संगणकक्षेत्रात एक विनोदाने प्रश्न विचारला जातो. “लॅरी एलिसन आणि देव यांच्यात काय फ़रक आहे?” यावर उत्तर,”देवाला आपण लॅरी एलिसन आहोत असं वाटत नाही.” यातूनच लॅरी एलिसन हा किती महत्वाकांक्षी माणूस होता याची कल्पना येईल. ओरॅकल नावाच्या त्याच्या कंपनीने मायक्रोसॉफ़्ट, आयबीएम अशा तगड्या कंपन्यांना धडकी भरेल अशी जबरदस्त मुसंडी मारली. विशेष करुन माहिती साठवायच्या म्हणजेच डेटाबेसेसच्या तंत्रज्ञानात तर अशी मुसंडी मारली की त्याच्यापुढे भल्याभल्यांनी हार मानली. सुमारे २७०० कोटी डॉलर्स इतकी प्रचंड संपत्ती असलेला हा माणूस २००० सालच्या “फ़ोर्ब्स” मासिकात बिल गेट्सच्या खालोखाल जगातील दुसर्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत माणूस म्हणून जागा मिळवून गेला. […]
पणशीकर गुरुजी म्हणजे भारतीय अभिजात संगीतातील एक प्रयोगशील आणि एका वेगळ्या पद्धतीने हे अभिजात संगीत समृद्ध करणारे एक व्यक्तीमत्व आहे. व्याकरण, ज्योतिष, भाषा, कीर्तन इ. चा मोठा कौटुंबिक वारसा लाभलेल्या गुरुजींचा लहानपणापासूनच संगीताकडे ओढा होता. गुरुजींचे आजोबा व वडील हे संस्कृत पंडित तर एक ज्येष्ठ बंधू नटवर्य प्रभाकर पणशीकर आणि दुसरे दाजीशास्त्री हे पुराणकाल अभ्यासक असताना याच कुटुंबातील गुरुजींनी मात्र संगीताची वेगळी वाट शोधली. […]
या सूर्यास्ताला ‘मॅनहॅटनहेंज’ म्हटलं जातं. याला मॅनहॅटन सोल्स्टाईस असंही म्हटलं जातं. असा हा सूर्यास्त वर्षातून दोन वेळा होतो … मे महिन्याच्या शेवटच्या आठवडयात आणि जुलैच्या दुसऱ्या आठवडयात. अगदी असाच… वर्षातून दोन वेळा त्याच पॉईंटला सूर्योदय देखील होतो. […]
दक्षिण अमेरिकेची कुठलीही चित्रे पाहिलीत तरी माचूपिचूचे चित्र बघायला मिळणारच. किंबहुना माचूपिचूशिवाय दक्षिण अमेरिका ट्रीप पूर्ण होऊच शकत नाही म्हणा !त्यामुळे आमचा पुढचा टप्पा ’पेरू’.या देशातच इन्का संस्कृतीचे अवशेष असणारे माचूपिचू हे अत्यंत महत्त्वाचे स्थान.हे कुझ्कोपासून ८० किमी अंतरावर आहे त्यामुळे लीमा या राजधानीपेक्षा‘ इंन्कांची राजधानी कुझ्कोकडॆ’ आम्ही मोर्चा वळवला. […]
एकंदरीत भविष्य काळात अंतराळ ही देखील प्रमुख युद्धभूमी असेल हे लक्षात घेऊन भारताने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक बैठकीत देशाच्या स्वसंरक्षणासाठी ‘डिफेन्स स्पेस रिसर्च एजन्सी’च्या (डीएसआरए) स्थापनेचा खूप चांगला निर्णय घेतला. ही यंत्रणा अंतराळ युद्धासाठी आवश्यक असलेली शस्त्रात्रे व त्यासंबंधीचे तंत्रज्ञान विकसित करील. या संशोधनाच्या माध्यमातून ‘डिफेन्स स्पेस एजन्सी’ला सहाय्य करण्याचे काम (डीएसआरए) द्वारे केले जाईल. आणि भारताने घेतलेला निर्णय खरोखरच स्तुत्य आणि संरक्षण दृष्ट्या आवश्यक आहे. […]
एक बातमी – ‘गेली कित्येक वर्ष डॉक्टर सांगत आले आहेत की कॉफी शरीराला घातक असते. पण आता नवीन संशोधनानुसार कॉफी शरीरावर सकारात्मक परिणाम घडवू शकते असे लक्षात आले आहे.’ […]
निजामपूर हे माझ्या आजोळचं मूळ गाव असल्याने आणि मी तिथे कधीही न गेल्याने मनात कित्येक वर्ष ते रुंजी घालत होतं. सकाळचे दहा वाजले असताना निजामपूरच्या अगोदर रस्त्याच्या कडेला … शांत जागी एक साधं स्वच्छ हॉटेल दिसल्याने थांबलो. तिथून मागे सह्याद्रीच्या … ढगांनी वेढलेल्या डोंगररांगांचा विशाल देखावा दिसत होता. न्याहारी झाल्यावर मी हॉटेलच्या मालकांना विचारलं की हे डोंगर कुठचे … ते म्हणाले की तिथे कुंभा धरण आहे आणि त्या पलीकडच्याबाजूला आहे लवासा. […]
केवळ भाताचे रोप असे आहे जे एका शेतातून काढून दुसऱ्या शेतात लावले की त्याला भरघोस पीक येतं. त्यामुळेच आपल्याकडे लग्न लावताना अक्षता म्हणून तांदळाचे दाणे डोक्यावर उडवले जातात. म्हणजे एका घरातील मुलगी दुसऱ्या घरात गेल्यानंतर ती ज्या घरात जाईल तिथे भरभराटी आणि समृद्धी येईल असे काहीसे शास्त्र आहे असे बोलले जाते. […]
आमच्या गावात विहीरीला बाव असे म्हणतात. कदाचित बावडी शब्दापासून बाव बोलले जात असावे. मी विहीरीवर जाऊन येतो असं बोलण्यापेक्षा मी बावीवर जाऊन येतो असे बोलले जाते. आमची बाव नेमकी कधी बांधली ते माहीत नाही पण बाबा सांगतात त्या प्रमाणे सुमारे 55 ते 60 वर्षांपूर्वी आमच्या आजोबांनी बावीच्या तळाशी असलेला कातळ सुरुंग स्फोटांनी उडवून खोली वाढवली आणि पक्कं बांधकाम करवून घेतलं होते. […]
पंढरपूरच्या वारीची परंपरा ही सुमारे एक हजार वर्षांपूर्वीची, पण संत ज्ञानेश्वरांनी वारीला एक धार्मिक, नैतिक आणि अध्यात्मिक अधिष्ठान दिलं आणि गुरु हैबतबाबांनी (१८३२) वारीला एक नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध रूप दिलं.आतां आपण संतांचे सर्वसाधारण काळ पाहूं : […]