शनी या ग्रहाचे आजपर्यंत जवळपास दीडशे चंद्र शोधले गेले आहेत. या दीडशे चंद्रांपैकी एन्सेलॅडस हा चंद्र आकाराने सहाव्या क्रमाकांचा ठरतो. सुमारे ३३ तासांत शनीभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करणारा, पाचशे किलोमीटर व्यासाचा हा चंद्र विल्यम हर्शलनं १७८९ साली शोधला. […]
महाभारत पाहणं हा लहानपणी हृद्य सोहळा असायचा… त्या वेळेत भूक लागली म्हणायची बिशाद नव्हती… आजी लोक सॉलिड बडवत. रस्त्यांवर शुकशुकाट सगळे tv समोर …साधारण अर्धा तास आधी प्रक्रिया सुरू व्हायची. घरावर भले मोठे अँटीना नावाचे विमानसदृश्य उपकरण असायचे….काका /दादा पैकी कुणाला तरी वर चढवून ते adjust करावे […]
शेतकरी बाप…चारही पोर जन्माला आली ती कळती होईस्तोवर त्यांचं दवा पाणी, जर कळती झाली दोघे चालली एक मराठी शाळेत तर एक अंगणवाडीत दुसऱ्या दोघांचं आहेच ते दवापाणी..असच निसर्गाशी झुंझत करत, दिवसामागून दिवस, अन वर्षामागून वर्षे हळूहळू उलटतात,न अखेर तो दिवस उजाडतो जेव्हा पदरात जगासाठी धनाची पेटी असणारी कदाचित त्या बापासाठी पण…ती धनाची पेटी म्हणजेच बापाची बेटी जेव्हा उपवरात येते तेव्हा नकळत बापाच्या काळजात चर्रर्रर्रर्र होतं.. इथपर्यंतच शक्य होत मी केलं आता इथून पुढे मी काय करू?? असा हतबल झालेल्या बापासमोर एक भलं मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं. […]
आम्ही इंग्लिश मेडीयम करत चुका केल्या त्या चुकांवर चुका होता आहेत. त्या कधी थांबणार ? . विषय खूप गंभीर आहे. सर्वानीच गंभीर होऊन काहीतरी चांगला मार्ग काढायला हवा . […]
ओले आले नावाचा मराठी चित्रपट शुक्रवारी ५ जानेवारी २०२४ ला चित्रपट गृहात दाखल झाला. चित्रपटाचं नाव वाचून ते समजून घ्यायचा खूप प्रयत्न केला पण काही अर्थ लागे ना. मग ठरवलं जाऊयाच चित्रपट बघायला. अर्थातच चित्रपटाला गेल्यावर त्याच्या नावाचं वेगळेपण आणि त्या चित्रपटाचं वेगळेपण लक्षात आलं. […]
आपल्या हिंदू धर्मातील मंदिरे, मठ, तीर्थस्थाने याबद्दल अनेक दंतकथा, कथा, त्याबद्दलचे काही किस्से आपण ऐकतो. रत्नागिरी शहरापासून, पावस मार्गावर फक्त १२ कि.मी. अंतरावर, श्री संत गजानन महाराजांचे सुंदर मंदिर आहे. या मंदिराबद्दलही असेच काही आश्चर्यकारक व योगायोगाचे किस्से ऐकायला मिळतात. […]
सुगंधी तेलासाठी प्रसिद्ध असलेला एक वृक्ष. हा वृक्ष सँटॅलेसी कुलातील असून जगभर चंदनाच्या साधारणपणे २५ जाती आहेत. हा मूळचा भारतीय वृक्ष असून भारत, चीन, श्रीलंका, मलेशिया, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया ते हवाई बेटांमध्ये याची लागवड करण्यात आली आहे. कोरडया भागात समुद्रसपाटीपासून सु. १,२०० मी. उंचीपर्यंत चंदन मोठया प्रमाणात आढळतो. कर्नाटक, तामिळनाडू राज्यांत चंदनाचे वृक्ष विपुल प्रमाणात आढळतात. कर्नाटक राज्यात म्हैसूर तसेच इतर अनेक ठिकाणी या वृक्षावर आधारित अनेक लघुउद्योगांचा विकास झालेला दिसून येतो. याच्या सुवासिक गुणधर्मामुळे अनेक शतकांपासून ह्याचा वापर, लागवड व व्यापार चालत आला आहे. परंतु याच कारणामुळे या वृक्षाचे वन्य (Wild) वाण सध्या नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. मोठ्या आकारमानाची लाकडे आता आढळत नसल्यामुळे फर्निचरांसाठीच्या लाकूडकामासाठी याचा वापर संपला असला, तरीही सुवासिक तैलार्कासाठी याची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. […]
1990 साली दादरहून ज्या महिला स्वयंसेवक अयोध्येसाठी रवाना झाल्या त्यातील या एक शालिनी डबीर .या महिलांना अयोध्येपासून साधारण 50-60 किलोमीटरवर एका शाळेत बंदिस्त करण्यात आले होते. काही कारसेविका तिथून पळून गेल्या व पायी चालत हे अंतर कापत अयोध्येत दाखल झाल्या. पोलिसांनी चालवलेल्या गोळ्या, अश्रूधूर व लाठीचार्ज याचा सामना केला खरा पण बाबरी वर भगवा ध्वज फडकताना पाहिला. […]