मनाला शांत करणाऱ्या या भजनाच्या ओढीने जेंव्हा ज्ञानमंदिराकडे मन धाव घेते तेंव्हा, अंगात चिंध्यांचा अंगरखा, एका कानात फुटक्या बांगडीची काच आणि डोक्यावर मडके घेतलेल्या एका पुरुषसिंहाचे दर्शन घडते… ते म्हणजे राष्ट्रसंत गाडगे महाराज अर्थात संत गाडगेबाबा …. […]
भारतिय गृहमंत्रालय सीमा व्यवस्थापन खाते, सीमा व्यवस्थापनासंबंधातील मुद्दे हाताळत असते, पण त्यांचा आवाका प्रभावी व्यवस्थापनाचे दृष्टीने खूपच मर्यादित आणि अपुरा आहे.डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी (अंतर्गत सुरक्षा मंत्रालय)सारखे एक सर्व समावेशक मंत्रालय सुरु करुन देश सुरक्षित करावा लागेल. भारत सरकारला अमेरिकन कार्यपद्धतींचा आणि अनुभवांचा अभ्यास करून, तसेच त्यावरून सुयोग्य धडे घेऊन,अमेरिकन अनुभव भारताच्या परिस्थितीस अनुकूलित करून वापरला पाहिजे. […]
सुरक्षा व्यवस्थेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेऊन सुरक्षेच्या बाबतीत विविध उपाययोजना करण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.राजकीय नेते आणि त्यांचे दौरे यांत पोलीस बळाचा बराच वापर होत असल्याने कायदा-सुव्यवस्थेकडे पोलिसांचे अनेकदा दुर्लक्ष होते.त्यामुळे व्हीआयपी सुरक्षेचे महत्व कमी करुन जास्त पोलिस दल सामान्य जनतेच्या सुरक्षेकरता तैनात केले जावे. केंद्र सरकारने व्हीआयपी सुरक्षेमधून एनएसजी (राष्ट्रीय सुरक्षा गार्ड) कवच […]
अहमदाबाद येथे ट्रम्प यांच्यासाठी ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विमानतळ ते स्टेडियम या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा उभ्या हजारो लोकांनी तसेच मोटेरा स्टेडियमच्या आत असलेल्या लाखांवर लोकांनी ट्रम्प यांचे स्वागत केले. या भेटीमुळे ट्रम्प हे दुसर्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष झाले तर भारताला त्याचा खूप फायदा मिळू शकतो. अमेरिकेत थोडेथोडके नाही तर 40 लाख भारतीय आहेत. या अनिवासी भारतीयांच्या मदतीने भारताचे हितसंबंध ट्रम्प यांच्या कार्यकाळात जपले जाऊ शकतात. […]
खरे तर शिवरायांबद्दल “अगदी थोडक्यात” असे काहीच लिहिता येणार नाही, परंतु लेखन सीमेची मर्यादा पाळणे हे देखील अनिवार्यच असते, म्हणून मला उमगलेले छत्रपती शिवाजी महाराज आपणा पुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. खरं सांगू ! लेखनसीमेचे भय हे एक निमित्त पण अखंड महासागराला कधी कोणी ओंजळीत भरून घेऊ शकले आहे काय ? […]
राजकारण विकासाच्या मुद्दयांवर चालतं कि भावनिकतेवर? या प्रश्नाचे उत्तर शोधायला गेलं तर शंभर पैकी किमान ऐंशी लोक जात, धर्म, तथाकथित राष्ट्रवाद आदी भाविनक मुद्यांचेच उत्तर देतील ! कारण, सध्याच्या राजकारणाची अवस्थाच तशी झाली आहे.. […]
शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना ‘सरकारचे जावई’ म्हणण्याचा एकेकाळी रिवाज होता. कदाचित, सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारे अधिकार आणि दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधा पाहून मत्सराने हा शब्दप्रयोग रूढ झाला असावा! काहीही असो..पण एक गोष्ट मात्र काबुल करावी लागेल कि शासकीय कर्मचाऱ्यांना सरकार कायम जावयासारखी वागणूक देत आलं आहे. […]
देशाची अंतर्गत सुरक्षा खर्च गृहमंत्रालयाच्या बजेट मधून केला जातो. बाह्य सुरक्षेचा खर्च डिफेन्स मिनिस्ट्रीच्या बजेट मधून केला जातो. म्हणुन या वर्षी जरी संरक्षण मंत्रालयाचे बजेट फ़ारसे वाढले नसले तरी गृह मंत्रालयाचे बजेट हे पुष्कळ वाढले आहे.याचाच अर्थ अंतर्गत सुरक्षेचे धोके आणि आतल्या शत्रुंचा हिंसाचार वाढत असल्यामुळे सरकारने अंतर्गत सुरक्षावर लक्ष केंद्रित केले आहे. […]
भारताने ‘शेजारीदेश प्रथम’ हे धोरण अवलंबले आहेत. संस्कृती, इतिहास आणि भाषा तीन मुद्दे भारत आणि श्रीलंकेसाठी समान दुवा आहे. राजपक्षे भेट यशस्वीरित्या संपली असताना, अवघड विषयांपैकी, श्रीलंकेसाठी सार्कची वाढ आणि बिम्सटेकसाठी भारतीय प्राधान्य यामधील संतुलन शोधणे आवश्यक आहे.सध्या भारत शेजारील देशांशी आर्थिक आघाडीवर संबंध वाढविण्यावर भर देत आहे. या मुळे दोन्ही देशातील मैत्रीसंबंध आणखी नव्या उंचीवर जातील, असं मानलं जात आहे. […]
शिवनेरी गडावर जन्म आणि रायगडावर अंतिम श्वास असा जन्म मृत्यूचा गडकिल्ल्याशी संबंध असणारे, अलौकिक व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जनमानसामध्ये शासनकर्त्याप्रती विश्वास निर्माण करणारे, कुशल प्रशासक, शत्रूलाही मोह पडावा अशी कर्तबगारी, स्वतःच्या गैरहजेरीतही राज्याचा कारभार सुरळीत चालेल अशी जरब बसवणारा एक करारी शिस्तबद्ध राज्यकर्ता, सर्वसामान्य जनता आणि राज्यकारभारी यांना एकाच न्यायाने वागवणारा एक न्यायप्रिय परंतु प्रसंगी कर्तव्य कठोर असा छत्रपती शासक म्हणजे शिवाजी महाराज. […]