…..यांतली गंमत अशी कीं त्या अशा खळखळून हंसल्या हे मला दोन दिवसांनी निगेटिव्हचा रोल ‘धुवून’ (?) हातात प्रत्यक्ष फोटो प्रिंट मिळाली तेव्हां कळलं, तोपर्यंत जीवात जीव नव्हता, कां ते त्या काळात निगेटिव्ह-रोल फोटोग्राफी करीत असलेल्यानांच समजेल. […]
(लेखक – प्रतीक मिटकरी ) – पितृपक्ष सुरू झाला आणि वर्षभर अन्नासाठी उकिरड्यावर तसेच घाणिवर फिरणारे कावळे पंधरा दिवसांसाठी आपले पुर्वज झालेत…. पितरांना कावळा शिवला की म्हणे पुर्वजांना मोक्ष मिळतो… पण काय हो या मोक्षाला एक वर्षाचीच Validity असते का? […]
नऊ सप्टेंबरला समुद्राकडून गुजरातच्या कच्छच्या रणात दहशतवादी हल्ला करण्याकरता ५० दहशतवादी तयार आहेत असा इशारा बॉर्डर सिक्यूरिटी फोर्सने दिला. भारतीय सैन्याच्या सदर्न कमांडचे मुख्य जनरल सैनी यांनी पण कच्छच्या रणात मध्ये दहशतवादी हल्ला होऊ शकतो असा इशारा दिला आहे.आठवत असेल की दोन आठवड्या पूर्वी नौदल प्रमुख यांनी समुद्रातून पाण्याखालून दहशतवादी हल्ला होऊ शकतो असा इशारा दिला होता. […]
पाकिस्तान आणि चीनचे संयुक्त आव्हान भारतासमोर उभे राहिले आहे. पाकिस्तान आणि चीन यांच्यातील मैत्री आणि दोघांचेही भारताच्या विरोधातील वागणे पाहता भारताने सुरक्षेच्या आणि प्ररोधनाच्या दृष्टीने आपल्या अणुधोरणावर पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे, असे वाटते. पहिल्यांदा अणुहल्ला करणार नाही. मात्र, भारतावर अणुहल्ला झाल्यास प्रतिहल्ला करून शत्रूचे अधिकाधिक नुकसान करण्याचे भारताचे सध्याचे धोरण आहे. […]
निर्गुण, निराकार, परब्रह्म, परमात्मा, भगवान श्रीगणेशांचा सर्वाद्य अवतार आहे, श्रीवल्लभेश अवतार. चैत्र शुद्ध द्वितीयेला होणारा हा श्रीवल्लभेश अवतार सगुण-साकार रूपातील सर्वप्रथम अवतार होय. […]
दचकलात ना प्रश्न वाचून? तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे का? तर त्याचे उत्तर, होय हा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचे उत्तर, नाही हेच आहे. श्री गणेश शिवपुत्र नाहीत. भगवान श्री गणेशांनी शंकर-पार्वतीच्या घरी अनेक अवतार घेतले असल्याने तसा उल्लेख आपल्याला सापडेल पण ते पूर्णवास्तव नाही. […]
विमानप्रवास आता सामान्य माणसाच्या आवाक्यात आला आहे. विमानात बसण्याची पूर्वतयारी म्हणजे तारीख ठरवून तिकीट काढणे अशी बहुतेकांची समजूत असते. ‘मला विमान चालवायचे नाही. त्याच्या संबंधातील तांत्रिक गोष्टींचा मला काय उपयोग?’ असा प्रश्न रास्त आहे. पण यामागील विज्ञानासंदर्भात एक प्रश्न विचारून फक्त सुरुवात तर करून बघा? भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, अभियांत्रिकी, भूगोल वगैरे बाबतीतील कुतुहल वाढत जाईल. जसजशी उत्तरे मिळतील तसतसे प्रश्न वाढतील. करूया सुरुवात? ‘विमानप्रवास सुरक्षित आहे का?’ हा काहींचा पहिला प्रश्न असू शकतो. […]
भगवान ब्रह्मदेवांनी सरस्वती, श्री विष्णूंनी पुष्टी, श्री शंकरांनी योगिनी, देवी आदिशक्तीने मोहिनी आणि भगवान श्री सूर्यांनी संजीवनी नामक कन्येला निर्माण करून आपल्या या कन्या भगवान गणेशांना समर्पित केल्या. या पाच कन्यांशी विवाह केल्याने श्रीगणेशांना पंचकन्यापती गणेश म्हणतात. […]
भगवान श्री गणेशांच्या दोन बाजूला दोन शक्ती उभ्या असतात. एकीचे नाव देवी सिद्धी असते. तर दुसरीचे नाव देवी बुद्धी असते. पण यातील नेमकी सिद्धी कोणती? आणि बुद्धी कोणती? बुचकळ्यात पडलात ना? आपण कधी याचा विचारही करीत नाही. पण शास्त्रकारांनी सर्व गोष्टींचा विचारही केला आहे आणि कारणेही दिलेली आहेत. […]
श्री मुद्गल पुराणात अत्यंत मोजक्या वेळेसाठी झालेल्या गणेशांच्या अवतारांपैकी एक अवतार श्री शूर्पकर्ण अवतार. या अवताराचे नाव मोठे सुंदर आहे. शूर्पकर्ण. येथे कान सुपासारखे, म्हणताना केवळ त्याच्या आकाराचा नव्हे तर गुणांचा विचार महत्त्वाचा आहे. […]