी विचार करीत होतो. अमेरिका, कॅनडा ही प्रगत राष्ट्रे ! विज्ञान क्षेत्रात त्यांची प्रगती उल्लेखनिय ! त्यामुळे अशा निराधार दंत कथांवर त्यांचा विश्वास नसावा, अशीच माझी भावना! त्यामुळे नदी किंवा धबधब्याबाबत अशी एखादी लोककथा प्रचलित असेल असे मला वाटले नाही. परंतु बोटीत बसून धबधब्याजवळ जाताना कुणीतरी ‘मेड ऑफ दी मिस्ट’ असा शब्दोच्चार  केल्याचे मी ऐकले. ही ‘मेड ऑफ दी मिस्ट’ काय भानगड आहे हे जाणून घ्यायची ओढ लागली; अधिक चौकशीअंती ती एक लोककथा असल्याचे समजले. […]

कारगिल विजय दिवस

आजचा दिवस हा सच्च्या भारतीयांच्या कधीही विस्मृतीत जाणार नाही. प्रत्येक भारतीयांसाठी हा दिवस अभिमानास्पद ठरला आहे. आज दिनांक २६ जुलै २०२०! २१ वर्षं पूर्ण झाली त्या विजयश्रीला मिळवून. म्हणा ती विजयश्री मिळवणं सोपं नव्हतं , त्यासाठी शेकडो वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली समर यज्ञात! […]

हिंदी भाषा – इतिहास, भूगोल आणि अंकगणित

नागपूरातील कोणतीही मराठी व्यक्ती घराच्या बाहेर पाऊल टाकल्या हिंदीमध्ये बोलचाल सुरू करते मग समोरची ब्यक्ती मराठी पानवाला, रिक्षावाला, भाजीवाला किंवा चहावाला का असेना. कारण त्याच्या रक्तातच हिंदी असते. त्याचेसाठी वर्षाचा प्रत्येक दिवसच राष्ट्रभाषा दिवस असतो. याच्याविरुध्द परिस्थिती म्हणजे ७० ते ८० वर्ष नागपूरात वास्तव्य करणारे अमराठी. ते कधीही मराठी बोलण्याचा किंवा शिकण्याचा प्रयत्न करणार नाहीत, मराठी बातम्या ऐकणे तर दूरच. कारण नागपूरचे मराठी लोक त्यांच्याशी हिंदीतच बोलतात. भारताच्या कोणत्याही शहरात हे दृष्य तुम्हाला दिसणार नाही. […]

अर्धनारीश्वरस्तोत्रम् सार्थ

श्रीमद आदिशंकराचार्यांनी रचलेले हे अर्धनारीश्वर स्तोत्र शिव आणि शक्ती यांचे एका शरीरात कल्पिलेल्या संयुक्त रूपाचे स्तोत्र आहे. शिव हा लिंगभेदापलिकडे, अप्रकटित, स्वरूपविहीन चेतना आहे तर शक्ती ही प्रकटित ऊर्जा आहे. शिव आणि शक्ती हे अविभाज्य, एकरूप आहेत. अर्धनारीश्वर हा शब्द अर्ध+नारी+ईश्वर असा बनलेला असून मूर्तिविद्येमध्ये अर्धनारीश्वर मध्यातून दुभागलेला अर्धा पुरुष व अर्धी स्त्री स्वरूपात दाखवला जातो. […]

हानाबी (जपान वारी)

हानाबी म्हणजे आतिषबाजी (fireworks). फरक एवढाच की आपल्याकडे दिवाळी सारख्या फेस्टिवल साठी आतिषबाजी केली जाते इथे अतिषबाजीसाठी हा फेस्टिवल.फटाके हा शब्द अपुरा वाटावा अशी सुंदर सजावट. अतिशय विलोभनीय दिसणारी आणि आपल्या प्रकाशाने का होईना रात्रीचा अंध:कार नाहीसा होऊ दे अशी प्रार्थना करणारी अशी हानाबी! […]

‘सख्खे शेजारी’ – भारतरत्‍न डॉ. पांडुरंग वामन काणे

लहानपणी फक्‍त एवढेच कळायचे की ते खूप विद्वान आहेत. दिवस-रात्र वाचन, लेखन करतात. History of Dharma Shastra हा जगप्रसिद्ध ग्रंथ त्‍यांनी लिहिला आहे. केवळ शिक्षण-संशोधन नव्‍हे तर सतत पुरोगामी विचारांचा पुरस्‍कार करणारे अशी थोर, महान, विद्वान व्‍यक्‍ती आणि आमचे ‘सख्खे शेजारी’ वाडीतील आम्‍ही सर्व जण त्‍यांना ‘काणे अण्णा’ च म्हणत असू. राहण्याचे ठिकाण म्हणजे, अर्थातच, – सुप्रसिद्ध, आंग्रेवाडी, दुसरा मजला, वि. पी. रोड, गिरगाव, मुंबई. […]

वनसंवर्धन दिन

आज दिनांक २३ जुलै. आज वनसंवर्धन दिन साजरा केला जातो. मंडळी नावातच हा दिन का साजरा केला जातो ह्याचा एक अंदाज आपल्याला येतो. आपण नेहमी ऐकतो की निसर्ग आपला मित्र आहे. खरोखरच हे वाक्य अगदी सत्य आहे. अगदी जगद्गुरू संत तुकोबारायांनीही त्यांच्या अभंगात वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे असे सांगितलं आहे. […]

साकुरामय – जपानची गुलाबी सफर (जपान वारी)

साकुरा हे जपानचे राष्ट्रीय फूल आहे का? असे सहज काही जपानी लोकांना  विचारल्यास त्यातल्या ५०% लोकांकडून पटकन होकार मिळतो असा माझा अनुभव आहे. सर्व वयोगटात लोकप्रिय असणारे हे साकुरा. राष्ट्रीय फूल नाही बरं का! लोकप्रियताच ती केवढी; गल्लत होते अशी मग! साकुरा सिझन मध्ये मनमुराद आदरातिथ्य करवून घेता येते. जपान देशातल्या अगणित प्रेक्षणीय जागांवरती साकुराचा आनंद आपण घेऊ शकतो. हा साकुरामय जपान पाहणे आणि अनुभवणे नक्कीच एक सुंदर आठवण देऊन जाते हे मात्र खरे! […]

1 134 135 136 137 138 226
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..