नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

आजी तुझी आठवण येते…

– एके दिवशी दुपारचा चहा झाल्यावर आजींनं सगळ्यांना एकत्र बोलावलं .बेडखालची बॅग बाहेर काढली आणि उघडली . म्हणाली , ” तुम्हाला वेळ कसा घालवायचा हाच मोठा प्रश्न आहे ना , मग मी आता या बॅगेतला सगळा भूतकाळ तुमच्यासमोर ठेवते . वेळ कसा जाईल ते तुम्हाला कळणार सुद्धा नाही . ” आणि मग इतके दिवस दडवून ठेवलेला मौल्यवान खजिना बाहेर काढावा , त्याला अलगद हाताळावा , तसं आजी एकेक वस्तू बाहेर काढू लागली . […]

श्री वेंकटेश सुप्रभातम् – मराठी अर्थासह – भाग २

ज्याकाळी भारतात दूरचित्रवाणी नव्हती व आकाशवाणी हेच लोकशिक्षणाचे मुख्य साधन होते, अशा काळातील एम.एस.सुब्बलक्ष्मींचे ‘वेंकटेशसुप्रभातम्’ ऐकले नाही असा मराठी माणूस शोधावाच लागेल. आकाशवाणीवर प्रातःस्मरणात बहुधा शुक्रवारी वेंकटेशसुप्रभातम् हमखास लागे व त्यामुळे ते घराघरात पोहोचले होते. […]

बेभान झुंडींचे बळी

प्राण्यापासून माणसापर्यंतचा प्रवास हा नैसर्गिक होता. परंतु माणूस आज माणसापासून पुन्हा प्राण्यांकडे, नुसता प्राणी नव्हे तर हिंसक पशु होण्याच्या उलट्या संक्रमणाकडे वाटचाल करू लागल्याचे दिसत असून ही बाब निश्चितच संपूर्ण मानवी समाजासाठी चिंताजनक आहे. एका साध्या अफवेतुन, गैरसमजुतीतून अशा नृसंश घटना घडत असतील तर, हे आपल्या सुशिक्षितपणावरील एक प्रश्नचिन्ह आहे. शिवाय, अशा घटनांवर राजकारण करणे, हेदेखील बेजबाबदारपणाचे लक्षण म्हटले पाहिजे. […]

नो टीव्ही होम !

मला एक नेहमी वाटतं आपण मराठी माणसं सकाळी घरामध्ये छान संगीत लावतो. अभंग लावतो. उत्तम स्वरांनी वातावरण पवित्र करतो. तेच आपण संध्याकाळी टीव्ही सिरीयल, सो कॉल्ड टीपेच्या आवाजातल्या बहुतांशी बिन बुडाच्या ईशू वरील चर्चा मधून भांडणाचे, द्वेषाचे विषारी स्वर घरात आणतो. […]

पाकिस्तानच्या चुकांपासून भारताने शिकण्याची गरज

पाकिस्तानात 8 हजार लोकांना संसर्गित करणाऱ्या प्राणघातक चिनी करोना मृतांचा आकडा 159  पर्यंत गेला आहे.  अनेक ठिकाणी हा संसर्ग ‘स्टेज तीन’ला म्हणजे सामाजिक प्रसारापर्यंत गेला आहे. […]

सिमेंट प्लांटची भ्रमंती

ऑफिसच्या कामामुळे माझे सिमेंट प्लांटमध्ये येणे जाणे असायचे.हे प्लांट शहरापासून बरेच दूर असतात.तेथे काम करताना आलेले अनुभव,तेथेपर्यंत पोचण्याचा प्रवास आणि प्लांट मधील वर्णन आहे या लेखात केले आहे. […]

रहस्यकथा लेखक गुरुनाथ नाईक.. एक दंतकथा !

जवळपास १२०० पुस्तके लिहिणाऱ्या , मराठीतील वाचक प्रिय लेखक ,गुरुनाथ नाईक यांना आयुष्यात अखेेरीस का होईना परंतु अ.भा.साहित्य संमेलनात सन्मान पुर्वक आमंत्रित करून व्यासपीठावर सत्कार करावयास काय हरकत असावी? […]

ज्येष्ठ संगीतकार रोशन

हिंदी चित्रपट सृष्टीचा सन १९५० ते १९७०  हा चित्रपट संगीताच्या दृष्टीने सुवर्ण काळ मानला जातो. या काळात अनेक प्रथितयश संगीतकारांनी अनमोल अशा गाण्यांची रसिकांवर अगदी बरसात केली. नुसते गाण्यांवर चित्रपट चालण्याचे ते दिवस होते. ज्येष्ठ संगीतकार रोशन यांनी याच काळात आपल्या सुमधुर गीतांची देणगी चित्रपट सृष्टीला  दिली. […]

श्री वेंकटेश सुप्रभातम् – मराठी अर्थासह – भाग १

ज्याकाळी भारतात दूरचित्रवाणी नव्हती व आकाशवाणी हेच लोकशिक्षणाचे मुख्य साधन होते, अशा काळातील एम.एस.सुब्बलक्ष्मींचे ‘वेंकटेशसुप्रभातम्’ ऐकले नाही असा मराठी माणूस शोधावाच लागेल. आकाशवाणीवर प्रातःस्मरणात बहुधा शुक्रवारी वेंकटेशसुप्रभातम् हमखास लागे व त्यामुळे ते घराघरात पोहोचले होते. […]

कोरोना ‘चक्रव्यूह’

कुरुक्षेत्रावर द्रोणाचार्यांनी रचलेल्या चक्रव्यूहात अर्जुनपुत्र अभिमन्यू जसा असाह्य झाला होता, तीच हतबलता आज आपणही अनुभवतो आहोत. अभिमन्यूला कौरवांनी गरडा घातला होता, आपल्याभोवती कोरोनाचा विळखा आवळला जातोय. फरक इतकाच की, अभिमन्युला चक्रव्यूह भेद करण्याचं तंत्र अवगत नव्हतं त्यामुळे तो ते छेदून बाहेर पडू शकला नाही. आपल्याला ते ज्ञात आहे. परंतु, ते तंत्र वापरण्यास लागणारं ‘संयमा’स्त्र काहीसं बोथट झाल्याने आपली शिकस्त होतांना दिसतेय. […]

1 138 139 140 141 142 226
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..