अँटवर्पला डीसचार्जिंग करून आम्ही रोटरडॅमला निघालो होतो. रोटरडॅम मध्ये युरोपियन स्टॅंडर्ड मुळे म्हणा कि तिथलं वातावरण आणि नैसर्गिक परिस्थिती यांच्यामुळे म्हणा, तिथल्या लहान मोठ्या स्थानिक बोटी आणि इंधन पुरवठा करणाऱ्या बार्जेस ह्या खूप स्वच्छ, देखण्या आणि सुबक असतात. त्यांच्यावर धूळ किंवा तेलाचे डाग उडालेला रंग यापैकी कसलाही लवलेश नसतो. त्यांच्यावरील सर्व ऑटोमॅटिक सिस्टिम ह्या कॉम्पुटर कंट्रोल्ड […]
भूमध्य समुद्रात असंख्य लहान मोठी बेटे दिसत होती. अत्यंत आकर्षक दिसणारी बेटे मागे टाकून जिब्राल्टरच्या सामुद्रधुनिजवळ पोचलो होतो. उत्तर अटलांटिक महासागर आणि भूमध्य समुद्र यांना जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीने जोडले आहे. रॉक ऑफ जिब्राल्टर म्हणजे एक खडक नसून महाकाय डोंगरच आहे हे प्रत्यक्ष पाहिल्यावरच समजले. जिब्राल्टर ला लागून उत्तरेला स्पेन आणि दक्षिणेला समुद्रधुनीच्या दुसऱ्या किनाऱ्याला सुद्धा स्पेनचाच काहीसा […]
आज नवरात्रीचा रंग हिरवा आजचा विषय हिरव्या रंगाची ब्रोकोली ‘स्प्राऊटिंग ब्रोकोली’ हे जरी या भाजीचे नाव असलेतरी ‘ब्रोकोली’ या नावाने आपण ओळखतो. ब्रोकोली मुळातंच अनोळखी आणि विदेशी भाजी. ब्रोकोली ही भाजी हिरव्या फ्लॉवरसारखी दिसते. ही भाजी कुरकुरीत व चविष्ट आहे म्हणून या भाजीचा प्रामुख्याने सॅलडमध्ये वापर केला जातो. ब्रोकोलीच्या रॉयल ग्रीन, एव्हरग्रीन, युनिव्हर्सल, डॅन्यूब, अव्हेला, युग्रीन, […]
जहाज जॉईन करून जेमतेम पंधरा दिवस झाले होते. ज्युनियर इंजिनीयर म्हणून ब्राझीलच्या किनारपट्टीवर पहिले जहाज करून घरी परतलो. घरी आल्यावर चारच महिन्यात लग्न झाले. लग्नानंतर क्लास फोर ही मरिन इंजिनीयरची परीक्षा पास व्हायला वर्षभर वेळ लागला होता. कंपनीने पुन्हा ज्युनियर इंजिनीयर म्हणून जॉईन व्हायला सांगितले. पुढील दोन तीन महिने प्रमोशन चे नाव काढु नको असे सांगून […]
सिंगापूर हुन येताना श्रीलंकेच्या गॅले बंदरावर क्रु चेंज साठी अर्धा तास थांबून जहाज सौदी अरेबियाच्या बंदरावर निघालं होत. पहिल्यांदाच 1 लाख टनापेक्षा जास्त कार्गो नेणाऱ्या तेलवाहू जहाजावर जॉईन झालो होतो. यापूर्वीची जहाजे 35 ते 40 हजार टन क्षमतेची होती. त्यांची लांबी 180 मीटर असायची पण आताच्या जहाजाची लांबी 250 मीटर पेक्षा जास्त होती तसेच उंची आणि […]
आज नवरात्रीचा रंग पिवळा आजचा विषय पिवळ्या रंगाची हळद आयुर्वेदातील हळद हे एक महत्त्वाचा घटक आहे. हळदीला आयुर्वेदामध्ये ” हरिद्रा ” म्हणतात. हळदीला आर्थिक, धार्मिक, औषधी व सामाजिकदृष्टया अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. पूर्वी हळद केवळ जंगलात मिळत असे. दक्षिण पूर्व आशियाई देशात तिचे जास्त वास्तव्य आढळत असे. त्या काळात जंगलात आढळणारी हळद भारतात फक्त औषधांसाठीच वापरली […]
जहाजावरून परत आल्यानंतर जे कोणी ओळखीचे भेटतील त्यांचा पहिला प्रश्न , कधी आलास? आणि नंतरचा प्रश्न जो आपसुकपणेच विचारला जातो तो म्हणजे, मग आता परत कधी जाणार? त्याचप्रमाणे जहाजावर सुद्धा एकमेकांना पहिल्यांदा भेटल्यावर जहाजपर नौकरी करने क्यूँ आया? हा ठरलेला प्रश्न. खरं म्हणजे ह्या प्रश्नातून , बाहेर दुसरी नोकरी नाही का मिळाली आणि कशाला इकडे आयुष्य […]
गणेशोत्सव मंडळांमध्ये असलेल्या स्पर्धेचे स्वरुप नवरात्रोत्सव मंडळांमध्ये सुध्दा बघायला मिळते आहे. गरबा नाच करणाऱ्यांसाठी विविध व आकर्षक बक्षिसे, रंगीबेरंगी साड्या, पैठण्या , फॅन्सी ड्रेस आणि मग बक्षीस समारंभ आणि पुरस्कार सोहळे. नऊ दिवस कार्यक्रमांची नुसती रेलचेल सुरू असते. […]
आज नवरात्रीचा रंग – गहन निळा आजचा विषय निळ्या रंगाचे ब्ल्यूबेरी आवळा, जांभूळ, स्ट्रॉबेरी, तुती, करवंद या बरोबरच ‘ब्ल्यूबेरी’ हे बेरीवर्गीय फळा मध्ये येते. भारतात हे फळ जास्ती वापरले जात नाही. ब्ल्यूबेरी हे पाश्चिमात्य फळ आहे. ब्ल्यूबेरीची लागवड प्रामुख्याने अमेरिकेत होते. या फळाची मूळ सुरुवात ही १९५० मध्ये ऑस्ट्रेलियात झाली होती. त्यानंतर १९७० मध्ये डेव्हिड जॉन […]
मुंबईहून दुबई आणि दुबईहून ऑस्ट्रिया मधील व्हिएन्ना साठी फ्लाईट पकडली होती. युरोप मध्ये उन्हाळा सुरु होता तरीपण व्हिएन्नाला लँडिंग करताना विमानाच्या खिडकीतून बाहेर बघितल्यावर जिकडे तिकडे हिरवगार आणि लुसलुशीत गवत दिसत होतं. बाहेरच तापमान 12 डिग्री असल्याची माहिती पायलट ने टॅक्सी वे वर असताना दिली. व्हिएन्ना विमानतळावरून तासाभराच्या आतच इटलीतील कटानिया या शहरासाठी दुसरं विमान पकडायचे […]