३७० कलम काढल्यानंतर पाकिस्तानची अवस्था बिकट झाली आहे. आपल्या युद्धाच्या इशाऱ्यात दम नसल्याचा साक्षात्कार इमरान खान यांना १६ सप्टेंबरला झाला व त्यांनी स्वतःच आपल्या देशाची, लष्कराची व शस्त्रास्त्रांची लक्तरे काढली. भारताविरोधात पारंपरिक किंवा समोरासमोरच्या युद्धात आपला निभाव लागणार नाही तर आपण तोंडावरच आपटू, असल्याची कबुलीच इमरान खान यांनी दिली. याचाच अर्थ पाकिस्तानचा डाव दहशतवादी, आत्मघाती, फिदायीन, जिहादी हल्ले करण्याचाच आहे, हे स्पष्ट होते. परंतु, तसे काही झालेच तर इमरानना स्वतःचा देश वाचवता वाचवता नाकी नऊ येतील, हे नक्की! […]
नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मला 29 ऑगस्ट रोजी नुकतीच 22 वर्षे पूर्ण झाली आहेत.ऑनलाईन व्हिडीओ स्ट्रीमींगच्या माध्यमातून नेटफ्लिक्सने अल्पावधीतच डिजिटल क्रांतीच्या युगात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.वेबसीरिजला हक्काचं व्यासपीठ मिळवून देऊन फक्त भारतातच नाही तर संपूर्ण विश्वात अमर्याद मनोरंजनाचा साठा नेटफ्लिक्सने उपलब्ध करून दिला आहे. […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रांसमध्ये आयोजित “जी-7’च्या बैठकीत आणि रशियाच्या दौऱ्यात ज्या पद्धतीने प्रगत देशांना भारताच्या बाजूने केले; त्यामुळे पाकिस्तानची कोंडी झाली आहे. अमेरिकेच्या विरोधानंतरही रशियासोबत मिसाइलचा करार केला आणि यानंतरही भारत-अमेरिका संबंधांवर परिणाम झाला नाही, याचे श्रेय मुत्सद्यीगिरीला जाते ! […]
व्हिएतनाम हे दक्षिण पूर्व आशिया खंडातील एक राष्ट्र. एकेकाळी चीन, कधी फ्रान्स तर कधी अमेरिका यांच्या अधिपत्याखाली असलेले राष्ट्र.. ह्यांच्या खुणा आजही आपल्याला पहायला मिळतात. तर मागच्या दोन दशकापासून जगावर आपला ठसा उमटवण्याच्या दृष्टीने पाऊल टाकणाऱ्या ह्या देशाला तुम्ही जर स्वतःहून भेट देणार असाल तर काय काय करावे याचे माझ्या अनुभवावर आधारित मार्गदर्शन आणि अश्या मी केलेल्या काही भ्रमंतीचे वर्णन येत्या काही भागात मी करणार आहे. […]
१९६० ते १९७२ या काळात मराठी रंगभूमीवर संगीत नाटक परंपरेचे पुनरुज्जीवन घडून आले. या काळात नाट्यसंगीताला नवसंजीवन देणाऱ्या प्रमुख गायक-नटांमध्ये प्रसाद सावकार हे अग्रणी होते. त्यांचा आवाज भरदार व श्रवणमधुर, वाणी स्वच्छ व शुद्घ आणि गायकीत आवश्यक त्या करामती, ताना व हरकती असल्याने त्यांच्या गाण्यांची श्रोत्यांवर सहज छाप पडते. छोटा गंधर्व यांना त्यांनी श्रवणगुरू मानले. […]
रितेश देशमुखची निर्मिती असलेल्या आणि चित्रपटसृष्टीत लक्षवेधी ठरलेल्या ‘यलो’ चित्रपटला यंदाच्या ६१ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात विशेष परिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गौरी गाडगीळ या विशेष मुलीच्या आयुष्यावर आधारित असलेल्या ‘यलो’ चित्रपटाने सर्वांचे लक्षवेधून घेण्यास भाग पाडले. […]
पेशावरहून मुंबईत वडिल पृथ्वीराज कपूरसोबत आलेल्या राजकपूर यांना पृथ्वीराजनी सल्ला दिला होता, की त्याने करिअरची सुरुवात खालच्या स्तरावरुन करावी, तरच तो वरिष्ट पातळी गाठू शकेल. वडिलांचा हा सल्ला मानत १७ वर्षीय राज कपूर यांनी ‘रंजीत मुव्हीकॉम’ आणि ‘बॉम्बे टॉकीज’ फिल्म प्रॉडक्शनमध्ये ‘स्पॉट बॉय’ म्हणून काम करण्यास सुरुवात केली. […]
शंकरदास केसरीलाल हे शैलेंद्र यांचे मूळ नाव. १९४७ साली एका कार्यक्रमात काव्यवाचनाचे त्याला निमंत्रण आले. तेथे त्याने ‘जलता है पंजाब’ ही कविता सादर केली. त्या कार्यक्रमाला राज कपूर उपस्थित होते. त्याने शैलेंद्र यांची कविता ऐकली आणि ते भारावले. शैलेंद्रच्या गाण्याने ‘आरके’ला एक नवी ओळख दिली. केवळ राज कपूरचा गीतकार ही ओळख पुसणारा म्हणून ‘गाइड’चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. […]
…..यांतली गंमत अशी कीं त्या अशा खळखळून हंसल्या हे मला दोन दिवसांनी निगेटिव्हचा रोल ‘धुवून’ (?) हातात प्रत्यक्ष फोटो प्रिंट मिळाली तेव्हां कळलं, तोपर्यंत जीवात जीव नव्हता, कां ते त्या काळात निगेटिव्ह-रोल फोटोग्राफी करीत असलेल्यानांच समजेल. […]
(लेखक – प्रतीक मिटकरी ) – पितृपक्ष सुरू झाला आणि वर्षभर अन्नासाठी उकिरड्यावर तसेच घाणिवर फिरणारे कावळे पंधरा दिवसांसाठी आपले पुर्वज झालेत…. पितरांना कावळा शिवला की म्हणे पुर्वजांना मोक्ष मिळतो… पण काय हो या मोक्षाला एक वर्षाचीच Validity असते का? […]