महाराष्ट्राच्या सीमेजवळच्या … तळकोकणातल्या रेडीचा व्दिभुजा गणेश दशक्रोशीत फार श्रद्धेचं स्थान ठेऊन आहे. रेडी प्रसिद्ध आहे ते इथल्या लोहाच्या खाणींसाठी. रेडीच्या एका बाजूला तेरेखोलचा किल्ला-खाडी तर अलीकडच्या बाजूला महाराजांचा ऐतिहासिक यशवंतगड. सावंतांचा अंमल देखील यशवंतगड आणि या परिसरावर होता. गावात माऊलीचं … नवदुर्गेचं अशी दोन देवळं देखील आहेत. रेडी-तेरेखोल ही दोन गावं महाराष्ट्राच्या गोव्याच्या सीमेवर वसली असून अरबी समुद्राच्या तटावर आहेत. […]
श्रीगणेशांचा आवडता रंग कोणता? तर लाल. त्यांना गंध कोणत्या रंगाचे लावायचे? तर लाल. त्यांचे आवडते फूल कोणत्या रंगाचे? तर लाल. त्यांचे आवडते वस्त्र कोणत्या रंगाचे? तर लाल. पण लालच का? […]
श्री गणेशांच्या बाबतीत जो विषय सर्वाधिक वेळा विचारला जातो, किंवा ज्या बाबतीत गणेश उपासकांमध्ये सर्वाधिक धास्तीचे वातावरण आहे तो विषय म्हणजे उजव्या सोंडेचा गणपती. […]
त्रेतायुगात झालेल्या श्री गणेशा यांच्या मयुरेश्वर अवताराचे वाहन मोर वर्णिले आहे. पुन्हा कालचाच प्रश्न पडतो की मोरावर कसे बसता येईल. तर लक्षात घ्या की एक भगवान शंकराचा नंदी दुसरा देवी लक्ष्मीचा हत्ती आणि तिसरा यमराजाचा रेडा सोडला तर कोणत्याही देवतेच्या वाहनावर बसताच येत नाही. […]
वैशाख शुद्ध पौर्णिमेला सूर्योदय समयाला भगवंतांनी त्याच मूर्तीतून पुष्टिपती अवतार धारण केला. भगवान श्री कृष्णांनी मांडलेली दोन पुष्टिपती गणेश यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा आणि पुणे जिल्ह्यातील सुपे येथे विद्यमान आहेत…… […]
हंपी आणि बदामी ही दोन वैभवशाली गावं आपल्या असामान्य वास्तुशास्त्र आणि शिल्पकलेसाठी गेली शेकडो वर्ष दिगंत कीर्ती बाळगून आहेत. तुंगभद्रा नदीकाठावर वसलेलं ‘हंपी’ त्यावेळच्या विजयनगर साम्राज्याच्या राजधानीचं ठिकाण होतं. याच परिसरातला बदामीचा ‘वतापी’ गणरायही गेली शेकडो वर्ष भारतीय धार्मिक मनाला भावलेला आहे. ‘बदामी’ हे अगोदर ‘वतापी’ म्हणून ओळखली जायचं. परंपरेने वतापी गणेशाच्या ब-याच कथा सांगितल्या आहेत. […]
स्वर्ग जिंकलेला मायाकर पाताळात गेला. या भीषण संकटाच्या वेळी पूर्वी केलेल्या तपाच्या आधारे श्री शेषांनी प्रार्थना केल्यावर भगवान त्यांच्या मनातून श्रीशेषात्मज रूपात प्रकट झाले. […]
श्री गणेशाबद्दल बाह्यरूप पाहून जनसामान्यांना जे प्रश्न पडतात त्यापैकी नेहमी विचारला जाणारा एक प्रश्न म्हणजे, एवढे मोठे विशाल देहधारी मोरया एवढ्या लहानशा उंदीरावर कसे बसतात? उंदीरावर बसता तरी येते का? […]