आजचा दिवस आणखी एका कारणानेही खास आहे. बरोबर १८ वर्षांपूर्वी, २००१ साली आजच्याच दिवशी, म्हणजेच विजयादशमीला, `लोकसत्ता फॉन्टफ्रिडम’ या सॉफ्टवेअरचं अनावरण झालं आणि बघता बघता ते सॉफ्टवेअर इतकं प्रचंड लोकप्रिय झालं की आजमितीला जगातील किमान ४ लाखांहून जास्त संगणकांवर ते इन्स्टॉल झालंय. […]
सण-उत्सवांच्या आपल्या भारतीय परंपरांचा मागोवा घेतल्यास असे लक्षात येते की प्रत्येक प्रथेमागे एक उदात्त हेतू आहे. कित्येक धार्मिक सणांचा संबंध निसर्गाशी जोडलेला आहे. स्मिता दोडमिसे लहानपणी दसऱ्याचे सोने वाटायला घ्यायचे आणि हेच सोने ही कल्पना रुजली. मी ती आपट्याची पाने बघून विचार करायचे, की याचे कानातले कसे होतील आणि मग ते कानात हातात घातल्यावर कसे चमकतील. […]
एक विनोदी लेखक, कवी म्हणून सुरु झालेला अत्रेंचा प्रवास, आक्रमक वक्ता, विडंबनकार, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, परीक्षक, चित्रपट पटकथा-संवाद लेखक आणि अखेर सयुंक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रेसर राजकारणी अश्या अनेक वळणावरून ४० वर्षे अविरत पणे सुरु राहिला. […]
लंकेचा अधिपती रावण याचेबद्दल त्याच्या रामायणातीळ भूमिकेमुळे भारतातील अनेक लोकांच्या मनात अपसमज व अप्रीती दिसून येते. प्रत्यक्षात रावणाचे व्यक्तिमत्त्व खूपच भिन्न आहे. व्यापार,राज्यशास्त्र, आयुर्वेद,दर्शने,बुद्धिबळ यात तो पारंगत होता. संगीताचा रसिक दशानन रुद्रवीणेचा उत्कृष्ट वादकही होता. देवांना पराभूत करून बंदिवान करणारा शूरवीर रावण परम शिवभक्त होता. एक सक्षम राज्यकर्ता असलेल्या रावणाच्या लंकेची व जनतेची भरभराट झाली होती. काही अभ्यासकांच्या मते तो दशग्रंथी विद्वान होता. संस्कृतचा प्रकांडपंडित असलेल्या रावणाने रावणसंहिता, कुमारतंत्र, अर्कप्रकाशम्, शिवतांडव स्तोत्रम् इ. रचना केल्याचे सांगितले जाते. […]
अगणित आकाशगंगा तुझ्या. त्या सगळ्याला व्यापून उरलेलं, तुझं अस्तित्व, मला परीपूर्ण करणारं ….. तुझ्या असंख्य सौरमालेतल्या, एका छोटूश्या ग्रहावर मी. तरी माझी दखलं घेणं तुझं. कृतज्ञ करतोस मला.. दाखवतोस तुझं असणं मला नेहमीच. ही अथांग निळाई, खेचुन काढते माझ्यातलं काहीतरी… गुंतुन जातं भान, निळाईच्या नवलात….. असशील का तु या निळाईत!! की त्याच्याही पार विहरणारा की माझ्यात […]
तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.. सरत्या भाद्रपदाचा हात धरून आश्विन हळूच येतो ….या दिवसातलं मध्येच पडलेलं ठसठशीत पण सोनेरी मृदू ऊन … त्याच्या येण्याची ग्वाही आपल्याला देतं … सृष्टीचे हे दिवस फारच सुंदर असतात …. श्रावण भाद्रपदात पेरलेल्या बीजांनी सुंदर …. भरलेलं रूप घेतलेलं असतं … सृष्टीची ही आनंदात डोलणारी हिरवी समृद्धी नव्या नवरी सारखी सजलेली […]
कविवर्य कांतांनी दोन पारतंत्र्यं पाहिली ती म्हणजे एक इंग्रजांचं व दुसरं कांत कुटुंब जिथं रहात होतं, त्या मराठवाडा भूमीवरचं निजामांचं जुलमी पारतंत्र्य. त्यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९१३ रोजी झाला. जिथं मराठी भाषा बोलण्यासही बंदी होती. अशा परिस्थितीतही कांतांचं काव्यलेखन स्वतःच्याच स्फूर्तिदायक व स्वातंत्र्यांचं स्फुल्लिंग उजळीत समृद्ध होत होतं. पारतंत्र्यातच प्रसिद्ध झालेला कविवर्य कांतांचा ‘रुद्रवीणा’ हा काव्यसंग्रह […]
निरंजन उजगरे यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९४९ रोजी भुसावळ येथे झाला. त्यांचे शिक्षण मुबंईत झाले. ते व्ही.जे.टी.आय मधून मेकॅनिकल इंजिनीअर झाले . त्यांनी वयाच्या ९ व्या वर्षी पहिली कविता लिहिली. त्यांना हा वारसा त्यांच्या आजोबांकडून मिळाला असावा कारण त्यांचे आजोबा भाषाभास्कर भास्करराव उजगरे , त्यांनी दाते शब्दकोशासाठी नवीन मराठी शब्दांची निर्मिती करून शब्द पुरवले. होते , […]
कोणत्याही राष्ट्राचा कणा ही त्याची अर्थव्यस्था आणि संस्कृती ,ह्यातून तुम्हाला देशाची खरी ओळख मिळते. तर आज आपण निघुयात व्हिएतनाम च्या मुंबई बघायला…..हा असा जगातील एकमेव देश आहे कि जिथे तुम्ही उतरलात तरी तुम्हाला करोडपती झाल्याचा आभास होतो…जणू काही तुम्ही आताच कौन बनेगा करोडपती जिंकून आलात. […]
सिंगापूर एअरलाईन्स च्या विमानाने सिंगापूरला उतरलो. विमानतळावरून मला आणि चीफ इंजिनीयर दोघांनाही सरळ जहाजावर सोडण्यात येणार होत. विमानतळावर घ्यायला आलेल्या एजंट ने माहिती दिली की जहाज सिंगापूर अँकरवर आज येऊ शकणार नाही. सिंगापूर जवळच्या एका बंदरात कार्गो डीसचार्जिंगला उशीर होतोय त्यामुळे आज हॉटेल मध्ये थांबावे लागेल. एजेंट ने त्याच्या गाडीतून आम्हाला हॉटेल मध्ये ड्रॉप करून रूम […]