किल्ले राजगडाच्या सगळ्यात उंच असलेल्या (डोंगरावर डोंगर असलेल्या) बालेकिल्ल्यावरून दिसणारं सह्याद्रीचं हे आगळंवेगळं रूप. सह्याद्रीची सगळी राकटता, बुलंदी दर्शवणारं. मराठी मनाला अक्षरशः वेड लावणारं. त्याची छाती अभिमानाने फुलवणारं. त्याचं रक्त-ऊर्जा उफाळून आणणारं. प्रत्येक मराठी मनाने आयुष्यात एकदा तरी किल्ले राजगडाच्या बालेकिल्ल्यावरून सह्याद्रीचा हा अनोखा नजारा बघावा. […]
त्याचं स्मितहास्य तुम्हालाही जाणवेल. पण त्या वेड्या पारिजातकाला हे माहीत नाही की , लॉक डाऊन मुळे त्याचं हे रूप त्याला पुन्हा प्राप्त झालंय. लॉक डाऊन संपल्यावर … बाप रे ! नकोच तो विचार … […]
नृसिंहपंचरत्न स्तोत्रात श्रीमत् शंकराचार्य मनाला भ्रमराची उपमा देऊन, या वैराण वाळवंटासारख्या जगातील नश्वर गोष्टींमध्ये सुखासाठी वेड्यासारखे फिरण्याऐवजी भगवान लक्ष्मीनृसिंहांच्या श्रीचरणकमलातील शाश्वत मकरंद ख-या आनंदासाठी तू सतत सेवन करावास, असे विविध उदाहरणे देऊन पटवून देतात. हे अवघ्या पाच श्लोकांचे स्तोत्र अतिशय लालित्यपूर्ण आणि मधुर आहे. […]
– एके दिवशी दुपारचा चहा झाल्यावर आजींनं सगळ्यांना एकत्र बोलावलं .बेडखालची बॅग बाहेर काढली आणि उघडली . म्हणाली , ” तुम्हाला वेळ कसा घालवायचा हाच मोठा प्रश्न आहे ना , मग मी आता या बॅगेतला सगळा भूतकाळ तुमच्यासमोर ठेवते . वेळ कसा जाईल ते तुम्हाला कळणार सुद्धा नाही . ” आणि मग इतके दिवस दडवून ठेवलेला मौल्यवान खजिना बाहेर काढावा , त्याला अलगद हाताळावा , तसं आजी एकेक वस्तू बाहेर काढू लागली . […]
ज्याकाळी भारतात दूरचित्रवाणी नव्हती व आकाशवाणी हेच लोकशिक्षणाचे मुख्य साधन होते, अशा काळातील एम.एस.सुब्बलक्ष्मींचे ‘वेंकटेशसुप्रभातम्’ ऐकले नाही असा मराठी माणूस शोधावाच लागेल. आकाशवाणीवर प्रातःस्मरणात बहुधा शुक्रवारी वेंकटेशसुप्रभातम् हमखास लागे व त्यामुळे ते घराघरात पोहोचले होते. […]
प्राण्यापासून माणसापर्यंतचा प्रवास हा नैसर्गिक होता. परंतु माणूस आज माणसापासून पुन्हा प्राण्यांकडे, नुसता प्राणी नव्हे तर हिंसक पशु होण्याच्या उलट्या संक्रमणाकडे वाटचाल करू लागल्याचे दिसत असून ही बाब निश्चितच संपूर्ण मानवी समाजासाठी चिंताजनक आहे. एका साध्या अफवेतुन, गैरसमजुतीतून अशा नृसंश घटना घडत असतील तर, हे आपल्या सुशिक्षितपणावरील एक प्रश्नचिन्ह आहे. शिवाय, अशा घटनांवर राजकारण करणे, हेदेखील बेजबाबदारपणाचे लक्षण म्हटले पाहिजे. […]
मला एक नेहमी वाटतं आपण मराठी माणसं सकाळी घरामध्ये छान संगीत लावतो. अभंग लावतो. उत्तम स्वरांनी वातावरण पवित्र करतो. तेच आपण संध्याकाळी टीव्ही सिरीयल, सो कॉल्ड टीपेच्या आवाजातल्या बहुतांशी बिन बुडाच्या ईशू वरील चर्चा मधून भांडणाचे, द्वेषाचे विषारी स्वर घरात आणतो. […]
पाकिस्तानात 8 हजार लोकांना संसर्गित करणाऱ्या प्राणघातक चिनी करोना मृतांचा आकडा 159 पर्यंत गेला आहे. अनेक ठिकाणी हा संसर्ग ‘स्टेज तीन’ला म्हणजे सामाजिक प्रसारापर्यंत गेला आहे. […]
ऑफिसच्या कामामुळे माझे सिमेंट प्लांटमध्ये येणे जाणे असायचे.हे प्लांट शहरापासून बरेच दूर असतात.तेथे काम करताना आलेले अनुभव,तेथेपर्यंत पोचण्याचा प्रवास आणि प्लांट मधील वर्णन आहे या लेखात केले आहे. […]
जवळपास १२०० पुस्तके लिहिणाऱ्या , मराठीतील वाचक प्रिय लेखक ,गुरुनाथ नाईक यांना आयुष्यात अखेेरीस का होईना परंतु अ.भा.साहित्य संमेलनात सन्मान पुर्वक आमंत्रित करून व्यासपीठावर सत्कार करावयास काय हरकत असावी? […]