फोटोत दिसणारी ही भव्य आणि अतिशय सुंदर वास्तू आहे, एक मकबरा. सुफी संत महंमद गौस यांचा. अत्यंत सुंदर आर्किटेक्चर असलेली ही भव्य वास्तू ग्वालियरमधली खास जागा आहे. महंमद गौस हे संगीत सम्राट पंडित मिंया तानसेन यांचे गुरु होते. किती मोठे लोक आणि आपली दिव्य परंपरा आहे बघा. खरं तर तानसेन हे भारतातले सगळ्यात महान संगीतकार पण […]
कालचा दिवस संस्मरणीय! म्हणजे पहा न, फ्रांसमधे पँरीसला ब्रेकफास्ट, बेल्जीयममधे ब्रुसेल्सला लंच आणि हॉलंडमधे रोटरडँमला डिनर!! रोटरडँम, म्हणजेच हॉलंड किंवा नेदरलँडमधील, डच लोकांच्या शहरात येता येताच नदी, त्यावरील ब्रिज आणि बाहेरुन विशिष्ट बारीक बारीक टायलींग असलेल्या 8-10 मजली इमारती पाहून खूप छान वाटल; लंडन, पँरीस, ब्रुसेल्सहून डचांच वेगळेपण नक्कीच जाणवल. बहुतेक घरांना बाल्कनी किंवा टेरेस होत्या. […]
बंगाली संस्कृतीत नवरात्रात ‘दुर्गा पूजे’ची विशेष परंपरा आहे. नवरात्राच्या सातव्या दिवसापासून ते विजयादशमीपर्यंत दुर्गादेवीची आराधना बंगाली संस्कृतीत केली जाते. बंगाली समाजात देवी दुग्रेला विशेष महत्त्व असून तिला ‘दुर्गा माँ’ असे संबोधले जाते. नवरात्रीच्या दिवसात दुर्गा पूजा करण्याची बंगाली समाजाची विशेष परंपरा आहे. साधारण महाराष्ट्रात नवरात्रीच्या पहिल्या म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी घटाची स्थापना करून मग नऊ दिवसाच्या नऊ […]
अँटवर्पला डीसचार्जिंग करून आम्ही रोटरडॅमला निघालो होतो. रोटरडॅम मध्ये युरोपियन स्टॅंडर्ड मुळे म्हणा कि तिथलं वातावरण आणि नैसर्गिक परिस्थिती यांच्यामुळे म्हणा, तिथल्या लहान मोठ्या स्थानिक बोटी आणि इंधन पुरवठा करणाऱ्या बार्जेस ह्या खूप स्वच्छ, देखण्या आणि सुबक असतात. त्यांच्यावर धूळ किंवा तेलाचे डाग उडालेला रंग यापैकी कसलाही लवलेश नसतो. त्यांच्यावरील सर्व ऑटोमॅटिक सिस्टिम ह्या कॉम्पुटर कंट्रोल्ड […]
भूमध्य समुद्रात असंख्य लहान मोठी बेटे दिसत होती. अत्यंत आकर्षक दिसणारी बेटे मागे टाकून जिब्राल्टरच्या सामुद्रधुनिजवळ पोचलो होतो. उत्तर अटलांटिक महासागर आणि भूमध्य समुद्र यांना जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीने जोडले आहे. रॉक ऑफ जिब्राल्टर म्हणजे एक खडक नसून महाकाय डोंगरच आहे हे प्रत्यक्ष पाहिल्यावरच समजले. जिब्राल्टर ला लागून उत्तरेला स्पेन आणि दक्षिणेला समुद्रधुनीच्या दुसऱ्या किनाऱ्याला सुद्धा स्पेनचाच काहीसा […]
आज नवरात्रीचा रंग हिरवा आजचा विषय हिरव्या रंगाची ब्रोकोली ‘स्प्राऊटिंग ब्रोकोली’ हे जरी या भाजीचे नाव असलेतरी ‘ब्रोकोली’ या नावाने आपण ओळखतो. ब्रोकोली मुळातंच अनोळखी आणि विदेशी भाजी. ब्रोकोली ही भाजी हिरव्या फ्लॉवरसारखी दिसते. ही भाजी कुरकुरीत व चविष्ट आहे म्हणून या भाजीचा प्रामुख्याने सॅलडमध्ये वापर केला जातो. ब्रोकोलीच्या रॉयल ग्रीन, एव्हरग्रीन, युनिव्हर्सल, डॅन्यूब, अव्हेला, युग्रीन, […]
जहाज जॉईन करून जेमतेम पंधरा दिवस झाले होते. ज्युनियर इंजिनीयर म्हणून ब्राझीलच्या किनारपट्टीवर पहिले जहाज करून घरी परतलो. घरी आल्यावर चारच महिन्यात लग्न झाले. लग्नानंतर क्लास फोर ही मरिन इंजिनीयरची परीक्षा पास व्हायला वर्षभर वेळ लागला होता. कंपनीने पुन्हा ज्युनियर इंजिनीयर म्हणून जॉईन व्हायला सांगितले. पुढील दोन तीन महिने प्रमोशन चे नाव काढु नको असे सांगून […]
सिंगापूर हुन येताना श्रीलंकेच्या गॅले बंदरावर क्रु चेंज साठी अर्धा तास थांबून जहाज सौदी अरेबियाच्या बंदरावर निघालं होत. पहिल्यांदाच 1 लाख टनापेक्षा जास्त कार्गो नेणाऱ्या तेलवाहू जहाजावर जॉईन झालो होतो. यापूर्वीची जहाजे 35 ते 40 हजार टन क्षमतेची होती. त्यांची लांबी 180 मीटर असायची पण आताच्या जहाजाची लांबी 250 मीटर पेक्षा जास्त होती तसेच उंची आणि […]
आज नवरात्रीचा रंग पिवळा आजचा विषय पिवळ्या रंगाची हळद आयुर्वेदातील हळद हे एक महत्त्वाचा घटक आहे. हळदीला आयुर्वेदामध्ये ” हरिद्रा ” म्हणतात. हळदीला आर्थिक, धार्मिक, औषधी व सामाजिकदृष्टया अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. पूर्वी हळद केवळ जंगलात मिळत असे. दक्षिण पूर्व आशियाई देशात तिचे जास्त वास्तव्य आढळत असे. त्या काळात जंगलात आढळणारी हळद भारतात फक्त औषधांसाठीच वापरली […]
जहाजावरून परत आल्यानंतर जे कोणी ओळखीचे भेटतील त्यांचा पहिला प्रश्न , कधी आलास? आणि नंतरचा प्रश्न जो आपसुकपणेच विचारला जातो तो म्हणजे, मग आता परत कधी जाणार? त्याचप्रमाणे जहाजावर सुद्धा एकमेकांना पहिल्यांदा भेटल्यावर जहाजपर नौकरी करने क्यूँ आया? हा ठरलेला प्रश्न. खरं म्हणजे ह्या प्रश्नातून , बाहेर दुसरी नोकरी नाही का मिळाली आणि कशाला इकडे आयुष्य […]