गेल्या काही दशकात आपण एकत्र कुटुंब पद्धती कडून अलिप्त कुटुंब पद्धतीकडे वळालो. आता अलिप्त कुटुंब पद्धतीत देखील छोटेखानी कुटुंबाला प्राधान्य आहे. काळानुसार हा बदल घडताना भौतिक सुख सोयी वाढत आहेत आणि घरातील माणसांचा संवाद कमी होत आहे. आई, वडील आणि मुल अशा तीन माणसांच्या छोटेखानी कुटुंबात जर आई आणि वडील सतत बाहेर व्यस्त असतील तर त्या मुलाने संवाद साधायचा कोणाशी? […]
मित्रांनो आजचा जमाना हा ऑनलाइन शॉपिंगचा जमाना आहे. घरबसल्या आपल्या फोनद्वारे आपल्या दैनंदिन जीवनातील आवश्यक वस्तूंपासून ते मोबाईल इलेक्ट्रॉनिक, कपडे आणि अगदी फर्निचर देखील आपण सर्व काही ऑनलाईन मागू शकतो. अर्थातच त्यामुळे आपले जीवन अधिक सुखकर झाले असले तरी ऑनलाईन शॉपिंग करत असताना काही गोष्टींची खबरदारी घ्यावी लागते, अन्यथा आपली फसवणूक होण्याची शक्यता असते. […]
चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना व्हायरसने जगभर धुमाकूळ घातला आहे. आपल्या देशातही याचा प्रादूर्भाव झपाटय़ाने वाढत आहे.केंद्रसरकार कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे.सरकारच्या या प्रयत्नांना साथ देणं हे आपलं कर्तव्य आहे.त्यासाठी केंद्र सरकारने ‘आरोग्य सेतू’ अँप तयार केले आहे, ते आपण डाऊनलोड करून त्याचा वापर करणे आवश्यक आहे. […]
एका अथांग विश्वातल्या एका आकाशगंगेतल्या एका सूर्यमालेतल्या एका ग्रहावरच्या, कोट्यावधी सजीवांमधील एक प्रजाती म्हणजे ‘माणूस’. उत्क्रांतीत लाभलेल्या मेंदूचा वापर करीत प्रगतीचा वेग वाढवत नेला या मानव समुहाने. थोड्याच काळात बौध्दिक व भौतिक पातळीच्या सीमा गाठण्याच्या वल्गना हा समूह करू लागला. Nature आणि Nurture या दोन्हींचा समतोल राखण्याचे भान तो या घोडदौडीत विसरला. ‘Nature काय? किस झाडकी पत्ती’ ही प्रवृत्ती वाढत गेली. […]
अफगाणिस्तानमधील शिखांच्या गुरुद्वारावर ३ आत्मघातकी दहशतवाद्यांनी हल्ला केला. २५ मार्चला त्यांनी तेथील २०० भाविकांवर गोळीबार केला, बॉम्ब फेकले. त्यात २५ भाविक मारले गेले. आणि ८० लोकांना त्यांनी ओलिस धरले होते. अफगाणी सुरक्षा दलाच्या सहा तासाच्या चकमकीनंतर हे तीनही हल्लेखोर ठार झाले. […]
सुजान बंधू-भगिनींनो, परिस्थितीचं गांभिर्य ओळखा. विनाशाची वेळ नजीक आली आहे. आता जर आपण सावध झालो नाही तर तर मग पुढे जे होईल त्याला दैव देखील अडवू शकणार नाही…अनंत पीडा आणि असह्य्य वेदनांचा एक भयानक प्रवास ज्यामध्ये मृत्यूचं असं तांडव खेळल्या जाईल की याची आपल्याला कल्पनाही करता येणार नाही. […]
इथून पुढे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मानवी प्रगती साधताना जिथे जिथे निसर्गाला धक्का लागेल तिथे तिथे ति झीज भरून काढण्याची जिम्मेदारी देखील आपल्याला उचलावी लागेल. आपण तंत्रज्ञान विकसित करण्यासोबत निसर्गाचा आदर राखायला लागलो की मग आपल्यावर देखील वेगवेगळ्या आपत्तीच्या निमित्ताने घरात बंदिस्त होण्याची वेळ येणार नाही. […]
भारत-नेपाळ सीमेवर सीमा सुरक्षा बल हे अर्ध सैनिक दल तैनात आहे आणि या सीमेवरून रोज लाखो नेपाळी नागरिक भारतात आणि हजारो भारतीय नागरिक हे नेपाळ मधे हालचाल करतात. म्हणूनच सीमा सुरक्षा बलाने सतर्क होऊन या नेपाळ मधून येणाऱ्या सगळ्या नागरिकांची करोना टेस्ट करणे गरजेचे आहे. कारण नेपाळ मध्ये चीन मधुन वेगवेगळ्या कारणाकरता येणार्या चिनी नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. […]
नॉस्ट्रडॅमसने सांगितलेली बरीच भविष्य खरी ठरली आहेत.. त्याच्यामध्ये फ्रेंच राज्यक्रांती, लेडी डायनाचा मृत्यू, ग्रेट फायर ऑफ लंडन, हिटलरचा उदय, अणुबॉम्बचा शोध, दुसरे महायुद्ध,अमेरिकेतील 9 11 चा हल्ला, यांसारख्या घटनाबाबत नॉस्ट्रडॅमसची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरल्याचे दिसून आले आहे. […]
चीननंतर सर्वाधिक लोकसंख्येचा देश भारत आहे. चीनला लागून आहे आणि व्यापारी संबंधांमुळे भारत-चीन प्रवासी वाहतूकही चांगलीच आहे. असे असतानाही भारतात कोरोनाग्रस्तांची इतकी कमी संख्या आहे. सावधगिरीचे उपाय काटेकोरपणे अंमलात आणणे आणि भीतीने पळत सुटणे यात फ़रक आहे. […]