दहावी पर्यंत मराठी माध्यम. अलिबागला jsm कॉलेज मध्ये ज्युनियर कॉलेज मध्ये इंग्रजी होते सायन्स घेतल्यामुळे पण त्या इंग्रजीचा जास्त काही उपयोग झाला नाही कारण सगळे मित्र पण मराठी मिडीयम वाले होते त्यामुळे माझ्यासारखी त्यांची पण अवस्था त्यामुळे त्यावेळेला इंग्रजी बोलता येत नाही वगैरे असं काही जाणवलं नाही. K.J. सोमैयाला B.E. मेकॅनिकलच्या F.E. म्हणजे फर्स्ट ईयरला इंग्रजी […]
शरद तळवलकर हे नाव मराठी चित्रपटसृष्टीशी निगडित असले तरी त्यांचे स्वतःचे नाट्यवेड हे प्रख्यात होते. नाटकाप्रमाणे चित्रपटातदेखील शरद तळवलकरांनी महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, तुळस तुझ्या अंगणी, रंगल्या रात्री अशा अखेर जमलं, वाट चुकलेले नवरे, बायको माहेरी जाते, मुंबईचा जावई आणि एकटी अशा कितीतरी गाजलेल्या चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या. […]
केवळ गीतकार आणि संगीतकार एवढेच ‘शब्दप्रधान गायकी’चे पुरस्कर्ते यशवंत देवांचे कर्तृत्व नाही. ते उत्तम संगीत शिक्षक व संगीत संयोजक होते, काव्याचे डोळस अभ्यासक होते. चित्रपटांप्रमाणेच नाट्यक्षेत्रातील त्यांचे योगदान लक्षणीय आहे. चाळीसहून अधिक नाटकांसाठी त्यांनी गीत, संगीत, पार्श्वसंगीत देण्याची जबाबदारी सांभाळली आहे. […]
दरवर्षी १ नोव्हेंबरला संपूर्ण जगभरामध्ये World Vegan Day साजरा करण्यात येतो. व्हेगन डायट म्हणजे प्राणिजन्य अन्नपदार्थांचा संपूर्ण त्याग. ही आहारशैली पाळणारे लोक दूध, तूप, अंडी हे पदार्थ देखील खाण्यास वर्ज्य मानतात. हे पदार्थ मिळवताना हिंसा होते असा त्यांचा सिद्धांत आहे. […]
जहाजावर असताना बऱ्याच वेळा पाऊस पडताना न दिसता कधी धावत पळत जाताना तर कधी मस्तपैकी रमतगमत चालत जाताना दिसतो. जेव्हा सोसाट्याचा वारा असतो तेव्हा धावतपळत तर जेव्हा मंद वारा असतो तेव्हा रमतगमत चालताना दिसतो. कधी कधी एका दिशेकडील क्षितिज काळे कुट्ट होते तर कधी दोन किंवा तीन आणि कधी कधी तर चहुबाजूचे क्षितिज अंधारून जाते. एका […]
‘दैव देतं अन कर्म नेतं’ ही म्हण शेतकऱ्यांच्या बाबतीती नेमकी उलटी लागू होते. काळ्या आईला घामाचा अभिषेक करून शेतकरी आपल्या ‘कर्मा’ने हिरवेगार रान फुलवतो. मात्र, त्याचं ‘दैव’ त्याला साथ देत नाही. कधी अवकाळी पाऊस, गारपीट कधी अवर्षण तर कधी रोगांचा प्रादुर्भाव एकपाठोपाठ एक संकटे त्याच्या मागे लागलेली असतात. […]
दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या ३१ तारखेला अनेक देशांमध्ये `हॅलोविन डे’ साजरा केला जातो. आपल्या भारतात मात्र फारच कमी ठिकाणी हॅलोविन साजरा केला जातो. मुख्य म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हॅलोविन सारखी कोणतीही प्रथा सांगितलेली नाही. […]
पुन्हा एकदा एमीरेट्सच्या विमानाने मुंबई एअरपोर्ट वरून टेकऑफ घेतला होता. दुबई वरून माल्टा या भूमध्य समुद्रात असणाऱ्या बेटावरील बंदरात जहाज जॉईन करायचे होते. चेक इन काउंटर वर दोन्ही फ्लाईट करिता नेहमी प्रमाणे विंडो सीट साठी रिक्वेस्ट केली. मुंबई दुबई प्रवासात विंडो सीट मिळाली नाही पण दुबई ते माल्टा या प्रवासात विंडो सीट मिळाली. मागील वेळेस जहाज […]
‘शोध सर्जनप्रेरणांचा’ हा या वर्षी अंकाचा विषय असून त्याद्वारे दिवंगत तसेच ज्येष्ठ साहित्यिकांच्या निर्मितिप्रक्रियेचा शोध पुढची लिहिती पिढी घेत आहे. समकालात वेधक, वेचक आणि आशययुक्त लिहून आपला स्वतंत्र ठसा उमटवणार्या काही लेखक, कवींना हा लेखन वारसा आपल्या साहित्यिक आई अथवा वडिलांच्या रूपाने घरातूनच थेटपणे लाभला. अगदी हाच धागा पकडत ‘अधोरेखित’च्या या अंकात लेखिका, संपादिका मोनिका गजेंद्रगडकरांचा […]
आमच्या ठाणे जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यात बळीप्रतिपदेला भाताची मळणी झाल्यावर भाताच्या पेंड्याला गावातल्या चावडीवर असलेल्या मुख्य रस्त्यावर पेटवण्यात येते. हा पेंडा पेटवल्यानंतर त्यातून निघणाऱ्या धुरातून व आगीच्या ज्वालांमधून गावात असणारी सगळी गुरे ढोरे एका बाजूकडून दुसरीकडे नेली जातात. पूर्वापार परंपरेनुसार चालत आलेली ही प्रथा आजही गावोगावी त्याच उत्साहात सुरू आहे. […]