नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

नेपाळमध्ये करोना धोका : भारताने सतर्क होण्याची गरज

भारत-नेपाळ सीमेवर सीमा सुरक्षा बल हे अर्ध सैनिक दल तैनात आहे आणि या सीमेवरून रोज लाखो नेपाळी नागरिक भारतात आणि हजारो भारतीय नागरिक हे नेपाळ मधे हालचाल करतात. म्हणूनच सीमा सुरक्षा बलाने सतर्क होऊन या नेपाळ मधून येणाऱ्या सगळ्या नागरिकांची करोना  टेस्ट करणे गरजेचे आहे. कारण नेपाळ मध्ये चीन मधुन वेगवेगळ्या कारणाकरता येणार्या चिनी नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. […]

नॉस्ट्रडेमसची भविष्यवाणी

नॉस्ट्रडॅमसने सांगितलेली बरीच भविष्य खरी ठरली आहेत.. त्याच्यामध्ये फ्रेंच राज्यक्रांती, लेडी डायनाचा मृत्यू, ग्रेट फायर ऑफ लंडन, हिटलरचा उदय, अणुबॉम्‍बचा शोध, दुसरे महायुद्ध,अमेरिकेतील 9 11 चा हल्ला, यांसारख्या घटनाबाबत नॉस्ट्रडॅमसची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरल्याचे दिसून आले आहे. […]

जनजागरण आणि दहशत पसरविणे यातील फरक जाणण्याची गरज

चीननंतर सर्वाधिक लोकसंख्येचा देश भारत आहे. चीनला लागून आहे आणि व्यापारी संबंधांमुळे भारत-चीन प्रवासी वाहतूकही चांगलीच आहे. असे असतानाही भारतात कोरोनाग्रस्तांची इतकी कमी संख्या आहे. सावधगिरीचे उपाय काटेकोरपणे अंमलात आणणे आणि भीतीने पळत सुटणे यात फ़रक आहे. […]

करोना व्हायरस संकट : व्यापारी तूट कमी करण्याची संधी

करोना व्हायरसचा भारताच्या आर्थिक व्यवस्थेवरती नेमका काय परिणाम होऊ शकतो, याचा चेंबर ऑफ इंडियन इंडस्ट्रीजने अभ्यास केला,या अभ्यासामध्ये अनेक उपाय योजना सुचवण्यात आल्या आहेत. सरकार त्यावरती विचार करून आवश्यक पावले पण उचलत आहे. […]

जुन्या गोष्टींमधले नवे आणि नव्यातले काही जुने

चाळीस पन्नास वर्षांपूर्वी कोकणातल्या आमच्या गावाकडच्या खेड्यात असलेली जीवन -पद्धती आरोग्याच्या हितासाठी किती योग्य होती ही दृष्टी थोडी उशिरा म्हणजे आज मोठे झाल्यावर, जग पाहिल्यावर, शिकले सावरल्यावर मिळाली. सगळंच जुनं वाईट नसतं आणि टाकून देण्यासारखे नसते ही जाणीव जुन्या आठवणी कुरतडत राहाते आणि काहीतरी हरवल्याच्या भावनेने जीव कासावीस होत राहातो. […]

देशवासीयांनो कोरोनाला पिटाळून लावू या…!

भारत सरकारने कोरोनाचे संकट ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर केली आहे. केंद्र सरकारने या मोठ्या संकटाला तोंड देण्यासाठी खंबीर उपाय व जनजागृती युध्द पातळीवर हाती घेतली आहे. सध्या एकतीस मार्चपर्यंत निर्बंध जारी केले आहेत. शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जमावबंदी जारी केली आहे. सर्व गर्दीच्या ठिकाणी जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. मुंबई म्हणजे गर्दी हे समीकरण आहे. म्हणून गरज नसेल तेव्हा बाहेर पडायचे नाही, हे पथ्य लोकांनी आपणहून पाळणे महत्वाचे आहे. […]

तंत्रविश्व – भाग २ : मोबाईल बँकिंग सुरक्षितता

बँकींग व्यवहार मोबाईलद्वारे करण्याचे म्हणजेच ‘मोबाईल बँकिंग’चे प्रमाण नोटबंदी झाल्यापासून झपाट्याने वाढले आहे. बँकांनी देखील वेगवेगळ्या अँड्रॉईड अँपद्वारे मोबाईल बँकींग सुलभरित्या करण्याची सोय उपलब्ध करून दिली. सरकारने देखील यूपीआय सारखी सुरक्षित आणि जलदरीत्या फंड ट्रान्स्फर करणारी सुविधा उपलब्ध करून दिली. असे असले तरी एखाद्या अँपमधील आणि सुविधेमधील त्रुटींचा (loopholes) शोध घेऊन त्याचा आणि इतर मार्गांनी मिळविलेल्या माहितीचा वापर करून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.त्यासाठी मोबाईल बँकिंग करताना ते सुरक्षितरित्या करणे आवश्यक असते. […]

कोरोना आणि अफवांचा ‘संसर्ग’!

संसर्गजन्य रोगांचा प्रादूर्भाव होणे ही बाब मानवी इतिहासात नवीन नाही. याआधीही अनेक साथीच्या रोगाचा सामना आपण केला आहे. आणि प्रत्येक वेळी आशा संकटांचा सामना करतांना माणसाची संयमी आणि संतुलित भूमिका कामी आल्याचे दिसून येते. मात्र दुर्दैवाने आपण इतिहासापासून बोध घेत नाही. सद्याच्या काळात तर माणसाची अवस्था कळतं पण वळत नाही, अशीच झाली आहे. […]

करोना विषाणू – रशिया-ओपेक तेल युध्द – भारताकरता एक मोठी आर्थिक संधी

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि सौदी अरब आणी रशियामधील सुरू असलेले कच्च्या तेलाचे ‘प्राईस वॉर’ याचा भारताला मोठा आर्थिक फायदा होणार आहे. कारण कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने देशातील तेल आयातीच्या खर्चात कपात होत आहे. देशातील तेल आयात खर्च २०२०-२१ मध्ये घटून ६४ अब्ज डॉलरवर येण्याचा अंदाज आहे. ही तुलना २०१८-१९ मध्ये ११२ अब्ज डॉलर तेल आयातीच्या खर्चाच्या तुलनेत जवळपास निम्म्यावर असेल. […]

तंत्रविश्व – भाग १ : गरज तंत्रसाक्षरतेची

तंत्रज्ञान जसे बदलत आहे तसे त्याचा गैरवापर करून फसवणूक करण्याचे लोकांचे प्रमाण देखील झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे बदलत्या  तंत्रज्ञानाचा तुम्ही वापर करा अगर करू नका परंतु दुसऱ्या कोणाकडून त्याचा गैरवापर केला जाऊन तुम्ही फसवले जाऊ नये असे वाटत असल्यास तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक ठरते. […]

1 142 143 144 145 146 228
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..