नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

बेंगलोरमधली खवय्येगिरी

मला अजूनही आठवतं, कॉलेज मध्ये ट्रिप ला कुठं जायचं यावर आमच्या खलबती होत असताना साऊथला जाऊया असा आंधळा आग्रह होता माझा. कारण काय तर, साऊथ फूड ! कदाचित अन्नदेवतेने माझ्या मनातलं आणि पोटातलं ऐकलं असावं आणि मला बेंगलोरमध्ये इडली डोसाच्या रिंगणात बसवलं असावं. […]

चुशुल – REzangla pass ची लढाई

संकटे एकामागून एक पाठोपाठ देशावर चालून येत आहेत. करोनापासून ते लडाखचा चिघळलेला प्रश्न, व आर्थिक मंदी या सर्वांवर मात करण्याची वेळ आज भारताकडे चालून आलेली आहे. देशापुढे आव्हानं तर आहेतच पण आपला इतिहासही तितकाच उज्वल आहे. त्यातीलच घडलेली ही एक सत्य घटना. […]

स्तुत्य आणि अनुकरणीय वाट !

कोरोनामुळे जग बदलत आहे, अजूनही बदलणार आहे. जगण्याच्या विविध क्षेत्रांवरच नाही तर सामाजिक परंपरा आणि चालीरीतीवरही याचा परिणाम होत आहे, यापुढेही तो होणार आहे. मात्र, हा बदल महाराष्ट्रातील जनता लढाऊ वृत्तीने आणि सामाजिक जाण भान जपत स्वीकारत आहे, ही बाब कौतुकास्पद म्हणावी लागेल. आषाढी एकादशी आणि वारीच्या निमित्ताने त्याचा प्रत्यय आला. लाखो विठ्ठलभक्तांच्या उपस्थितीत जवळपास पंधरा दिवस साजरा होणारा पंढरीच्या वारीचा महोत्सव यंदा सरकारी नियम पाळून अगदी मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. […]

श्री वेंकटेश मंगलाशासनम् – मराठी अर्थासह 

स्वामी `प्रतिवादी भयंकर’ अण्णा रचित मंगलाशासनम् म्हणजे व्यक्तिगत स्वार्थांपासून दूर होऊन अत्युच्च पातळीची भक्तिपूर्ण प्रार्थना जेथे केवळ भगवंताच्याच कल्याणाचा विचार केलेला असतो. मंगलाशासनम् म्हणजे भक्ताची वेंकटेशाबद्दलची सततची वचनबद्धताच होय. […]

ग्रीष्माचे दोन रंग

मार्च महिन्याच्या सुरवातीस थंडीचा कडाका ओसरू लागतो. हवेत सुरेख गारवा येऊ लागतो.  स्वेटर रजया बासनात गुंडाळून ठेवल्या जातात.पंख्याचा वेग वाढला जातो. एप्रिलच्या सुरवातीस   कूलर खिडक्यावर विराजमान होतात. सकाळी दहानंतर घराबाहेर पडणे मुश्कील होऊन बसतं. प्राणी,पाखरे सावलीचा आधार शोधतात. सगळीकडे रखरख वाढू लागते. सूर्य आग ओकू लागतो.वारासुद्धा तापू लागतो.अंगाची काहिली होऊ लागते. सारीकडे वैराण भासू  लागते. उन […]

कोरोनास पत्र

तू एकमेव असा जीव नाहीयेस जो मानव जातीवर संकट बनून चालून आलास. तुझ्या आधीही तुझ्या सारखेच काही सूक्ष्म जीव संकट बनुन प्रहार करत होते पण वेळोवेळी मानवाने त्या सर्वांना मात दिली. त्यामुळे तुलाही एक दिवस हार पत्करावी लागणार हे नक्की. […]

बोथट बहिष्कारास्त्र ?

आज आपल्या देशात असे एकही क्षेत्र नाही, जेथे चीनने घुसखोरी केलेली नाही. साध्या सुईपासून ते महागातल्या महाग इलेक्ट्रॉनिक वस्तूपर्यंत आपण चिनी उत्पादनावर अवलंबुन आहोत. आपल्या संस्कृतीचा, जीवनपद्धतीचा अभ्यास करून टाकाऊ पण आकर्षक आणि कमी किमतीच्या वस्तू विक्रीस आणून चिनी ड्रॅगनने भारतीय बाजारपेठेला विळखा मारला आहे. चीनची भारतातील गुंतवणूक डोळे पांढरे करणारी आहे. त्यामुळे हा विळखा तोडायचा असेल तर सर्वात आधी आपल्याला सक्षम व्हावे लागेल. […]

मी पाहिलेला होक्काइदो – दाइसेत्सुझान (जपान वारी)

होक्काइदो मधील पर्वतांची दुनिया ! जपानमधील सर्वात मोठे नॅशनल पार्क म्हणून प्रसिद्ध असणारे हे दाइसेत्सुझान. साधारण २ हजार मीटर (६६०० फूट) पेक्षा जास्त उंच भव्य बर्फाच्छादित पर्वत (Great Snowy Mountains) येथे पाहायला मिळतात. […]

गझल सम्राट – मदन मोहन

हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णयुगात  एस डी बर्मन, नौशाद, ओ पी नय्यर, शंकर जयकिशन, रोशन, रवी, सी रामचंद्र,खय्याम आदि अनेक मातब्बर संगीतकार आपल्या एका पेक्षा एक सुंदर आणि श्रवणीय रचनांनी रसिकांना तृप्त करीत होते. अशा स्पर्धेच्या  काळात हिंदी चित्रपट संगीत क्षेत्रात आपल्या अनोख्या संगीताचा ठसा उमटवणे सोपे नव्हते. अशा स्पर्धेच्या युगात मदन मोहन यांनी आपली संगीतकाराची कारकीर्द सुरु केली आणि अल्पावधीतच त्यांनी आपल्या अनोख्या अशा  संगीत रचनांनी रसिकांचे लक्ष वेधून घेतले. एक प्रथितयश संगीतकार म्हणून अल्पावधीत त्याचं नाव मोठ्या आदराने घेतलं जाऊ लागलं….. […]

1 135 136 137 138 139 226
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..