चारेकशे वर्षांपूर्वी स्पॅनिश लोकांच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी ‘इंकापूर्व’ लोकांनी तलावाच्या पाण्यात तरंगती घरे बांधून अशा त-हेने आश्रय घेतला. पूर्वीची दोन-तीन हजार कुटुंबाची संख्या आता पाच सहाशे कुटुंबापर्यंत आली आहे. अशी अंदाजे साठ-पासष्ट तरंगती खेडी आहेत म्हणे लेक टिटिकाकामध्ये. सगळी दहा ते बारा फूट खोल पाण्यात. तोतोरा गवत वाळवून त्याचे भारे उलट सुलट एकमेकावर पसरून व भक्कम लाकडांच्या व दोरीच्या साहाय्याने बांधून तयार केलेल्या सहा ते आठ फूट जाडीच्या चटया म्हणजे ही तरंगती खेड्याची जमीन. ही खेडी साधारण तीस ते तीनशे चौ. मीटरपर्यंत कोणत्याही आकाराची. […]
गोव्यात गावागावात जेवढी म्हणून देवस्थाने आहेत, तेवढाच नाट्यमंडळांचाही आकडा आहे. गोव्यातील नाट्यपरंपरा कधीपासून सुरू झाली, याला अनेकांचे दुमत आहे. परंतु “अहिल्योध्दार” नाटकाच्या मूळप्रतीवरून एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीच गोमंतकीय रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली असावी असे अनेक जाणकारांचे मत. गोव्याचे संतकवी म्हणून ओळखल्या जाणार्या कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकर लिखित “अहिल्योध्दार” या नाटकाच्या प्रतीवरून आणि त्यांंच्या इतर लिखाणावरून जाणकारांनी कृष्ण जगन्नाथ […]
बनारस, वाराणसी, काशी अशा तीन नावांनी सुप्रसिध्द असलेल्या या शहराची गणना जगातील अथेन्स, जेरूसेलेम, पेकींग अशा नामवंत शहरांच्या मालिकेत इतिहासकारांनी केली आहे. अडीच ते तीन हजार वर्षांच्या इतिहासाच्या आठवणी येथे आजही ताज्या आहेत.यवनांची शेकडोंनी आक्रमणे पचवीत बनारसने आपली हिंदु अस्मिता अबाधित राखली आहे. शंकराचार्य, तुलसीदास, ज्ञानेश्वर, एकनाथ यांच्या बरोबरीने बुध्द, महावीर अशा विविध धर्मांच्या संतांचे हे […]
२६ जुलै २०१९ ला कारगिल युद्धाला २० वर्षे पूर्ण होतील. कारगिल युद्धाची वीरगाथा प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आजही जिवंत आहे. आजपर्यंतच्या युद्धांपैकी केवळ कारगिल युद्धाचा प्रसार वर्तमानपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवर फार मोठ्या प्रमाणात करण्यात आला. आजच्या घडीला देशाच्या सुरक्षिततेला बहुआयामी धोके आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणावर सैन्याबरोबरच देशप्रेमी नागरिकांचीही भारताला गरज आहे. २६ जुलै ‘कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने देशाकरता प्राणार्पण करणार्या, भारतीय सशस्त्र दलांतील शूर अधिकारी आणि सैनिकांना, देशवासीयांची आदरांजली. […]
ओमप्रकाश यांनी आपल्या कारकिर्दीत ३५० चित्रपटात कामे केली. त्यांच्या प्रमुख चित्रपटात ‘पड़ोसन’, ‘जूली’, ‘दस लाख’, ‘चुपके-चुपके’, ‘बैराग’, ‘शराबी’, ‘नमक हलाल’, ‘प्यार किए जा’, ‘खानदान’, ‘चौकीदार’, ‘लावारिस’, ‘आंधी’, ‘लोफर’, ‘ज़ंजीर’ यांचा समावेश आहे ‘कोणीही’ वादळ ‘,’ भटक्या ‘,’ जंजीर ‘, त्यांचा ‘नौकर बीवी का’ थी हा चित्रपट होता. […]
माओवादाशी संबंध असलेल्या विचारवंत आणि संस्थांच्या विरुद्ध कायद्याप्रमाणे कारवाई करायला हवी. सर्व राज्य सरकारांना, सगळ्या राजकिय पक्षांना कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे. […]