गणेशाचे आगमन आणि निर्गमन
लेखक : शैलेश सो. महाजन (आम्ही साहित्यिक ग्रुप) : दर वर्षी भाद्रपद चतुर्थीला आपण गणपती आणतो. आणि म्हणतो “घरोघरी गणपती आले.” किंवा “आमच्या घरी गणपती आला.” किंवा “आमच्या घरी गणपती असतो.” नक्की काय आहे हे? […]
पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख
लेखक : शैलेश सो. महाजन (आम्ही साहित्यिक ग्रुप) : दर वर्षी भाद्रपद चतुर्थीला आपण गणपती आणतो. आणि म्हणतो “घरोघरी गणपती आले.” किंवा “आमच्या घरी गणपती आला.” किंवा “आमच्या घरी गणपती असतो.” नक्की काय आहे हे? […]
हेच ज्यांचे आनन ते गजानन. आनन म्हणजे तो़ड अर्थात ओळख. म्हणजे निर्गुण निराकार अनादि-अनंत परब्रम्ह हीच ज्यांची ओळख आहे त्यांना गजानन असे म्हणतात. “गजमस्तक” चा हाच अर्थ असतो. […]
भाद्रपद चतुर्थी चा अवतार शिवपार्वती यांच्या घरी झाला असल्याने त्या चतुर्थीला स्वर्गाची चतुर्थी तर विनायक अवतार महर्षी कश्यपने आणि अदितीच्या घरी झाला असल्याने या चतुर्थीला पृथ्वीवरची चतुर्थी म्हणतात. अशा या विनायक अवताराची जन्मतिथी आहे माघ शुद्ध चतुर्थी.
[…]
श्रावण शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध चतुर्थी असा एक महिना तिने पार्थिव गणेश पूजन केले. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मध्याह्न समयी या पार्थिव गणेशमूर्ती तूनच प्रकटलेला भगवान गणेशांचा अवतार म्हणजे श्रीमयुरेश्वर. या अवतारात भगवान सहा हातांचे होते. मोरावर बसलेले असल्याने त्यांना मयुरेश्वर असे म्हणतात. […]
श्री गणेशांबद्दल आपल्या मनात जे प्रश्न येतात त्यापैकी हा एक महत्त्वाचा प्रश्न. खरेच आहे एखाद्या महानगरातल्या सगळ्या माता- भगिनींच्या अंगावर मिळून सुद्धा इतका मळ असूच शकत नाही. मग जगज्जननी त्रिपुरसुंदरी पार्वती इतकी अस्वच्छ कशी असेल? […]
गावात तेव्हा मोजक्याच घरांमध्ये गणपती असायचे दीड दिवसाचे दहा पंधरा, पाच दिवसाचे तीस ते पस्तीस आणि दहा दिवसाचे दहा पंधरा गणपती. एकवीस दिवसांचे एखादं दुसरे. मूर्ती लहान असो की मोठी असो महाग असो की स्वस्त असो घेणारा प्रत्येक जण श्रध्देने ती मूर्ती घरात स्थापन करतो. भक्तिभावाने आणि आत्मीयतेने कुटुंबासोबत गणपतीची आराधना आणि पूजा अर्चा करतो. […]
शाळेत असताना आणि नंतर कॉलेज मध्ये गेल्यावर पण जगात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा म्हणजे इंग्रजी आहे असा समज होता. पण नंतर नंतर जहाजावर असताना ब्राझील, रशिया, युक्रेन, इस्रायल आणि युरोपियन देशांमध्ये जहाजं किनाऱ्याला लागल्यावर बाहेर फिरायला गेलो की इंग्रजीला किती किंमत आहे ते कळून चुकायचे. नंतर नंतर स्पॅनिश ही भाषा सगळ्यात जास्त बोलली जाते असे कानावर यायचं आणि इंग्लिश चा नंबर तिसरा का चौथा लागतो असे सांगितले जायचे. पण हल्ली गूगल सर्च केले की जगात सगळ्यात जास्त बोलली जाणारी भाषा ही चायनीज आहे त्यापाठोपाठ स्पॅनिश मग इंग्रजी मग हिंदी, अरबी आणि बंगाली असा काहीसा क्रम दाखवला जातो. […]
आपल्या समाजव्यवस्थेत कुटुंब एक संस्था आहे. बहुतांश कुटुंबांचा प्रवास हा एकत्र कुटुंब पद्धतीपासून एकेरी कुटुंब पद्धतीकडे झालेला दिसून येतो. परंतु याचा अर्थ असा नाही कि वेगवेगळ्या नात्यांचे महत्व व त्यांचा आपल्या जीवनावरील प्रभाव नाहीसा झाला, नक्कीच त्यामध्ये कमी-अधिक बदल झाला असेल तरी त्याचे अस्तित्व अजूनही कायम आहे. आजच्या बदलत्या समाजव्यवस्थेत नात्यांच्या वेगवेगळ्या रंगांचा अनुभव घेयचाच असल्यास […]
दुसऱ्या महायुद्धातल्या ‘ ज्युडी’च्या अनेक कामगि-या कल्पनेपलिकडच्या आहेत ….. तिने असंख्य लोकांचे प्राण रक्षण करायला मदत केली. अनेक जहाजांना बुडण्यापासून वाचवले… तिची कामगिरी इतकी मोठी की दुसरया महायुद्धातली एक हिरो ठरली. एच.एम.एस. ग्नट (HMS Gnat) आणि एच.एम.एस. ग्रासहॉपर या दोन जहाजांची ती शुभशकुन करणारी देवताच होती. […]
लेखिका – उषा शशीकांत जोशी – बहिणाबाई किंवा बहिणाबाईंची गाणी ही मराठी भाषेतील अपूर्व निर्मिती आहे. लौकिक अर्थाने त्या अडाणी (अनपढ) निरक्षर होत्या. लेखन, वाचनाच्या संस्कारांची सुतराम ही शक्यताही नव्हती. त्यामुळेच त्यांच्या निसर्गदत्त प्रतिमेबद्दल आश्चर्य वाटावं इतकी त्यांची कविता, शब्द, वाक्य, ध्वनी, छंद, यमक, अनुप्रास अशा भाषेच्या नियमांमध्ये पूर्णपणे बसणारी आहे. खरोखर अलौकिक प्रतिमेचं देणं म्हणजे काय याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे बहिणाबाईंची कविता होय. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions