लहानपणी मी समुद्र मंथनाची पौराणिक कथा वाचली होती. या कथे मध्ये जेव्हा समुद्रातून अमृताची प्राप्ती होते तेव्हा राक्षसांना अमृत प्राप्ती होऊ नये म्हणून भगवान विष्णू मोहिनीचे रूप धारण करून अमृत वाटप करण्याचे ठरवतात. हे वाटप करत असताना मोहिनी रुपात भगवान विष्णू प्रत्यक्षात देवांना खरे अमृत तर राक्षसांना अमृताच्या नावाने फक्त जल देत असतात. […]
समाजातील जातीभेद, अस्पृश्यता यासारख्या अनिष्ट रूढी आणि परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला. त्यांनी दिलेल्या अनेक लढ्यांपैकी एक महत्त्वाचा लढा म्हणजेच “पंढरपूरच्या मंदिर प्रवेशाचा लढा“ […]
आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या अनेक आठवणी अनेकांकडे असतील. माझ्याकडे त्यांची अशी एक आठवण आहे जी कदाचित कोणाकडेही नसेल.. माझ्यासाठी ती अक्षरश: अमूल्य आहे. […]
हिवाळा हा सर्वांचा आवडता ऋतू आहे. महाराष्ट्रातील हिवाळा हा उत्तर भारतातील थंडी पेक्षा खूपच सुसह्य व गुलाबी म्हणण्या इतपत आनंददायी असतो. या दिवसात ना पावसाची पिरपिर ना उन्हाच्या झळा. […]
पृथ्वीवर आतापर्यंत अनेकवेळा हिमयुगं येऊन गेली आहेत. या हिमयुगांतलाच, पृथ्वी मोठ्या प्रमाणात बर्फाच्छादित असण्याचा काळ म्हणजे हिमायनाचा काळ. आतापर्यंतच्या संशोधनानुसार, सर्वांत जुनं हिमायन हे सुमारे अडीच अब्ज वर्षांपूर्वी होऊन गेलं आहे. […]
जहाजावर सहकाऱ्यांकडून (बऱ्याच वेळा पदाने वरिष्ठ) खाण्याच्या बाबतीत नेहमी येणारा अनुभव आणि एका स्टेशनवर पाहिलेल्या एका प्रसंगातील विरोधाभास. जहाजावर महिन्याला हजारो डॉलर्स किंवा एका हाताची पाचही बोटं मोजायला कमी पडावीत एव्हढे लाख रूपये पगार घेणारे सहकाऱ्यांची कीव वाटावी आणि वयाची एंशी ओलांडलेल्या एका गरीब आजीच्या हातातील घास पाहून मन हेलावणारा प्रसंग. शेळ्या मेंढ्या आणि गुर ढोरं गवत झाडाचा पाला आणि राखण नसलेल्या शेतातील भाजीपाला पीकं खातात. […]
इजिप्तच्या प्राचीन संस्कृतीत सापांना विशेष स्थान आहे. तिथल्या पौराणिक कथांत सापांच्या रूपांतील पात्रांचा वारंवार उल्लेख केला गेला आहे. उदाहरण द्यायचं तर अॅपोफिसचं देता येईल. पाताळलोकीचा हा राजा सापाच्या रूपात वावरत असे. मात्र इजिप्तमधील सापांचं महत्त्व हे फक्त अशा पौराणिक कथांपुरतं मर्यादित नव्हतं. […]
मुंबई शहराची ओळख एकेकाळी गेटवे आॅफ इंडिया, व्हीटी, चर्चगेट, राणीचा बाग, फ्लोरा फाऊंटन, चौपाटी एवढीच नव्हती तर काळी पिवळी टॅक्सीने देखील होती…. १९६४ पासून मुंबईत सर्वत्र धावणारी प्रीमियर पद्मिनी टॅक्सी, ३० आॅक्टोबर २३ पासून बंद झाली.. […]
आई बाबा इतके खूष असतात कारण लेकीला परदेशातल्या सुखवस्तु कुटुंबातलं स्थळ मिळतं. आणि ती ? ती हर्षभराने आकाशाला केव्हाच स्पर्शून येते. धाकटी सोनाली आठवडाभर घरभर नाचत असते, होणार्या जिजाजींचे बहारदार वर्णन असलेलं जणू एकच गाणं तिला पाठ येत असतं […]